सहस्रबुद्धे कुलप्रतिष्ठान

सर्व सहस्रबुद्धे कुलबंधू व भगिनींना विनम्र अभिवादन,

सन १९९८ मध्ये सर्व सहस्रबुद्धे कुटुंबांकडून कौटुंबिक माहिती गोळा करून सहस्रबुद्धे कुलग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. त्यावेळेस तुटपुंजी साधने उपलब्ध असतानासुद्धा त्यावेळेच्या संपादक मंडळाने व त्यांना मदत करणाऱ्या असंख्य जणांनी नि:स्पृहपणे व अपार कष्ट घेवून चित्तपावन शांडिल्य व नित्युंदन गोत्राच्या सहस्रबुद्धे कुटुंबीयांचा हा पहिलाच कुलग्रंथ प्रकाशित केला होता, त्याच्याआधी देखील अशा स्वरूपाचे प्रयत्न झाले होते. त्याची माहिती कुलग्रंथात आहेच, त्यावेळेस या कार्यासाठी जे निधी संकलन झाले होते, त्यातील उरलेल्या रकमेचा संपादक मंडळाने एक न्यास निर्माण करून हे काम, तसेच कुलबंधूंना मदत करण्यासाठी एक संस्था निर्माण केली, आज ‘सहस्रबुद्धे कुलप्रतिष्ठान’ या नावाने सदर न्यास अस्तित्वात असून बँक ऑफ महाराष्ट्र ट्रस्टी कंपनीकडे एक्झिक्युटर ट्रस्टी म्हणून देखभालीसाठी आहे.
सदर कुलग्रंथ निर्माण होवून आज सुमारे २२ वर्षे झाली. या काळात सर्व कुलबंधूंची माहिती बदललेली असणे स्वाभाविक आहे. पूर्वी जी माहिती अंतर्भूत करण्याचे राहून गेले होते, ती आता घेण्याची गरज आहे. परंतू पूर्वीप्रमाणे कुलग्रंथ आता पुस्तक स्वरूपात तयार करणे जिकिरीचे व वेळखावू आहे. आज आपल्याला संगणकीकरणाचा पर्याय उपलब्ध आहे. त्यात प्रत्येकाला आपली माहिती दुरुस्त करणे, अद्यावत करणे सोपे होणार आहे. या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी काही कुलबंधूंनी एकत्र येवून एक कार्यकारिणी निर्माण केली व जास्तीत जास्त कुलबंधू व कुलभगिनींशी संपर्क केला. त्यांचे दोन व्हाटस् अप ग्रुप व फेसबुक पेज तयार केले गेले आहे. हे काम सहस्रबुद्धे कुलप्रतिष्ठान न्यासातर्फे केले गेले आहे.
आज ही वेबसाइट सर्व कुलबंधू आणि भगिनींसाठी उपलब्ध करून देताना न्यासाला अत्यंत आनंद होत आहे. हे काम करताना अजाणतेपणी कोणाची माहिती भरण्याचे राहून गेले असेल अथवा काही त्रुटी राहिली असेल, तर कृपया न्यासाला कळवावी.
न्यासाकडून या पुढील काळात या साइटची देखभाल तसेच कुलसंमेलन व अन्य काही कामे आपल्याला करावयाची आहेत. त्याची माहिती वेळोवेळी दिली जाईल. न्यासाच्या आज रोजीच्या स्थिर निधीमध्ये भरीव वाढ झाल्यास आणखी कामे करता येतील. तरी सर्व कुलबंधूंनी याचा जरूर विचार करावा. आज बँकांच्या व्याजाचे दर कमी होत असल्यामुळे व व्याज हे उत्पन्नाचे एकमेव साधन असल्यामुळे स्थिर निधी वाढविण्याची गरज आहे.
या साइट बद्दल आपल्या काही सूचना असतील तर व आपल्या कुटुंबीयांतर्फे काही स्पृहणीय यश संपादन केले असेल, तर त्याची माहिती आपण जरूर न्यासाला कळवावी, जेणेकरून ती सर्वांना ज्ञात करून देता येईल.
सहस्रबुद्धे कुलप्रतिष्ठान


Disclaimer

The website is created on the basis of information given by family members for preparing Kulgrantha. It is created to conserve and update the information about the family. The Sahasrabudhe Kulpratishthan will not be in any manner responsible for may legal or otherwise dispute that may arise. The use of the website is exclusively for family purpose and its use for public purpose is strictly prohibited.