राहण्याची सोय, पोहोचण्याचे मार्ग आणि पर्याय आणि इतर माहिती (नोव्हेंबर २०२१)

टीप: पुढील माहिती महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या बंधुभगिनींच्या मदतीसाठी हि माहिती देत आहोत. हि माहिती आम्हाला आलेला वैयक्तिक अनुभव, तत्कालीन रस्त्यांची परिस्थिती आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तयार केलेली आहे. प्रत्येकाचा अनुभव, निवडलेले पर्याय आणि रस्ते वेगवेगळे असू शकतात.

मार्ग :

कोतवडे हे गाव रत्नागिरीपासून २३ किमी अंतरावर आहे. रत्नागिरीमधून शिरगांव-साखरतार-कासारवेली-सडये मार्गे कोतवड्यात पोहोचता येते.

पुण्यातून अनेक मार्ग कोतवड्याकडे येतात. अंदाजे अंतर ३०० किमी आहे.  त्यापैकी २ मार्ग पुढीलप्रमाणे

१.  पुणे- राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे कराड – नारायणवाडी – कोकरूड – मलकापूर (अंबा घाट) – साखरपा – हातखंबा – निवळी फाटा – तिवराड – कोतवडे

२.  पुणे – राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे उंब्रज – पाटण (कुंभारली घाट) – चिपळूण – संगमेश्वर – निवळी फाटा – तिवराड – कोतवडे

मुंबईहून येण्यासाठी सर्वोत्तम मार्ग हा पनवेल हुन राष्ट्रीय महामार्ग ६६ मार्गे चिपळूण – संगमेश्वर – निवळी फाटा – तिवराड – कोतवडे हा आहे       

पोहोचण्याचे पर्याय :

रस्ता: पुणे, मुंबई आणि रत्नागिरीपासूनचे मार्ग हे वर नमूद केलेले आहेत

रेल्वे: २३ किमीवर असलेले रत्नागिरी हे सर्वात जवळचं रेल्वे स्थानक आहे

विमानतळ : सर्वात जवळचे विमानतळ १५० किमीवर कोल्हापूर येथे आहे

राहण्याची सोय:

१. कोतवडे : खुद्द कोतवड्यात राहण्याच्या दोन सोयी आहेत. श्री गजानन सहस्रबुद्धे ह्यांच्या घरी ते सोय करतात. त्यांच्याकडे ३ खोल्या आहेत. खोलीचा एक प्रातिनिधिक फोटो सोबत देत आहे. श्री गजानन ह्यांच्याकडे जेवण्याची देखील सोय आहे. ह्याखेरीज आपण इतर माहिती श्री गजानन ९४२२४३०७७९ / ९५४५०२९३९८ ह्यांना फोन करून विचारू शकता.

गजानन-सहस्रबुद्धे-घर

दुसरी सोय सौ मेधा सहस्रबुद्धे ह्यांच्या अतिथी परिणय येथे आहे. अतिथी परिणय हे एक रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट ची सर्व माहिती त्यांच्या संकेतस्थळावर (http://www.atithiparinay.com) उपलब्ध आहे

२. गणपतीपुळे : आरेवारे किनाऱ्याजवळ हॉटेल अभिषेक मध्ये सुद्धा राहण्याची सोय आहे. हॉटेल अभिषेक कोतवडे पासून अंदाजे १३ किमी अंतरावर आहे. हॉटेल ची खासियत अशी कि ह्या हॉटेल मधून आरेवारे च्या समुद्राच सुंदर दर्शन होतं. डोंगरावर स्थित असल्याकारणाने आजुबाजुसही फार काही नाही. हॉटेल अभिषेक ह्यांचे https://abhishekbeachresort.com हे संकेतस्थळ आहे. रूम्स चे अनेक पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

३. रत्नागिरी : ज्यांना राहण्याचे जास्त पर्याय हवे असतील त्यांच्यासाठी रत्नागिरी हेच योग्य आहे. रत्नागिरीमध्ये हॉटेल विहार डिलक्स, हॉटेल संगम रिजेन्सी हि काही चांगली हॉटेल्स आहेत. ह्या सर्वांची आपापली संकेतस्थळ आहेत त्यावर सर्व माहिती उपलब्ध आहे. ह्यापैकी हॉटेल संगम रिजेन्सी रेल्वे स्टेशन ला लागूनच आहे.                        

अभिषेक तसेच पूजेसंबंधी

कोतवडे गावाचं ग्रामदैवत कुसुमेश्वर आहे आणि ग्रामदेवता महालक्ष्मी

अभिषेक करण्यासाठी गावातील दोन कुलबंधू

प्रसाद : ८६९८८६५२४८, योगेश: ९४२०९०९४७२

वझे गुरुजी :९४०३५ ०९३४९, महेश्वर वझे: ९४०५७ ६६७६५

ह्यांना आपण, दिलेल्या फोन नंबर वर, फोन तसेच व्हाट्सअप करू शकता.

कुसुमेश्वर-मंदिर
कुसुमेश्वर मंदिर
महालक्ष्मी-मंदिर
महालक्ष्मी मंदिर

कोतवडे गावाच्या नजीक असणारी प्रेक्षणीय स्थळे

आरेवारे किनारा : ७ किमी    गणपतीपुळे मंदिर : १४ किमी        

या बाबत काही सूचना असल्यास सहस्रबुद्धे कुलप्रतिष्ठानशी संपर्क करावा.

Lodging facilities, transport options & routes & other useful information (November 2021)

Note: We are providing this information in order to guide family members coming from outside the state of Maharashtra. The following information is the result of our personal experience, the then local conditions & information from the locals. Others may have a different experience, may have different modes & routes to reach Kotawde. 

Routes: 

Kotawde is situated at around 23kms from Ratnagiri. One can reach Ratnagiri, by road, through Shirgaon-Sakhartar-Kasarveli-Sadye-Kotawde.

There are many routes to reach Kotawde from Pune. The approximate distance from Pune is 300kms by road. We have listed 2 of them below

1. Pune – Karad via NH48 – Narayanwadi- Kokrud – Malkapur (Amba Ghat) – Sakharpa – Hatkhamba – Nivli Phata – Tivrad – Kotawde

2. Pune – Umbraj via NH48 – Patan (Kumbharli Ghat) – Chiplun – Sangameshwar – Nivli Phata – Tivrad – Kotawde

Best way to reach Kotawde from Mumbai is by taking NH 66 at Chiplun.

Panvel-Chiplun – Sangameshwar – Nivli Phata – Tivrad – Kotawde

Transport options: 

Road: They are enlisted above

Railway: Ratnagiri Railway Station located at 23kms is the closest railway station to Kotawde. 

Airport: Kolhapur, located at 150kms, is the nearest airport.

Lodging facilities:

1. Kotawde: Kotawde itself has 2 options of stay. Mr. Gajanan Sahasrabudhe has facility at his residence. There are 3 rooms. One representative photo is given below. He also has lunch/dinner facility. For any additional information contact Mr. Gajanan on 9422430779 / 9545029398.

गजानन-सहस्रबुद्धे-घर

 Second is Atithi Parinay by Mrs. Medha Sahasrabudhe. Atithi Parinay is a resort & all the information regarding the resort is available on their website http://www.atithiparinay.com 

2. Ganpatipule: There is a beach hotel & Spa called Abhishek near Areware beach. It is situated around 13kms from Kotawde. The best part of the hotel is that it is situated opposite the Areware beach giving the tourist a magnificent view of the sea from their rooms. The hotel is situated in hilly area on a highway & hence there are not many hotels nearby. One can check all the information on their website https://abhishekbeachresort.com . They have multiple options of room.

3. Ratnagiri: Those who want more lodging options can stay in Ratnagiri. Hotel Vihar Delux , Hotel Sangam Regency are 2 of the good ones. They all have their respective websites. Hotel Sangam Regency is next to the Railway station.

About rituals in the temples

The gramdaivat of Kotawde is Kusumeshwar & gramdevata is Mahalakshmi

2 Sahasrabudhe brothers in Kotawde can help with the abhishek or puja (rituals). 

One can call them or whatsapp them on 

Prasad: 8698865248  Yogesh: 9420909472

कुसुमेश्वर-मंदिर
कुसुमेश्वर मंदिर
महालक्ष्मी-मंदिर
महालक्ष्मी मंदिर

Touristic places around Kotawde

Areware beach: 7kms  Ganpatipule Temple: 14kms