सांस्कृतिक ओळखीचे निकष

आपली सांस्कृतिक - सामाजिक ओळख काय असा प्रश्न मनात आला तर पटकन नक्की सांगता येत नाही, परंतु अशी ओळख देण्याची आपली परंपरा शेकडो-हजारो वर्षे जुनी आहे. प्रागैतिहासिक काळात आपले पूर्वज त्यांचा विद्याभ्यास गुरुकुलात राहून करीत असत. एखाद्या ज्ञानसत्राच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थी आपली ओळख सांगून गुरूला वंदन करीत असे. जसे शांडिल्यगोत्री विद्यार्थी आपली ओळख खालील प्रकारे देत असेल.
‘‘शाण्डिलासित दैवलेती त्रिप्रवरान्वित शाण्डिल्य गोत्रोत्पन्नोहं, ऋग्वेदस्य आश्वलायन सूत्र शाकलशाखा ध्यायामि, भो गुरो: अभिवादयामि” किंवा एखादा नित्युंदनगोत्री विद्यार्थी आपली ओळख अशी देत असेल.

“आंगिरस पौरुकुत्स त्रासदस्येवेति त्रिप्रवरान्वित
नित्युंदन गोत्रोत्पन्नोहं कृष्ण यजुर्वेदस्य तैत्तिरीय”
शाखान्तर्गत हिरण्यकेशी सूत्र ध्यायामि, भो गुरो: अभिवादयामि

विरील दोन्ही प्रकारच्या ओळखीची पद्धत एकच म्हणजे मी अमुक प्रवराचा, अमुक गोत्राचा, अमुक वेदांतर्गत अमुक शाखेचा अभ्यासक आहे. प्रवर, गोत्र, वेद, शाखा ही जी एक प्रकारची आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख त्यांच्याबद्दल आज सर्वत्र उदासीनता, अनभिज्ञता आहे. आपल्या कुलग्रंथाच्या सुरुवातीला याविषयी काही माहिती एकत्र वाचावयास मिळावी या उद्देशाने अशी माहिती येथे देत आहे.

    Thumb

    गोत्रप्रवर विचार गोत्र – प्रवर:

    ऋषिपरंपरेत कोणता वर्ण कोणत्या वंशातील आहे, हे समजण्यासाठी गोत्र आणि प्रवर या संकल्पनेचा उदय झाला. गोत्र म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेले ऋषींचे कुलनाम होय. विशिष्ट कुलापैकी अलीकडच्या ऋषींच्या नावावरून हे गोत्रनाम प्रस्थापित केले जाते. आंगिरस, अगस्थ्य व भृगु हे तीन आद्य गोत्रकार समजले जातात. शिवाय वसिष्ठ, विश्वामित्र, भरद्वाज, जमदग्नी, गौतम, अत्रि आणि कश्यप हे सप्तर्षिही गोत्रप्रवर्तक मानले जातात. वरील दहा ऋषी व त्यांचे पुत्रपौत्रादिक व वंशज यांनी स्वतंत्र गोत्रे स्थापन केल्याने वर्णामधील गोत्र संख्या अगणित झाली. बौद्धायन श्रौत्र सूक्तात गोत्रसंख्या कोट्यवधी असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

    गोत्र-प्रवरांचे महत्त्व:

    उपरोक्त गोत्र नामावलीस सनिश्चित अशा वांशिक चौकटीमध्ये बसविण्यासाठी गोत्र नामांना प्रवरांची नावे जोडण्याची पद्धती रूढ झाली. गोत्रकार ऋषींच्या विशेष उल्लेखनीय अशा सात मंत्रद्रष्ट्या पूर्वज ऋषींचा समावेश या प्रवरात करण्यात येतो. त्यात समावेश होणाऱ्या एकूण ऋषींची संख्या १३० असली तरी १ ते ७ अशा पद्धतीने केलेल्या त्यांच्या गटवार विभागामुळे प्रवरांचे एकूण ४९ विभाग होतात. बरीच गोत्रनामे त्रिप्रवरी असून काही पंचप्रवरी असतात. उदाहरणार्थ वसिष्ठकुलोत्पन्न वा वसिष्ठ गोत्रीय त्रिप्रवरी आहेत.

    प्रवराचा शब्दशं : अर्थ प्रार्थना असा होतो. यज्ञसमयी यज्ञकर्त्यांची हविर्द्रव्ये देवांप्रत घेऊन जाण्याची प्रार्थना (प्रवर) पूर्वकाली अग्नीची उपासना करणाऱ्या पूर्वजांच्या नामावलीसह करण्यात येत असे. यावरून यज्ञकर्त्यांचे पूर्वज ऋषी असा लौकिक अर्थ प्रवर शब्दास प्राप्त झाला.

    चित्तपावन ब्राह्मणांची चौदा गोत्रे आहेत. या चौदा गोत्रांमध्ये काही ऋग्वेदी म्हणजे आश्वलायन सूत्राची व काही कृष्णयजुर्वेदी म्हणजे हिरण्यकेशी सूत्राची आहेत. काही गोत्रे उभय सूत्रांची आहेत. या चौदा गोत्रांचे प्रवर्तक ऋषि सातच आहेत. सूत्रकारांनी विशिष्ट गोत्राचे विशिष्ट प्रवर ऋषी सांगितलेले आहेत. ते खालीलप्रमाणे –

    प्रवर्तक ऋषी गोत्र
    १) कश्यप १) कश्यप ८) कौशिक
    २) भरद्वाज २) शांडिल्य ९) बाभ्रव्य
    ३) वसिष्ठ ३) कपि १०) जामदाग्न्य
    ४) विश्वामित्र ४) गार्ग्य ११) वत्स
    ५) भृगु ५) भरद्वाज १२) विष्णुवृद्ध
    ६) आंगिरस ६) वसिष्ठ १३) नित्युंदन
    ७) अत्रि ७) कौंडिण्य १४) अत्रि

    वरीलपैकी दोन प्रवर्तक ऋषींचे (क्र. २) व (क्र. ७) अपवाद वगळता बाकीच्या प्रत्येक ऋषींपासून दोन गोत्रे उत्पन्न झाली. यावरून असे दिसते की, त्या त्या गोत्रातील अनेक व्यक्ती एक मूळ पुरुषापासून अथवा ऋषींपासून झाल्या म्हणजे त्यांचे नाते भावंडासमान आहे. म्हणून एक ऋषी गोत्रोत्पन्न व्यक्तींचे विवाह होत नसत. सुप्रजाजनन शास्त्राच्या दृष्टीने पुराणकाळी हे निर्बंध योग्यच होते. Co-Sanguinity of Marriage हे एखाद्या मानव वंशाच्या ह्रासाचे कारण मानले जाते. कालांतराने एक ऋषी कुलोत्पन्न मानव वंशाची इतकी वाढ झाली की, त्यातील व्यक्तींचे मूळचे बंधुभगिनींचे नाते राहिले नाही. म्हणून अलीकडे कायद्यानेसुद्धा सगोत्र विवाहास मान्यता दिली आहे.
    मंत्रद्रष्ट्या ब्रह्मर्षींच्या वंशावळी ‘बृहत् देवता’ इत्यादी ग्रंथांवरून आता ज्ञात झाल्या आहेत. शांडिल्य गोत्री काश्यप ऋषींच्या वंशातील आहेत. त्यांची वंशावळ येथे उद्धृत करीत आहे.

    वसिष्ठांची वंशावळ
    प्रजापती शांडिल्य
    मारिचि शक्ति
    कश्यप (आदिती) पराशर
    मित्रावरूण गौरवीति
    असित व्यास
    देवल शुक (महाभारत)
    वसिष्ठ (अरूंधती)

    कुलनामे:

    आडनाव म्हणजे कुलनाम. एका कुलातील सर्वांचा निर्देश ज्याने करता येतो ते आडनाव. यालाच उपनाम असेही म्हणतात. समाज लहान असतो तेव्हा व्यक्तीचे एकच नाव उल्लेखाला पुरेसे असते. समाज मोठा होऊन व्यवहाराच्या कक्षा वाढल्या म्हणजे निश्चितीसाठी कुलनामे देण्याची पद्धत पडली असावी. अशीच काहीशी स्थिती ‘ब्राह्मण काळी’ निर्माण होऊन गोत्रनामे प्रचारात आली असावीत. व्यवहाराच्या कक्षा आणखी मोठ्या झाल्यावर गोत्रनाम मागे पडून उपनामाची प्रथा पडली असावी. ही प्रथा सुरू झाल्यानंतर आडनावांची जी प्रथम यादी तयार झाली त्यात ६० आडनावे होती, असे म्हणतात. याविषयीचा उल्लेख स्कंद पुराणात प्रथम पाहावयास मिळतो. या पुराणातील ६० उपनामांचे श्लोक व पुढे गोत्र मालिका या नावाने एक लहानसे पुस्तक श्री. वामन कृष्ण जोशी उर्फ गद्रे व सदाशिव बाळशास्त्री अमरापूरकर यांनी लोकहितार्थ मुंबईच्या ज्ञानदर्पण प्रेसमध्ये शिला यंत्रावर छापून इ.स.१८५५ साली प्रसिद्ध केले. त्याचा उतारा असा :

    प्रवर्तक गोत्र आडनाव संख्या
    १) काश्यप
    काश्यप
    शांडिल्य
    लेले, गानू, जोग, लघाटे, गोखले, सोमण, गांगल, भाटे, गणपुले, दामले, जोशी, परचुरे
    २) वासिष्ठ
    वसिष्ठ १२
    कौंडिण्य
    साठे, बोडस, ओक, बापट, बागूल, धारू, गोगटे, पोंक्षे, साठे, गोवंडे, भाभे, पटवर्धन, फणसे, विंझे
    (३) आंगिरस
    विष्णुवृद्ध
    नित्युंदन
    किडमिडे, नेने, परांजपे, मेहेंदळे, वैशंपायन, भाडभोके
    (४) भारद्वाज
    भारद्वाज
    गार्ग्य
    कपि
    आचवल, टेणे, दर्वे, गांधारे, घांगुर्डे, रानडे, कर्वे, गाडगीळ, लोंढे, माटे, दाबके, लिमये, खांबेटे, जाईल, माईल
    (५) भृगू
    जमदग्नी
    वत्स
    पेंडसे, कुंटे, मालशे
    (६) विश्वामित्र
    बाभ्रव्य
    कौशिक
    बाळ, बेहेरे, गद्रे, बाम, भावे, वाड, आपटे
    (७) अत्रि
    अत्रि
    चितळे, आठवले, भाडभोके
    एकूण आडनाव संख्या ६०

    वरील ६० आडनावांत ३७ ऋग्वेदी शाकल शाखेचे आश्वलायन सूत्रानुयायी आहेत. उरलेली आडनावे कृष्णयजुर्वेदी तैत्तिरीय शाखेची, हिरण्यकेशी सूत्राची आहेत. ती आडनावे वरच्या यादीत अधोरेखित केली आहेत.

    गोत्र ऋषीवंशावळ:

    गोत्र-प्रवरांच्या सर्वसाधारण माहितीनंतर आता शांडिल्य व नित्युंदन गोत्रे व प्रवर ऋषींविषयी माहिती असणे जरूर आहे. अनेक ऋषींपैकी थोड्यांनाच गोत्र-प्रवर ऋषी बनण्याचा मान मिळाला. अशा आपल्या पूर्वज ऋषींच्या मोठेपणाविषयी माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे. प्रथम शांडिल्य ऋषीसंबंधी माहिती पाहू.
    गोत्र ऋषी होण्याचा कोणाचा अधिकार असावा, याबाबतीत काही निकष सांगितले जातात..
    ऋग्वेद्यांच्या बाबतीत गोत्र ऋषी ऋग्वेदातील सूत्रांचे द्रष्टे असावेत. परंतु शांडिल्यांच्या बाबतीत या नियमाला बाध आलेला दिसतो. कारण शांडिल्यांचे एकही सूक्त ऋग्वेदात नाही. या अपवादाचे कारण कदाचित त्यांच्या विशेष कर्तृत्वात असावे.

    शांडिल्य:

    शांडिल्य हे एक थोर आचार्य होते. मोठे तापसी होते. शतपथ ब्राह्मणात त्यांच्या श्रौतकर्मातील कुशलतेचा उल्लेख आहे. ते मोठे तत्त्वज्ञानी होते. छांदोग्य उपनिषदात ब्रह्माला सर्व सृष्टीचा प्रारंभकर्ता, रक्षणकर्ता व शेवटी इतिश्री करणारा असे प्रतिपादन शांडिल्याच्या नावावर आहे. आत्म्याचे वर्णन महत्तम व लघुतम असे त्यांनी केले आहे. त्यांच्या मते मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मृत्यूनंतर आत्म्यामध्ये विलीन होण्याचे आहे. ब्रह्मसूत्र शांकर भाष्यात या त्यांच्या तत्त्वज्ञानाला ‘शांडिल्य विद्या’ असे नाव दिले आहे. शांडिल्य स्मृती, शांडिल्य धर्मसूत्रे, शांडिल्य दीपिका इत्यादी ३० ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. यज्ञयागादी कर्मातील एक प्रकांड पंडित, मानवी जीवनाचा अर्थ सांगणारा एक तत्त्वज्ञानी, अनेक ग्रंथांचा कर्ता एवढ्यावर त्यांचे कर्तृत्व भागले नाही, परमेश्वरप्राप्तीचा एक मार्ग परमेश्वराची भक्ती हादेखील असतो व सर्व समाजाला त्या मार्गानेसुद्धा ईप्सित प्राप्त करता येते, हा एक नवा विचार : त्याकाळी काहीसा ‘अवैदिक विचार’ मांडून त्याकरिता शांडिल्यांनी भक्तिसूत्रांची रचना केली. या सर्व कर्तृत्वाचा परिणाम म्हणून गोत्र ऋषी होण्याचा मान त्यांना मिळाला असावा. शांडिल्य हे प्रवर ऋषीही आहेत. काही विद्वानांच्या मते शांडिल्य भक्तिसूत्रे उत्तरकालीन आहेत. त्यांचा कर्ता व यज्ञकर्मप्रवीण शांडिल्य यांचा संबंध नाही. वर निर्देश केलेल्या कोणत्याही एका कर्तृत्वाचा मोठेपणा गोत्र ऋषीचा मान मिळविण्यास योग्य आहे. दुसरे दोन प्रवर ऋषी आसित देवल आहेत. आसित व देवल हे ऋग्वेदातील सूक्तकर्ते असून त्यांची वीस सूक्ते प्रसिद्ध आहेत. ऋग्वेदाच्या नवव्या मंडलातील प्रसिद्ध पवमान ल सूक्तांचे द्रष्टे आसित – देवल आहेत. भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायातील तेराव्या श्लोकात भगवंतांचे गुणगान करणाऱ्या व्यास, नारद या ऋषींच्या जोडीला आसित – देवलांचा उल्लेख आहे. प्रवर व गोत्र ऋषींच्या माहितीनंतर आता ऋग्वेदाबद्दल थोडक्यात माहिती अशी –

    ऋग्वेदाची जडण, कार्य:

    वैदिक आर्यांचा ऋग्वेद हा एक मोठा ज्ञानकोश आहे. त्याचा मुख्य विषय ज्ञान- ईश्वर जीव – प्रकृती – गुण – आदर्श व व्यावहारिक शिक्षणाचे मार्गदर्शन हा आहे. ऋग्वेदातील शब्दसंपत्ती, विचारसौंदर्य, प्रतिभाविलास, अर्थगांभीर्य, रचनाचातुर्य, वर्णनकौशल्य, शब्दसौष्ठव, पदलालित्य अजोड आहेत. वेदांत सृष्टीनिरीक्षण, देवतावर्णन, तत्त्वचिकित्सा, जीवनविकास, तेजस्वीकृती, प्रभावी राजकारण, यज्ञप्रकृति, समाजदर्शन, भूतानुकंपा इत्यादी अनेक विषय सूत्रबद्ध स्वरूपात ग्रथित केले असून त्याची सर जगातील आजपर्यंत उपलब्ध असलेल्या कोणत्याही ग्रंथाला येत नाही. वरील ज्ञानकोशाच्या उपशाखा प्रामुख्याने दोन प्रकारच्या ग्रंथांत मिळून सांगण्यात आल्या असून पहिल्या भागाला संहिता व दुसऱ्या भागाला ब्राह्मण अशी संज्ञा आहे. संहितेत अनेक ऋषींनी गायिलेले छंदोबद्ध मंत्र असून, ब्राह्मण ग्रंथात त्या मंत्रांचा अर्थ, विनियोग व स्पष्टीकरण यांचा समावेश आहे. मनुष्यमात्राला सदासर्वदा पाहिजे असलेले सुख मिळविण्यासाठी आणि नको असलेले दु:ख सत्यसृष्टीत टाळण्यासाठी अलौकिक, अपौरुष्य, दैवी उपाय सुचवून अगर दाखवून देणारा जो ग्रंथ त्यास वेद म्हणतात. ऋग्वेद हा आपला सर्वात पुरातन वेद म्हणून ओळखला गेला आहे.
    ऋग्वेदाची ‘अष्टके’ व ‘मंडले’ अशा दुहेरी पद्धतीने मांडणी करण्यात येते. अष्टक मांडणीत आठ अष्टके असून प्रत्येक अष्टकात आठ अध्याय आहेत. मंडल मांडणी मंत्रद्रष्ट्या ऋषींनी रचलेल्या मंत्रावरून करण्यात आली असून त्याचे दहा भाग आहेत. या एकूण मांडणीत १०२८ सूक्ते १०५५२ ऋचांमध्ये विभागली आहेत. ऋग्वेदातील मंत्रद्रष्टया ऋषींची संख्या ५८ असून त्यात अगस्त्य, अत्रि, कक्षीवान, कण्व, गौतम, जमदग्नि, वामदेव, दीर्घतमस्, देवापि, नाभानेदिष्ट, भरद्वाज, वसिष्ठ, विश्वामित्र, शु:शेष, श्यावाश्व इत्यादी ऋषी जास्त महत्त्वाचे मानले जातात. वेदार्थांचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी एकंदर सहा विषयांच्या ज्ञानाची जरुरी आहे. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष हे ते सहा विषय होत. यांपैकी कल्प विषयात वेदाभ्यासाच्या वेळा, ठिकाणे यासंबंधी मार्गदर्शन असून सर्व वैदिक कर्माचे प्रयोग व विधि सांगितले आहेत. त्यात आश्वलायन, हिरण्यकेशी, आपस्तंब, बोधायन, कात्यायन इत्यादी श्रौतसूक्ते व गृह्यसूत्रे अशी त्यांची विभागणी आहे.
    चित्तपावनात काही ऋग्वेदी व काही कृष्णयजुर्वेदी आहेत. पूर्वी सर्वत्र हिरण्यकेशी होते, अशीही एक कल्पना आहे. चित्तपावनातील मूळची जी ६० आडनावे आहेत, त्यात ३७ आश्वलायन सूत्राची व बाकीची २३ हिरण्यकेशी आहेत.

    आंगिरस, पौरुकुत्स, व्यासदस्यव प्रवर ऋषी:

    नित्युंदन गोत्राच्या प्रवरात आंगिरस, पौरुकुत्स व त्र्यासदस्यव हे तीन प्रवर ऋषी आहेत. वर शांडिल्यांची जशी वंशावळ दिली आहे तशी नित्युदनांची वंशावळ देता येत नाही. याचे कारण असे आहे की, भृगु व आंगिरस गणातील ऋषी अवैदिक आहेत. ते मूळचे क्षत्रिय असून प्रथम राजर्षि व नंतर ब्रह्मर्षि झाले आहेत. अशा वर्णांतरित क्षत्रियांना या गणात घालून त्यांची गणना ब्रह्मर्षीत करून विश्वामित्राप्रमाणे ते गोत्रऋषी मानण्याची पद्धती निघाली. भरद्वाज, कपि, नित्युंदन व विष्णुवृद्ध यांच्या प्रवरात आंगिरस हा एक समान सूक्तकार ब्रह्मर्षि आहे. आंगिरस, पौरुकुत्स व व्यासदस्यव यांच्याबद्दल थोडक्यात माहिती अशी आहे :
    वज्रकुलोत्पन्न आंगिरस ऋषी ब्रह्मर्षि असून बृहस्पतीचे पिता आहेत. हे एक ब्रह्मनिष्ठ, तपस्वी, योगी, समाजाभिमुख तत्त्वचिंतक, धार्मिक अशा बहुविध विषयांचे मार्गदर्शक समजले जातात. ब्रह्मविद्या, शरीर – आत्मा – सर्वात्मा इत्यादी तत्त्वचिंतनातून आत्मोपनिषदाचा कर्ता येथपासून ते दैनंदिन व्यवहारातील प्रायश्चित्त, अशौच, सहगमन इत्यादी अनेक विषयांत त्यांची सूक्ते आहेत. त्यांचे एक वैशिष्ट्य असे दिसते की, त्यांची सूक्ते अनेक ऋषींच्या सहभागाने आली आहेत. त्यात मनु, ययाति, भृगु, कण्व, अत्रि इत्यादींचा समावेश आहे. ऋग्वेदातील १, ४, ८ व २० या मंडलातील अनेक सूक्ते याची साक्षीदार आहेत. अथर्ववेदातील पाच कल्पांपैकी एका कल्पाचे नावच आंगिरस कल्प आहे. व्यवहारात प्रायश्चित्तासंबंधी सखोल मांडणी करणारा आंगिरस स्मृती हा ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. मंत्रविद्या, पती निधनानंतर सहगमनासारख्या विषयांवर त्यांचे बरेच मार्गदर्शक श्लोक आहेत. अशा त्यांच्या अनेक सूक्तांचे गठण मिताक्षरादि ग्रंथ व वेदाचार्यांच्या स्मृतिरत्नावलीत बृहत् आंगिरस म्हणून समाविष्ट आहेत.
    पौरुकुत्स हा पुरुंचा राजा होता. पुरु जमात वैदिक आर्यांपैकी एक उपशाखा असून सरस्वती नदी तीरावर ती वसली होती. वृत्रासुरवधासंबंधात पौरुकुत्स हा प्रमुख होता. या कामात त्याने इंद्राची मदत घेतली होती. ब्रह्मर्षि झाल्यानंतर ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील १९ सूक्तांचा तो द्रष्टा आहे.
    त्र्यासदस्यव हा पौरुकुत्साचा मुलगा इंद्रासारखा पराक्रमी राजा होता. तो त्याच्या उदारपणाबद्दल व सज्जनांचा संरक्षणकर्ता म्हणून प्रसिद्ध होता. म्हणून द्यावापृथ्वींनी त्याला अलोट संपत्ती दिली असता ती त्याने सर्व लोकांत वाटून टाकली. त्याच्या उदार व पराक्रमी स्वभावामुळे त्याची अर्धदेवात गणना झाली. ब्रह्मर्षि झाल्यानंतर ऋग्वेदातील चौथ्या व नवव्या मंडलात त्याची सूक्ते समाविष्ट आहेत.

    नित्युंदन गोत्री कृष्णयजुर्वेदी आहेत हे वर नमुद केले आहे. या वेदासंबंधी थोडक्यात माहिती येथे प्रस्तुत करीत आहोत.

    कृष्णयजुर्वेद - जडण, कार्य:

    ऋग्वेदाचा ज्याप्रमाणे सर्वानुक्रमणी हा विवरणाचा भाग आहे, तसा कृष्णयजुर्वेदाला नाही. त्यामुळे त्याच्या ऋषि, छंद, देवता इत्यादींची स्पष्ट माहिती मिळत नाही. ग्रंथाची विभागणी सहा कांडात असून त्यांची नावे प्राजापत्य, सौम्य, आग्नेय, वैश्वदेव, स्वायंभुव आणि वरुण अशी आहेत. प्राजापत्य कांडातच पहिल्या व दुसऱ्या कांडातील मंत्र आहेत. राष्ट्रोन्नतीसाठी देवाची प्रार्थना करणे आवश्यक आहे, असे या मंत्रात सांगितले आहे. अश्वमेध यज्ञाच्या समाप्तीनंतर म्हणावयाचे मंत्र राष्ट्रीय भावनांनी ओतप्रोत भरलेले आहेत.
    कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेत दर्शपूर्णमास, (सोमयाग , पुनराधान, वाजपेय, राजसूय, इत्यादी अनेक यज्ञांची सविस्तर मांडणी आहे. कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीय ब्राह्मणात अनेक कथा असून यज्ञ हे त्यांचे तात्पर्य आहे. तैत्तिरीय, महानारायण, मैत्री, कठ व शेताश्वतर ही कृष्ण-यजुर्वेदाची उपनिषदे आहेत. कालक्रमानुसार पाहता यजुर्वेदाचा काल ऋग्वेदानंतरचा मानला जातो. ऋग्वेदापेक्षा यजुर्वेदात ब्राह्मण क्षत्रियादी वर्णांची धारणा पूर्णावस्थेत गेलेली आहे. रुद्र देवतेची बरीच वाढ झाली असून उपनिषदांमध्ये वाढीस लागलेली एक ईश्वराची कल्पना यजुर्वेदात निश्चित व सप्रमाण मांडली आहे. यजुर्वेदातील नीतिविषयक कल्पना ऋग्वेदातील कल्पनांपेक्षा बऱ्याच प्रगत झाल्या आहेत. उच्चतर नैतिक जीवनाच्या कल्पना दृढ असून ज्ञान, पापाची क्षमा, अमरत्व इत्यादी आध्यात्मिक गुणांच्या प्राप्तीबद्दल प्रार्थना यजुर्वेदात विपुल आहेत.

    चित्तपावन संज्ञा, शोध, विस्तार:

    आपल्या सांस्कृतिक, धार्मिक ओळखीनंतर आपल्या आणखी दोन सामाजिक विशेषणांबद्दल आता थोडक्यात माहिती देणे जरूर आहे. ती विशेषणे आहेत कोकणस्थ व चित्तपावन. कोकणात राहणारे ते कोकणस्थ अशी साधी व्याख्या करावयाची तरी त्याच्या भौगोलिक मर्यादा पाहाता असे दिसते की, पश्चिम किनाऱ्याच्या उत्तरेस अलिबागपासून दक्षिणेस सावंतवाडीजवळच्या तळेरेपासून पूर्वेस सह्याद्री पर्वतराजीच्या पश्चिमाभिमुखी जलविभागणी भागापर्यंतच्या भूप्रदेशाला कोकण समजले जाते. कोकणस्थ ही संज्ञा इ. स. १७१५ च्या पूर्वी प्रचलित नव्हती, असे एन्थोव्हनने नमूद केले आहे. स्कंद पुराणात सारस्वता गता ये कोकणस्था: प्रकीर्तिताः । असे एक वचन आहे. त्यावरून आपण ज्यांना हल्ली सारस्वत म्हणतो त्यांनाच प्रथमपासून कोकणस्थ म्हणत असावेत, असे दिसते. यावरून कोकणस्थ ही संज्ञा प्रथमपासून सारस्वतांना लागू असावी व पेशवाईच्या उदयानंतर म्हणजे साधारणपणे इ.स. १७१० च्या आसपास किनारपट्टी भागातून घाटमाथ्यावर येऊन स्थिरावलेल्यांना कोकणस्थ ही संज्ञा प्राप्त झाली असावी. उत्तर व दक्षिण कारवार किनारपट्टी भागातील समाजाला कोकणी ही संज्ञा प्रचारात आली. चित्तपावन ही संकल्पना अनेक विद्वानांच्या तर्काचा विषय बनला आहे. अनेक कल्पना मांडल्या गेल्या आहेत ; परंतु त्यांपैकी काही प्रथमदर्शनी तरी काहीशा तर्कशुद्ध वाटतात. त्याचाच मागोवा घेण्यासारखा आहे. चित्तपावन या शब्दाची व्युत्पत्ती काही ठिकाणी चिती म्हणजे यज्ञ या शब्दाशी जुळविली जाते. मोठा यज्ञ करणारे ते चित्तपावन, चितियज्ञाने पावन म्हणजे पुनीत झालेले ते चित्तपावन. आर्यांची वस्ती उत्तर ध्रुवाजवळ असताना काही ब्राह्मणांनी चयनान्त यज्ञ करून आपले वैशिष्ट्य प्रस्थापित केले असावे व या ब्राह्मण वंशाला स्थैर्य आणणारा जो एक गट झाला असावा तो चित्तपावन गट होय. या व्युत्पत्तीशी वि. का. राजवाडे किंवा इरावती कर्वे काही प्रमाणात सहमती दर्शवितात. हिमप्रलयाच्या संकटकाळी जी पांगापांग झाली, त्यात काही टोळ्या अफगाणिस्थानातून भारतात आल्या तर काही टोळ्या इराणच्या आखाताकडे गेल्या असाव्यात. आणखी कायम स्थैर्याच्या कल्पनेत समुद्रमार्गे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर त्या काळी प्रचलित असलेल्या चिपळूण आदि बंदरांजवळ येऊन काही टोळ्या थडकल्या असाव्यात. त्या टोळ्यांची त्यांच्या पूर्वीच्या वैशिष्ट्यानुसार ‘चित्तपावन’ ही उपाधी कायम राहिली असावी. चित्तपावनांची वस्ती प्रथम चिपळूणची असून तीन हजार वर्षांपूर्वीची असावी. हे संभाव्य अनुमान विश्वनाथाच्या १७ व्या शतकातील काव्यावरून दिसते. गोरा रंग, घारे डोळे, सरळ नाक व किडकिडीत अंगकाठी आदि इराणी लोकांच्या सर्वसाधारण शारीरिक साधर्म्याशी चित्तपावनांशी तुलना काही तज्ज्ञांनी केली आहे. हा तर्क काहीसा सयुक्तिक दिसतो. हल्लीच्या चिपळूणचे फार पूर्वी चितपोळण नाव होते. त्याचा अपभ्रंश चित्तपावनात झाला असावा, असाही एक तर्क आहे.
    चित्तस्थानी पावन झालेले लोक ते चित्पावन असाही एक तर्क आहे. चित्तपावनाचे ह्रस्व स्वरूप चित्पावन करता येते. समुद्रकाठी स्मशानभूमी करण्याची सर्वसाधारण पद्धत सोयीच्या दृष्टीने प्राचीन काळापासून असावी. समुद्रमार्गे पश्चिम किनाऱ्यावर ज्या टोळ्या प्रथम स्थिरावल्या त्यांना स्मशानाजवळपास वस्ती करून राहावे लागले असावे. या परिस्थितीस धरून वरील चित्तपावन संज्ञा सुसंगत दिसते. याच संदर्भात श्रितपावनपासून चित्तपावन हा शब्द झाला, असाही एक तर्क आहे. श्रितपावन = चित्तपावन = चित्पावन. श्रित म्हणजे आश्रयाला आलेले किंवा ज्याचा आश्रय केला. म्हणजेच स्मशानभूमीचा आश्रय के त्या भूमीला पावन करणारे असाही अर्थ वरील संदर्भात लावता येतो क्षितिपावनापासून चित्तपावन शब्द झाला असल्याचा आणखी एक तर्क आहे. क्षिती म्हणजे जमीन व ‘पू’ धातूपासून पावन शब्द होतो. “पू” म्हणजे स्वच्छ करणारे, खणणारे, साफसूफ करणारे, हाही तर्क वरील तर्काला काहीसा जुळणारा दिसतो.
    या सर्व तर्कात समुद्रकिनाऱ्याच्या संबंधात एकवाक्यता दिसते. याच संदर्भात चित्तपावनांचा संबंध परशुरामाशी नेहमी लावण्यात येतो. परंतु एक-दोन अपवादात्मक उदाहरणे वगळता परशुराम चित्तपावनांचा कुलस्वामी नाही. परशुराम जयंती चित्तपावनांच्यात अभावाने साजरी होते. परशुरामाची मंदिरे दक्षिण व पूर्व भारतात अनेक ठिकाणी आहेत परंतु पश्चिम किनारपट्टीत परशुरामाचे प्रख्यात व पूर्वकालीन मंदिर नाही. हल्ली चिपळूणजवळ दापोली जवळच्या बांदरे गावाजवळील आंजर्ले गावाजवळच्या – आडेगावी, पालशेत गावी इत्यादी ठिकाणी असलेली परशुरामाची मंदिरे त्यामानाने अर्वाचीन आहेत.

    चित्तपावन व परशुराम:

    परशुरामासंबंधी पुराणात अनेक कथा प्रसिद्ध आहेत. सर्वांचा एकत्र विचार केला तर एक गोष्ट काहीशी स्पष्ट होते की, परशुराम ही काल्पनिक व्यक्ती नाही. ऐतिहासिक आहे. पश्चिम किनाऱ्याची कोकणपट्टी व परशुरामाचा जवळचा संबंध असावा. परशुरामाने समुद्रमार्गे जी ब्राह्मण मंडळी पश्चिम किनाऱ्यावर उतरविली ती सर्वच चित्तपावन नसतील. जो भाग समुद्र लाटांपासून धोकादायक नाही, अशी भूमी परशुरामाने त्यांना दाखविली असावी. पुराणात परशुरामाने बाण मारून समुद्र मागे हटविला, अशी वर्णने आहेत. ताज्या भूवैज्ञानिक पाहणीत असे दिसले आहे की, गेल्या दहा हजार वर्षांत पश्चिम किनारपट्टीच्या समुद्रपाण्याच्या पातळीत जवळजवळ ११० मीटरचे चढउतार झाले आहेत. अशा परिस्थितीत कायम वस्ती करण्यासारखा भूभाग परशुरामाने नवीन आलेल्यांना दाखविला असणे शक्य आहे आणि तेवढ्यापुरता चित्तपावनांचा व परशुरामाचा संबंध असावा.
    चित्तपावन बाहेरून समुद्रमार्गे आले असावेत. याला पूरक असा ऐतिहासिक पुरावा देण्याजोगा आहे. चित्तपावन भारतातील मूळचे नसल्याने मूळच्या जनमानसांत त्यांच्याविषयी एक प्रकारचा परकेपणा होता. अगदी पेशवाई काळापर्यंत चित्तपावन ब्राह्मणांना कोणत्याही पुण्य कर्म-कार्याच्या वेळी मूळ ब्राह्मणांप्रमाणे मानत नसत. पेशवाई स्थिर झाल्यावर, राज्यसत्ता हाती आल्यावर चित्तपावनांकडे पाहण्याची दृष्टी हळूहळू बदलत चाललेली दिसते. रोटीबेटी व्यवहाराशिवाय सौहार्द निर्माण होत नाही. राजकीय सत्तेच्या केवळ पाठिंब्याने सामाजिक परिवर्तन लवकर घडत नाही, याचा विचार करूनच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी देशस्थ घराण्यातील एका मुलीशी लग्नसंबंध केला, हा इतिहास आहे. हा संबंध पैठण येथील वाखरे या देशस्थ ऋग्वेदी कौंडिण्य गोत्रीयांशी झाला. नानासाहेबांच्या या पत्नीचे नाव राधाबाई होते. यासंबंधी आणखीही एक बाब सत्य आहे की नानासाहेबांनी देशस्थाशिवाय इतर कोणत्याही पोटजातीशी लग्नसंबंध केलेला नाही.
    कलियुगाच्या सुरुवातीला परशुराम नाहीसे झाले पुराणांतून कलियुगाची गणना केली तर हा काळ ५०६६ वर्षांचा आहे. म्हणजे साधारणपणे ख्रिस्तपूर्व इ. स. ३१०० वर्ष हा काळ चित्तपावनांचा पश्चिम किनाऱ्याच्या वास्तव्याचा होईल. अशा अनेक प्रागैतिहासिक तर्कवितर्कातून, ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार करता चित्तपावन नावाचे गाव किंवा मोठा भूभाग प्रागैतिहासिक ऐतिहासिक कालाच्या मध्यास असावा व तेथे समुद्रमार्गे आलेले व वस्ती करून राहणारे ते चित्तपावन हाही एक तर्क विचार करण्यासारखा आहे.
    भारत इतिहास संशोधन मंडळाच्या शके १८३२ च्या (इ.स. १९१० इतिवृत्तात राजवाडे यांनी चित्तपावनस्थ ब्राह्मण असा उल्लेख केला आहे. ही कल्पनाही काहीशी सुसंगत दिसते. हरिहरेश्वर माहात्म्यात चित्तपावन नावाचे क्षेत्र असल्याचा उल्लेख आहे. ‘अधुना नाम
    चित्तस्थपावनं क्षेत्रमस्तु तत्’ किंवा, आणखी ‘तच्चित पावनं क्षेत्रे लोके ख्यातिमागत तदा’ । अशी दोन वचने राजवाड्यांच्या दृष्टिकोनास पुष्टी देणारी आहेत.
    तात्पर्य, चित्तपावन हा स्थलवाचक शब्द असावा. हे स्थळ मात्र सध्याच्या कोकणपट्टीवर नक्की कोठे असेल ते सांगणे कठीण आहे. सावित्री व शास्त्री या दोन पश्चिमवाहिनी नद्यांच्या मधील भागात चित्तपावनांची वस्ती जास्त आहे. त्या भागात पूर्वीचे पावन नावाचे काही गाव अजून तरी माहिती नाही. भारतात चित् हा स्थलवाचक शब्द पुढे लावून गावाचे नाव देण्याची प्रथा आहे. उदा. चितगाव, चितफिरोजपूर, चित्तूर, चिदंबर अशांपैकी चितपावन हे गाव =| असावे की काय, हे ठरविणे आज तरी शक्य दिसत नाही.
    कोकणातून देशावर चित्तपावन समाजाचे जे स्थलांतर झाले त्यामागे सिद्दी सत्तेचा जाच, गरिबी आणि दोन्ही छत्रपतींना भासलेली शासकीय यंत्रणेची गरज ही तीन कारणे आहेत. मायभूमी सोडून माणसे जेव्हा अशी इतरत्र दूर जातात, तेव्हा त्यांना स्वत:चे बुद्धिसामर्थ्य आणि कर्तृत्व पणास लावावे लागते. पडेल ते काम चोखपणे बजावून नशीब काढणे भाग असते. त्यासाठी हवे तितके कष्ट सोसावे लागतात. कष्ट, त्याग, योजकता, स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा आणि हिशेबीपणा असे बहुत करून सर्व चित्तपावनांचे गुण दिसतात. शिकागो विद्यापीठातील विद्वान प्राध्यापिका डॉक्टर मॉरिन पॅटर्सन या गेली अनेक वर्षे चित्तपावन जातीवर संशोधन करीत आहेत. त्यांचा स्वतंत्र ग्रंथ बाहेर येण्यास कदाचित काही काळ लागेल; परंतु आतापर्यंतच्या अभ्यासावरून त्यांचे चित्तपावनांसंबंधी जे मत झाले आहे ते त्यांनी स्पष्टपणे नुकतेच नमूद केले आहे. त्यांच्याच शब्दांत (भाषांतर करून) ते उद्धृत करून चित्तपावनासंबंधीचा हा भाग पुरा
    करू.
    “पंधराव्या शतकातील चित्तपावनांचा छोटा ब्राह्मणसमूह जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत नेतृत्व स्वीकारून गेली अडीचशे वर्षे आघाडीवर आहे, याचे मला आकर्षण वाटते. या समूहाशी बरोबरी करणारा दुसरा ब्राह्मण समाज सबंध भारतात नाही. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात चित्तपावनांचा मोठा प्रभाव मान्य करावा लागेल. वास्तविक समाजातील एखादा घटक एखाद्या विशिष्ट क्षेत्रातच काम करतो असा सिद्धान्त आहे, पण इथे चित्तपावन समाज सर्वच बाबतींत आघाडीवर आहे.”
    चित्तपावनांसंबंधीच्या या तर्क-वितर्काच्या भोवऱ्यात चित्तपावनांच्या आडनावांसंबंधी काही माहिती प्रस्तुत करणे आवश्यक आहे. आतापर्यंत आडनावासंबंधी जे जुने वाङ्मय उपलब्ध आहे, त्यात स्कंदपुराणातील ६० उपनामाचे श्लोक, गोत्र मालिका, ब्राह्मणोत्पत्ति मार्तंड यांचा समावेश असून कोकणस्थांची मूळ साठ आडनावे दिली आहेत.
    त्यात शांडिल्यगोत्री यांच्यात सोमण, गांगल, भाटे, गणपुले, दामले व परचुरे यांचा उल्लेख आहे. परंतु त्यात सहस्रबुद्धे हे आडनाव नाही. त्याप्रमाणे नित्युंदन गोत्रातही वैशंपायन व भाडभोके अशा दोनच आडनावांचा समावेश आहे. याचा अर्थ असा दिसतो की, सहस्रबुद्धे हे आडनाव मागाहून प्रचारात आले. नावांची उत्पत्ती कशी असावी या संबंधात इ.स. १५६५ मध्ये महालिंगदास नावाच्या कवीने दिलेली उपपत्ती मोठी बोलकी आहे. तो म्हणतो, “जैसे स्थानी बैसले तेचि आडनाव पावले । अथवा करणीस्तव झाले । नाना कुळीचे ।” याचा अर्थ ठिकाणावरून किंवा कृतीवरून आडनावे पडल्याची समजूत होती उघड दिसते. मूळ ६० आडनावांची संख्या आज जवळजवळ ४०० झाली आहे. गोत्रमालिकाकारांनी कोणत्या मूळ आडनावाला कसे फाटे फोडले याची नोंद केली आहे. त्यांच्या मताप्रमाणे मूळच्या वैशंपायनपासून पिंपळखरे व पिंपळखरेपासून सहस्रबुद्धे (नित्युंदन गोत्री) ही आडनावे यथावकाश प्रचारात आल्याचे दिसते. सहस्रबुद्धे नावाची उपपत्ती ऐतिहासिक संदर्भात यासंबंधीच्या मजकुरात पुढे येईलच. पुढे पुढे कामाच्या हुद्द्यावरूनही सहस्रबुद्धे या आडनावात बदल झाले याची काही उदाहरणे द्यावयाची झाल्यास सहस्रबुद्ध्यांचे सरंजामे, महाजन, देसाई, हवालदार, आगलावे, फडणीस, कोतवाल, शृंगारपुतळे इत्यादी.
    आनुवंशिकता या नवीन शास्त्राचा विचार शास्त्रीय दृष्टिकोनातून करण्याची काहीशी नवी पद्धती हल्ली विचारात घेतली जाते. उत्खननशास्त्र, समाजशास्त्र, अनुवंशशास्त्र यांच्या आधारे जी शरीरवैशिष्ट्ये, आनुवंशिक रोग व शरीर विकृती ही आनुवंशिक असते, त्यात रक्तगट, रातांधता अशा अनेक विषयांचा अंतर्भाव होतो. चित्तपावन ब्राह्मणांची काही प्रमाणातील एक पाहणी झाली आहे. त्याचा थोडक्यात परामर्श घेणे उचित होईल. या ढोबळ प्रमाणाच्या पाहणीवरून नक्की निष्कर्ष काढणे जरी शक्य नसले तरी अशा लहान स्वरूपाची पाहणी काय दर्शविते, त्याचा थोडासा परिचय व्हावा म्हणून ही माहिती उद्धृत केली आहे. वरील सर्वंकष माहिती गोळा करण्यासाठी जे निकष लावले आहेत ते असे १) वैयक्तिक माहिती, २) शारीरिक ठेवण, ३) मानसिक कल, ४) सांस्कृतिक धारणा, ५) खेळ, ६) आवडीनिवडी, ७) वाचनाची आवड. या सातही निकषांना प्रत्येकी ३ गुण देण्यात आले. जसे शरीरठेवणीत उंच भरदार असल्यास ३ गुण, ठेंगू- बुटका असल्यास ० गुण व या दोन्हीमधील अवस्थेस गुणवाटप. याचप्रमाणे माणसातील विकृती, जसे मंगोलियन प्रकारचे वेड आणि खानदानी वेड, मनाचा कमकुवतपणा, मुके- बहिरेपण, रक्तदाब, स्नायूंचे दौर्बल्य, जुळेपण, लिंगसूत्रामधील दोष विकृती आदींचीही विश्लेषणात्मक पाहणी झाली. पाहणी जवळजवळ शंभर चित्तपावन कुटुंबातील घटकांवर केली. त्यात ७२ पुरुष व १७ स्त्रिया होत्या. या केलेल्या पाहणीतून खालील गोष्टी दृष्टोत्पत्तीस आल्या.
    १) शरीर बांधा – १.४० परिमाण (युनिट)
    २) त्वचारंग – १.९८
    ३) डोळ्यांचा रंग – १.५८

    रक्तगट मानसिक ठेवण
    ए- ५% १) शांतवृत्तीची, अविचल, जगाकडे निरपेक्ष दृष्टी २२%
    बी- ९% २) शांतवृत्तीची परंतु जगाच्या कल्याणाची काळजी ३%
    एबी – १% ३) जीवनाकडे कर्तुत्व दृष्टीने पाहणे १५%
    ओ – १३% ४) तापट स्वभावाची ६%

    कुलस्वामी-कुलस्वामिनी विचार:

    आपल्या सांस्कृतिक ओळखीत कुलस्वामी /कुलस्वामिनी हे दोन निकष आहेत; परंतु यासंबंधी एक प्रकारची उदासीनता व अनभिज्ञता यांचा पगडा जास्त झालेला दिसतो. वैष्णवपंथ मध्ययुगानंतर सुरू झाला असे मानले तर चित्तपावन हे मूळचे शैव आहेत ही गोष्ट सर्वमान्य आहे. प्रकृती – पुरुष या द्वंद्वात आपल्या देवताही जोडीने असतात. या दृष्टीने शंकराच्या कोणत्यातरी ईश्वर स्वरूपात हा प्रमुख कुलस्वामी असावयास पाहिजे. कुलस्वामी, कुलदेवता व ग्रामदेवता यांच्या संकल्पनेतही खूप घोटाळा दिसतो. हे खालील पाहणीवरून दिसून
    येते. शांडिल्य गोत्रीयांचे जे फॉर्म जमा झाले, त्यांपैकी १५० कुटुंबीयांनी काहीच माहिती दिली नाही. राहिलेल्या फॉर्मचा अभ्यास करताना खालील विविधता दिसून आली.
    १) कुसुमेश्वरी – महालक्ष्मी २७ %
    २) व्याडेश्वर – कोल्हापूर महालक्ष्मी १२ %
    ३) आंबेजोगाई ७%
    ४) योगेश्वरी-महालक्ष्मी – आमणेश्वर ६%
    ५) कुसुमेश्वर – आंबेजोगाई ६ %
    ६) कुसुमेश्वर – महालक्ष्मी -व्याडेश्वर ५ %
    ७) गजानन ४%
    ८) व्याडेश्वर – जोगेश्वरी ८%
    ९) आमणेश्वर – महालक्ष्मी – गजानन ६%
    १०) कोतवड्याची देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी ४ %
    ११) कुसुमेश्वर – आंबेजोगाई – व्यंकोबा २%
    १२) जोगेश्वरी – नागेश्वर ४ %
    १३) कुसुमेश्वर – जोगेश्वरी २ %
    १४) आंबेजोगाई – नागेश्वर १%
    १५) दुर्गा-व्याडेश्वर १%
    १६) कोळेश्वर – व्याडेश्वर १%
    १७) डिगेश्वर १%
    १८) व्याडेश्वर – दुर्गा १%
    १९) कुसुमेश्वरी – वाडेश्वरी १%
    २०) व्यंकटेश – जोगेश्वरी १%
    २१) व्याघेश्वर – महालक्ष्मी ( केळशी) २%

    नित्युंदन कुटुंबीयांच्या माहितीतील विविधता पुढीलप्रमाणे आहे.

    १) दुर्गा – व्याडेश्वर ३५%
    २) व्याघेश्वर – महालक्ष्मी ३०%
    ३) महालक्ष्मी (अंबाबाई) २३%
    ४) व्याघेश्वर – आंबेजोगाई ८%
    ५) विश्वेश्वर – काळभैरव ८%
    चित्तपावनांची झालेली स्थित्यंतरे, अनेक पिढ्यांचा आपल्या मूळ स्थानाशी तुटलेला संबंध व स्थानिक देवतांचा त्यांनी केलेला समावेश, अशी काहीशी कारणपरंपरा या विविधतेत असावी. कोकणातील देवता – नैवेद्य : अशीच काहीशी परिस्थिती कोकणातील देवदेवतांना प्रतिवर्षी दाखविण्यात येणाऱ्या नैवेद्यांच्या बाबतीतही दिसते. प्रत्यक्ष कोतवड्यास राहाणाऱ्या अनेक घरी चौकशी करता नीटशी यादी कोठेही मिळाली नाही. कोतवड्यातून मिळालेल्या काही माहितीपत्रकात जी यादी आहे ती अशी :

    कोकणातील देवता - नैवेद्यः

    अशीच काहीशी परिस्थिती कोकणातील देवदेवतांना प्रतिवर्षी दाखविण्यात येणाऱ्या नैवेद्यांच्या बाबतीतही दिसते. प्रत्यक्ष कोतवडयास राहाणाऱ्या अनेक घरी चौकशी करता नीटशी यादी कोठेही मिळाली नाही. कोतवडयातून मिळालेल्या काही माहितीपत्रकात जी यादी आहे ती अशी:

    १) श्री कुसुमेश्वर – एका स्वतंत्र पानावर
    २) श्री कुलस्वामिनी
    ३) श्री आदित्यदेवता  – एका पानावर चार नैवेद्य
    ४) श्री वरदानी देवता
    ५) श्री मानाई देवता
    ६) श्री वारणाई देवता
    ७) श्री जोगेश्वरी (जोगाई) – एका पानावर चार नैवेद्य
    ८) श्री वाघजाई देवता
    ९) श्री सोमया (सांब)
    १०) श्री कुसुमेश्वर (सांब) – एक स्वतंत्र पान
    ११) श्री नंदी
    १२) श्री गणपती – एका पानावर दोन नैवेद्य
    १३) श्री धामणेश्वरी – एक स्वतंत्र पान

    हे नैवेद्य वर्षातून दोनदा (१) वर्ष प्रतिपदा (पाडवा) (२) मार्गशीर्ष शु. १ (देवदिवाळी)

    २)पुणे घराणे:

    १) कुलस्वामी श्री कुसुमेश्वर – एका स्वतंत्र पानावर
    २) श्री कुलस्वामिनी
    ३) आदित्यदेवता – एका पानावर चार नैवेद्य
    ४) श्री वरदानी देवता
    ५) श्री मानाई देवता
    ६) श्री वारजाई देवता
    ७) श्री जोगाई देवता – एका पानावर चार नैवेद्य
    ८) श्री वाघजाई देवता
    ९) श्री सोमया (सांब)
    १०) श्री कुसुमेश्वर (सांब) – एक स्वतंत्र नैवेद्य
    ११) श्री नंदी – एका पानावर दोन नैवेद्य
    १२) श्री गणपती
    १३) श्री धामणेश्वर – एक स्वतंत्र पान

    कोतवडे – पुणे येथील याद्या जवळजवळ एकच आहेत.

    ३)केळये - मजगाव घराणे:

    १) श्री कुसुमेश्वर
    २) श्री महालक्ष्मी
    ३) श्री रवळनाथ
    ४) श्री महालक्ष्मी
    ५) श्री ईश्वर – यादीत वरच्या
    ६) श्री पार्वती – यादीतील फक्त पाच
    ७) श्री गणपती – नावे सारखी आहेत.
    ८) श्री नंदी
    ९) श्री नवलाई
    १०) श्री पावनाई
    ११) श्री वाघजाई
    १२) श्री मारूती
    १३) लक्ष्मी कांत
    १४) धर्म
    १५) गोग्रास

    ४) कोतवडे - वेरखळ वाडा:

    १) श्री कुसुमेश्वर
    २) श्री आदित्य
    ३) श्री महालक्ष्मी
    ४) श्री वरदान
    ५) श्री धरणंकरी
    ६) श्री कुलस्वामी – कुलस्वामिनी
    ७) श्री वाघजाई
    ८) श्री मानाई
    ९) श्री चणकाई
    १०) श्री मारुती
    ११) श्री धामणेश्वर
    १२) श्री सोमय्या
    १३) श्री गणपती
    १४) श्री पार्वती
    १५) श्री नंदी
    १६) घृष्णेश्वर

    ५) बिरवाडी - नेवरे - नागाव - गुळसुंद:

    १) श्री गणपती
    २) श्री महालक्ष्मी
    ३) श्री कुसुमेश्वर
    ४) श्री नागेश्वर जोगेश्वरी
    ५) श्री चंडी
    ६) श्री वाघजाई
    ७) श्री परशुराम
    ८) श्री वाज्वल
    ९) श्री भेरी
    १०) श्री मल्हारी मार्तंड
    ११) श्री धामणेश्वर
    १२) श्री ग्रामदेवता
    १३) श्री वास्तु देवता
    १४) गोग्रास

    ६) वाई घराणे:

    १) श्री महालक्ष्मी
    २) श्री कुसुमेश्वरी
    ३) श्री जोगेश्वरी
    ४) श्री मानाई
    ५) श्रीवर्धन
    ६) श्री धरणंकरी
    ७) श्री वाघजाई
    ८) श्री चंडी
    ९) श्री जुगाई
    १०) श्री मारुती
    ११) श्री आदित्य
    १२) श्री गणपती

    वरील सहा याद्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की कोतवड्याच्या यादीशी पडताळून पाहता फक्त ६/७ नावेच सारखी आहेत. कदाचित स्थानांतरामुळे नवीन गावाच्या देवतांची (ग्रामदेवता) नावे सोईनुसार वाढत गेली असावीत. यावरून स्थानांतरांचा मागोवा घेणे कदाचित शक्य होईल. उदा. मल्हारी – मार्तंड हा देव कोकणापेक्षा घाटावर चढून आल्यावरच्या भागातील प्रसिद्ध देव असावा. देवतांच्या याद्या व स्थानांतरे हा कदाचित एक संशोधनाचा विषय होऊ शकेल.

    आपले कुलाचार:

    कुलस्वामी-स्वामिनी यासंबंधीच्या विचारानंतर सहस्रबुद्धे यांच्या घराण्यातून आचरणात असलेल्या कुलाचारांसंबंधी माहिती प्रस्तुत करणे आवश्यक आहे. बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीस अनुसरून हे जुने आचार आता काही प्रमाणात नामशेष होत असून पुढे येणाऱ्या काळात त्याला आणखी ओहोटी लागणेही शक्य आहे. अशा कारणासाठी आपल्या कुलाचारासंबंधीची माहिती कोठेतरी एकत्र नोंदवलेली असणे फार आवश्यक आहे, असे अनेकांचे, विशेषत: वृद्ध कुटुंबीयांचे म्हणणे पडल्यामुळे आपल्या कुलाचारांचे काहीसे तपशीलवार वर्णन करण्याचे ठरविले आहे. आपले कुलाचार हा आपल्या धर्मांतर्गत संस्काराचा एक भाग आहे. सध्या एक प्रश्न नेहमी विचारला जातो की, संस्कारांची आवश्यकता काय आहे? महत्त्व काय आहे? यासंबंधी आज अनेक जिज्ञासू लोकांमध्ये विचारमंथन चालू आहे. यानिमित्ताने त्याचा मागोवा घेणे प्रथम आवश्यक व्हावे.
    हिंदू धर्मामध्ये मानवी देहावर जन्मापूर्वी व जन्मानंतर मिळून सोळा संस्कार करावयास सांगितले आहेत. वेदांच्या संहिता सूत्रे, धर्मसूत्रे, निबंध ग्रंथ आणि प्रयोग ग्रंथ या सर्वांची या संस्कारांना मान्यता आहे. काही अपवाद वगळता या सोळा संस्कारांपैकी उपनयन (मुंज) आणि विवाह हे दोन संस्कार आजमितीस जीव मुठीत धरून कसेबसे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात दिसतात.
    मनुष्याच्या ठिकाणी पात्रता दोन प्रकाराने येते. एक तर ती पापक्षालनाने येते किंवा नवीन गुण उत्पन्न केल्याने येते. संस्कारांनी नवीन गुण उत्पन्न होतात. म्हणून संस्कारांचा मूळ उद्देश सांगत असताना तंत्रवार्तिककारांनी गुणाधान व दोषापनयन असे शब्द वापरले आहेत. गुणाधान म्हणजे सद्गुणांचे बीजारोपण करणे आणि दोषापनयन म्हणजे दोष किंवा दुर्गुण बाजूला सारणे.
    यज्ञांमध्ये सर्व हवनीय वस्तूंचे शेवटी भस्म होते. शेवटी तो करणाऱ्या यजमानाचे किंवा त्या यज्ञाचे काय होते? हा प्रश्न प्राचीन काळापासून आजपर्यंत विचारला जाणारा प्रश्न आहे. पूर्वमीमांसाकारांनी या प्रश्नाची सोडवणूक म्हणून या सर्वांकरिता अपूर्व किंवा अदृष्ट अशी शक्ती किंवा संस्कार मानलेला आहे. यज्ञ समाप्तीनंतर यज्ञकर्त्या यजमानावर असा एक संस्कार होतो की जो प्रत्यक्ष दिसत नाही’ म्हणून तो ‘अदृष्ट’ आणि यज्ञ करण्यापूर्वी त्याच्या ठिकाणी तो नसतो म्हणून तो ‘अपूर्व’ अर्थात या अदृष्ट किंवा अपूर्व शक्तीचा संस्कार किंवा अनुभूती मात्र यज्ञकर्त्या यजमानाला येते. संस्कारामागे अपेक्षित फल पुष्कळवेळा मिळालेले दिसत नाही. परंतु आपल्या परंपरेत संस्कारांवरची श्रद्धा मात्र यत्किंचितही कमी झालेली दिसत नाही. त्याबाबत निष्ठांमध्ये तडजोड झाल्याचे दिसत नाही. हे संस्कार कालबाह्य, अनावश्यक किंवा अंधश्रद्धेवर आधारलेले आहेत अशी भूमिका ज्यांनी घेतली, त्यांनी या संस्कारांचा दर्जा असलेली पर्यायी व्यवस्था मात्र समाजात निर्माण केली नाही. यामुळे धड ना इकडे – धड ना तिकडे अशी दोलायमान अवस्था आज समाजात पाहावयास मिळते. सध्याच्या अर्थप्रधान भौतिक संस्कृतीत, समाजाच्या सर्व क्षेत्रांत संस्कारांचा अभाव आहे. आणि समाज अधोगतीला जाण्याचे; तेच प्रमुख कारण आहे, असे बोलले जाते, लिहिले जाते. त्या दृष्टीने संस्कार , शिबिरे, संस्कार वर्ग वगैरेचे आयोजन केले जाते.
    समाजात सांस्कृतिक व धार्मिक कल्पना कालाच्या ओघात बदलत चाललेल्या दिसतात व कालच्या फॅशन्स कधी टाकल्या जातात व काही काळाने त्याच पुन्हा लोकप्रिय होतात. या वस्तुस्थितीत आपले कुलाचार व त्यासंबंधीची खुलासेवार माहिती कोठेतरी नोंदविली गेली पाहिजे. यासंबंधात माहिती असणारी माणसे कालौघात नाहीशी झाली, तर कुलाचारासंबंधी कधी कोणास आकर्षण निर्माण झाल्यास ही माहिती उपयोगी पडेल या दृष्टिकोनातून आपल्या कुलाचारासंबंधी माहिती या ग्रंथात नोंदवीत आहे. सहसबुद्धे घराण्यात जे काही कुलाचार पाळले जातात त्यांचा तपशील पुढे देत आहे.

    १) चैत्र गौरी:

    वर्ष प्रतिपदेनंतर म्हणजे चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत घरातील देवीची मूर्ती वेगळी बसवतात. वाटी-ताम्हन, पंचपात्रामध्ये काठोकाठ तांदूळ भरून त्यात देवी ठेवतात. रोजच्या देवांच्या पूजेबरोबर तिची पूजा करतात. सवडीनुसार ओळखीच्या सवाष्णींना बोलावून हळदी-कुंकवाचा छोटासा समारंभ करण्याची प्रथा अनेक घरांतून आहे. भिजवलेल्या हरभऱ्याने ओटी भरून, आंब्याची डाळ, बत्तासा, काकडी व बरोबर उसाचा रस देण्याची जुनी रीत आहे.

    २) शिवामूठ:

    श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी, नवीन घरी आलेल्या सुनांसाठी हा आचार आहे. शंकराच्या देवळात जाऊन किंवा घरातच शंकराची पूजा करून त्यास एकमूठ व एक चिमूट धान्य पिंडीवर वाहतात. पहिल्या सोमवारी पांढरे तीळ, दुसऱ्या सोमवारी तांदूळ, तिसऱ्या सोमवारी मूग किंवा मूगडाळ आणि चौथ्या व पाचव्या सोमवारी जवस किंवा गहू अशी वेगवेगळी धान्ये शिवामुठीसाठी उपयोगात आणतात.

    ३) मंगळागौर पूजा:

    लग्न झाल्यानंतर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा एकट्याने किंवा एकत्रितरीत्या करण्याची पद्धत असते. हे व्रत लागोपाठ पाच वर्षे आचरावयाचे असते. पाच वर्षांनंतर सोईने कोणत्याही वर्षी या व्रताचे उद्यापन करतात. हे व्रत समारंभपूर्वक करण्याची प्रथा सर्वदूर प्रचलित असल्याने त्याचे खुलासेदार वर्णनाची आवश्यकता नाही.
    श्रावण महिन्यातलाच आणखी एक कुलाचार म्हणजे नागपंचमीस नागपूजेचा. घरीच लाकडाच्या पाटावर गंधाने नाग व त्याची नऊ नागकुळे काढून घरातील पूजेच्यावेळी त्या नागाच्या चित्राची पूजा करून गूळ खोबरे, जोंधळ्याच्या लाह्या व दुधाचा नैवैद्य दाखवतात. ही पूजा घरातील पुरुष करतात.

    ४) हरतालिका व शाडूच्या गणपतीचा उत्सव:

    भाद्रपदात आचरावयाचा कुलाचार म्हणजे हरतालिका पूजा व शाडूच्या गणपतीचा उत्सव. गणपती सर्वसाधारणपणे पाच दिवसांचा असतो. अगदी क्वचितच झालेल्या नोंदीवरुन काही घरात दीड दिवसच गणपती बसवितात. काही नोंदीत गौरी – गणपती बरोबर विसर्जन करण्याची प्रथा दिसून येते. याच काळात गौरीपूजन हा एक विशेष आचार आहे. गणेशचतुर्थीनंतर येणाऱ्या अनुराधा या चंद्र नक्षत्रावर गौरी आवाहन, गौरीपूजन व मूळ नक्षत्रवर गौरी विसर्जन असे या तीन दिवसाचे वर्णन पंचांगात पहावयास मिळते. सहस्रबुद्धे घराण्यात खड्याच्या गौरी आणतात. गौरी आणण्याचे काम जाणती कुमारिका किंवा विवाहित माहेरवाशीण यांच्याकडे असते. नदीकाठी, तळ्याकाठी किंवा विहिरीजवळील बोरांच्या बियांएवढे पाच खडे निवडून गौरी म्हणून त्यांना वाटीत किंवा ताम्हनात ठेवून घरी आणावयाच्या असतात. खडे गोळा केल्यानंतर जागेवरच त्यांना दूध, पाण्याने स्नान घालून हळद कुंकू वाहून साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवितात. बरोबर जाणारी एखादी मुलगी घरच्या देवात असलेली घंटी वाजवत वाजवत देवीना घरी आणतात. प्रवेशद्वाराजवळ यजमानीण गौरी घेऊन येणाऱ्या बाईच्या पायांवर दूध-पाणी घालून देवीस निरांजन ओवाळून गौरींचे स्वागत करते. प्रवेशद्वारापासून घरातील प्रत्येक खोलीच्या मार्गांवर रांगोळीने पाऊले काढलेली असतात. यजमानीण गौरीबरोबर हिंडून घरातील प्रमुख ठिकाणांची ओळख गौरीला करून देते – जसे हे देवघर, हे स्वयंपाकघर, ही तिजोरी, इत्यादी, इत्यादी. त्यानंतर गौरी स्थानापन्न होतात. दुसऱ्या दिवशी पंचामृतीपूजा करून गौरींना घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवितात. भोजनही असते. तिसऱ्या दिवशी विसर्जनाचे वेळी खीर व कानोला (मुरडून बंद केलेली करंजी) हे दोन पदार्थ गौरींबरोबर त्यांची शिदोरी म्हणून देऊन विसर्जित करतात.

    ५) नवरात्र उत्सव:

    यानंतरचा एक कुलाचार म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणारा नवरात्र उत्सव. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरातील देवी वेगळी बसवून पूजेनंतर तिच्या डोक्यापर्यंत पुरेल अशी माळ रोज टांगतात. ही माळ टांगण्याच्या लांबीपेक्षा सव्वापट लांब असून पाव भाग मुडपून मूळ टांगण्याच्या माळेबरोबर टांगली जाते. दसऱ्याच्या दिवशी दहावी माळ बांधून झाल्यावर सर्व माळा उलट्या करून वर अडकवतात. अकराव्या दिवशी देवीस मूळच्या ठिकाणी परत ठेवली जाते. अश्विन शुद्ध अष्टमीस तांदुळाच्या उकडीचा देवीचा मुखवटा करून तिची पूजा व घागरी कुंकण्याचा कार्यक्रम अनेक चित्तपावनात असतो, परंतु सहस्रबुद्धे यांचे घरांत ही पद्धत नाही. (उठती – बसती सवाष्ण भोजनास बोलावतात.) उठती बसती सवाष्ण याचा अर्थ नवरात्राच्या प्रथम दिवशी व शेवटल्या दिवशी तीच सवाष्ण घालणे होय.

    ६) गोपद्म:

    विवाहानंतर पहिल्या चातुर्मासाचा नियम म्हणून रोज तीस – तीन (तेहेतीस) गोपद्मे रांगोळीने काढून त्यांची पूजा करण्याचा कुलाचार आहे. काही घरांतून पाच वर्षांची गोपद्मे म्हणून १६५ गोपद्मे एकदमच काढून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. या व्रताचे उद्यापन म्हणून पाच कुमारिकांना बोलावून त्यांना हळदीकुंकवाबरोबर प्रत्येकीस अनुक्रमे बांगड्या, केळीची फणी, विडादक्षिणा, ऊस आणि परकर-पोलक्याचे वाटप करतात.

    ७) बोडण:

    आपल्या धार्मिक व सांस्कृतिक ओळखीचा आणखी एक दुवा म्हणजे आपल्या कुलाचारातील बोडण हा विधी. हा कुलाचार बव्हंशी फक्त चित्तपावनांतच आढळतो. सर्वसाधारणत घरातील प्रत्येक जनन आणि मंगलकार्यानंतर बोडण भरण्याची चाल सर्व सहस्रबुद्धे घराण्यात आहे. अगदीच थोड्या जणांनी प्रतिवर्षी बोडण भरण्यासंबंधी कळविले आहे. यासंबंधी माहिती मिळवीत असताना असे दिसून आले की, या विधीविषयी अनभिज्ञता पुष्कळ स्त्रियांत आहे. म्हणून या विधीविषयी संपूर्ण माहिती ग्रंथित केली आहे.
    बोडण शब्दाची व्युत्पत्ती बव्होधन किंवा वर्धन अशी सांगितली जाते. ही योगेश्वरी देवीची पूजा आहे, असा समज आहे. बोडणासाठी निदान तीन सवाष्णी व एक कुमारिका अवश्य आमंत्रित करतात. याशिवाय घरची यजमानीण वेगळी. सवाष्णी चित्तपावनच असाव्यात. देशस्थ किंवा कऱ्हाडे जातींच्या चालत नाहीत. गर्भार नसलेली व मूल असलेली सवाष्ण आमंत्रित करण्याचे शक्यतो पाळतात. कुमारिकासुद्धा चित्तपावनच असावी. दहा वर्षांच्या आतील वयाची असली पाहिजे.
    बोडणाला येणाऱ्या सवाष्णी घरी न्हाऊनच येतात. पुष्कळ ठिकाणी बोडणासाठी बोलावणे करावयाच्या वेळी तेल-शिकेकाई इत्यादी वस्तू त्यांना आधीच देण्याची प्रथा आहे. बोडणाकरिता पुरण घालावे लागते, तळण तळावे लागते. खीर करतात. बोडणाच्या दिवशी देवीची पूजा करतात. पूजेच्या अगोदर देवीसाठी कण केले असते. लेणारत (कणकेचे पाट्याच्या आकाराचे सिंहासन व वरवंट्याच्या आकाराचा लोड) करतात. लोडाला टेकून सिंहासनावर देवी ठेवतात. पाठीमागे ‘हारादेरा’ (कणकेचे गडूच्या आकाराचे भांडे) ठेवतात. यात दूध घालतात. वर झाकण असते.

    बोडणाची-रांगोळी
    बोडणाची-रांगोळी

    सिंहासनाच्या चोहोबाजूस कणकेचे खांब करून ठेवतात. देवीला कणकेचे दागिने, मणिमंगळसूत्र, नथ, जोडवी विरवल्या, बांगड्या, गोंडेदोरे, इत्यादी करतात. निकलहईची पितळेची परात घेऊन तीत सिंहासनस्थ देवी ठेवतात. परातीत पाच पानावर पाच नैवेद्य ठेवतात. याच्या आधी यजमानीण देवीची पंचामृती पूजा करते. या पूजेला भिक्षुकाची गरज लागत नाही. देवी ताम्हणात घालून पूजा करतात. पूजा केल्यावर ती परातीत धोतऱ्याच्या पानावर ठेवतात. तेथे पुन्हा यजमानीण देवीची पूजा करते. पूजा करताना कुमारिका यजमानिणीच्या उजव्या हाताला बसलेली असते. बाकीच्या सवाष्णी परातीभोवती बसतात. पूजा झाल्यावर सवाष्णी व कुमारिका देवीला हळदकुंकू वाहतात. त्याबरोबरच सर्व जणी भंडारा वाहतात. भांडाराही कणकेचा असतो. असे पाच भंडारे करतात. नंतर कणकेचे पाच दिवे केलेले असतात. ते लावून देवीची आरती करतात. दिवे ताटात असतात. दिव्यांच्या बाजूला कणकेची दोन मुटकुळी करून ठेवतात. दिव्यांना व मुटक्यांना कुंकू लावतात. दिवे तुपाचे असतात, पण वाती फुलवाती असतात. सर्व बायका हातात अक्षता घेऊन ताटाला हात लावतात. यजमानीण ताट धरते. आरतीनंतर परातीतल्या नैवेद्यांवर एकेक दिवा ठेवतात. देवीपुढे मुटकुळी ठेवतात.

    मग सवाष्णी, कुमारिका व यजमानीण उताणे हात करून परातीत ठेवतात. संध्येची चांदीची-पितळेची पळी घेऊन तिला बायकांची गळेसरी गुंडाळतात. अशा या पळीने यजमानीण देवीला पाच वेळा पंचामृत घालते, मग बोडणाच्या सवाष्णीच्या हातावर घालते. इतके झाल्यावर सवाष्णी, कुमारिका व यजमानीण सर्व मिळून पितळीतले नैवेद्य कालवितात. कालविताना एक वेगळीच सवाष्ण स्त्री राहिलेले पंचामृत, बोडणात गरजेनुसार घालते. नंतर यजमानीण कोवारणीस विचारते ‘धायलीस का?’ अगोदर शिकवून ठेवल्याप्रमाणे कुमारिका ‘होय’ म्हणते. बोडणाच्या सवाष्णी आपल्याबरोबर आपल्या घरातून दूध आणतात, ते या वेळी बोडणात घालतात. तसेच यजमानीण आपल्या घरातले दूध घालते. बोडण कालविल्यावर घरातील मंडळी नमस्कार करतात. नंतर आतील देवी यजमानीण घेऊन धुते. देवीला पुरण लावून धुतात. याचप्रमाणे बोडणाच्या सवाष्णीही हातांना पुरण चोळून हात स्वच्छ करतात. देवीला स्नान घातल्यावर यजमानीण तिला हळदकुंकू वाहते व तिच्या तोंडाला साखर लावते आणि ती देवांमध्ये ठेवून नमस्कार करते. नंतर सवाष्णी व कुमारिका भोजन करतात. प्रत्येकी यथाशक्ती दक्षिणा देतात. कुमारिका व सवाष्ण स्त्रिया या मायलेकी असता कामा नये. कुळात कोणीही गर्भार स्त्री असल्यास बोडण घालीत नाहीत. एवढेच नव्हे तर कोणत्याही गर्भार स्त्रीने बोडण पाहता कामा नये. पाहिले असता गर्भपात होतो, असा समज आहे. बोडण दुपारी बारा वाजण्याच्या आत भरले पाहिजे, असा निर्बंध आहे.
    गोंधळाची पद्धत सहस्रबुद्धे घराण्यात कुलाचार म्हणून नाही. एकदोन फॉर्म्समध्ये गोंधळाची नोंद आहे. कदाचित तो हौसेचा एक भाग असावा.
    बोडणाखाली म्हणजे परातीखाली जी रांगोळी काढतात ती इतर रांगोळीहून निराळ्या प्रकारची असते. तिचा नमुना खाली दिला आहे. बोडणालाच मोटन म्हणतात. मेहेंदळेकृत कृत्यसंग्रहावरून योगेश्वरीची ही पूजा आहे, असे दिसते.

    आरती बोडणाची
    जयदेवी जयदेवी जय अंबामाता।
    बोडण भरूया आनंदे आता।
    जयदेवी जयदेवी ॥धृ॥
    हळदी-कुंकू आणा पाने विड्याची।
    गंध अक्षता फुले वासांची।
    गूळ खोबरे केळे फाया वासाचा।
    पंचामृत घाला विडा दक्षिणा ॥१॥
    परातीमध्ये नैवेद्य पाच।
    लेणे अंबेसी वाहू ह्या डेऱ्यास।
    कापूर उदबत्ती दिवे ही पांच।
    दाखवूया आता महा नैवेद्यास ॥२॥
    आल्या पांचजणी घाला दूध पाणी।
    हळदी-कुंकू देऊनी भरा ओटीसी।
    परात आणा काढा रांगोळी।
    पांची नैवेद्य भरा सकाळी ॥३॥
    गणपतीची पूजा कराहो आधी।
    कणकेच्या चौरंगी बसली अंबाही।
    लेणी वाहूनिया करू ही आरती।
    बोडण खेळे ही पद्मावती ॥४॥

    सहस्रबुद्धे घराण्यातील आणखी काही कुलाचार:

    (१) नवरात्र, उठता, बसता, सवाष्ण ब्राह्मण, ललिता पंचमीची पूजा. ४८ दुर्वांच्या ४८ जुड्या करून देवीला वाहणे, ४८ बत्ताशांचे वाण ब्राह्मणाला देणे.
    (२) देवदिवाळीचे नैवेद्य.
    (३) पौष महिन्यातील मंगळवार आळणी करणे. तिखट, मीठ न खाणे, उपवास सोडतानासुद्धा भाजके खाणे, तिखट, मीठ न खाणे. ५ घरी जोगवा मागून आणून त्या तांदळाचा भात दुधाबरोबर खाणे.

    संदर्भग्रंथ:

    (१) ऋग्वेद संहिता- सातवळेकर
    (२) ऋग्वेद-दर्शन – रामचंद्र गोविंद कोलंगडे १९५४
    (३) बृहद्देवता
    (४) गोत्रविचार – जी. आर. परांजपे
    (५) व्याडेश्वरोदय – विश्वनाथ (गुहागर) – डॉ. पुसाळकर Translated by Kevalananda Commemoration Ltd. (६) Geology of India – M. S. Krishnan
    (७) मीमांसा प्रकाश
    (८) भारत इतिहास मंडळाचा अहवाल शके १८३३/१९३२
    (९) Hindu Daily
    (१०) मार्कंडेयपुराण
    (११) यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मणांचा इतिहास
    (१२) गणेशपुराण
    (१३) सर्वानुक्रमणी – ज्ञानकोश खंड ३
    (१४) Journal of Vedic Studies V2
    (१५) Indian Anti 1912
    (१६) कालनिर्णयावबोध – अनंत दैवज्ञ (शके १४८८)
    (१७) भारतीय जोति:शास्त्र १९३१
    (१८) Foundation of culture by Dr.Dhurye
    (१९) Journal of the University of Bombay V. R. II, July 1933 by Iravati Karve
    (२०) कोकणस्थ चित्तपावन ब्राह्मणांचे मानवशास्त्रदृष्ट्या संशोधन – इरावती कर्वे
    (२१) द इलस्ट्रेटेड विकली लिंडा कॉक्स, २२ फेब्रुवारी १९७० – चित्तपावनांसंबंधी विशेष सचित्र लेख
    (२२) Anthropometric Measurements and Blood groups of Maharashtra Brahmins – A thesis by – K. C. Mohrotra, 1966
    (२३) बाळाजी बाजीराव यांचा देशस्थ घराण्याशी संबंध – त्रैमासिक ४ १-४ (शके १८४५) (भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे)
    (२४) डॉ. मॉरिन पॅटर्सन, रविवार सकाळ, २७ मार्च १९८३.
    (२५) डॉ. शंकर अभ्यंकर, भक्तिकोष १९९५

    भाग १

    शांडिल्य गोत्री सहस्रबुद्धे:

    आपले मूळ गाव कोतवडे व मूळ पुरुष महादेव बिन कसो विश्वनाथ यांच्याविषयी भूविज्ञानाच्या यच्चयावत साधनांद्वारे व एका घराण्याच्या २२ पिढ्यांच्या वंशवृक्षाच्या बांधणीमुळे गणपुले यांचे सहस्रबुद्धे झालेला काळ आदिलशाही राजवटीतील अंदाजे इ.स. १५३५ चा, ही विश्वसनीय ऐलहिासिक दस्त-ऐवजांच्या आधारे प्रथमच पुढे आलेली माहिती. ऐतिहासिक कोतवड्यातील गावणवाडा, वेरखळवाडा, धामणवाडा, उंबरवाडा व नवेदरवाडा व गणपुले यांचे मूळ गाव केळ्ये येथून झालेली सहस्रबुद्धे कुटुंबीयांची (१) घाट चढून दिशावर आलेली व (२) किनाऱ्या-किनाऱ्याने स्थलांतर करणारी अशा दोन प्रमुख भौगोलिक निकषांवर आधारित अनेक ठिकाणांच्या नकाशासह, जवळजवळ पन्नासावर घराणी- शाखाउपशाखा यांची संभाव्य स्थानांतराप्रमाणे कालनिहाय विभागणी व ८ ते २२ पिढ्यांच्या जवळजवळ शंभराच्या वर वंशावळ्यांसहित महाजन, सरंजामे, देसाई इत्यादी नाव बदलांची माहिती.

    शांडिल्य गोत्री सहस्रबुद्धे

    आपले कोतवडे:

    महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राकडे निमुळती होणारी व नैर्ऋत्य-ईशान्य अशी पसरलेली डोंगरांची रांग ज्या ठिकाणी वायव्य-आग्नेय दिशांकडून येणाऱ्या डोंगरांच्या रांगेस मिळते, अशा एका मोठ्या घळीत या डोंगरांच्या पायथ्याशी नैर्ऋत्यवाहिनी कुसुम नदी व पश्चिमवाहिनी जून गावाजवळची नदी या दोन नद्यांच्या दुआबात कोतवडे गाव वसले आहे. डोंगर माथ्यावरची विस्तीर्ण कातळे, उभ्या चढणाचे उतार, नद्यांच्या संगमानंतर पश्चिमेस अरबी समुद्राला मिळणारी खाडी, असा निसर्गरम्य परिसर या गावाला लाभला आहे.
    रत्नागिरीहून गणपतीपुळे किंवा नेवरे येथे जाणाऱ्या बसेस कोतवड्यावरून जातात. रत्नागिरी-कोतवडे अंतर आठ-नऊ किलोमीटर असून रत्नागिरीहन सुमारे दर अर्ध्या तासाच्या अंतराने या बसेस सटतात. रत्नागिरी-कोतवडे या मार्गावर ऑटोरिक्षाही मिळू शकतात.
    कुसुम नदी व तिला मिळणारी पश्चिमवाहिनी नदी यांच्या काठांवर बऱ्याच वाड्या वसल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वर्गीकरणानुसार कोतवडे हे खालसा धारेकरी गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

    कोतवडे-गावाचा-प्राकृतिक-नकाशा

    येथे अनेक खोतांचे वाडे असल्याने खोत-वाडे याचा अपभ्रंश होऊन कोतवडे हे गावाचे नाव झाले असावे. गावकृत्यासाठी कोतवड्याचे बारा भाग केले असून त्यांना बारावाडे म्हणतात. ते बारा वाडे असे (१) गावणवाडा (२) उंबरवाडा (३) लावगणवाडा (४) वेरखळवाडा (५) धामेळेवाडा (६) नवेदरवाडा (७) घारपुरीवाडा (८) ढोकमळेवाडा (९) शेवडवाडा (१०) नायतवाडा (मुस्लिमवाडा) (११) जूनवाडा आणि (१२) वारेवाडा. यांपैकी पहिल्या सहा वाड्यांत सहस्रबुद्धे कुटुंबांचे वास्तव्य होते.
    वरील प्रत्येक वाड्यात ४/५ ब्राह्मणांची घरे असून ३०/४० कुणबी, भंडारी वगैरे समाजाची घरे आहेत. या गावची देवकीची सर्व कार्ये व त्यांची व्यवस्था हल्ली वेरखळवाड्याचे श्री. आत्माराम नारायण सहस्रबुद्धे पाहतात. सध्या कोतवड्यात सहस्रबुद्धे यांची पाच-सहा नांदती घरे आहेत. घारपुरे, वझे, आठवले, जोगळेकर अशी काही अन्य चित्पावनांची घरेही नांदती आहेत.
    कोतवडे येथे स्वतंत्र ग्रामपंचायत, सबपोस्ट ऑफिस, टेलिफोन व तारसेवा उपलब्ध आहेत. सांगली बँकेची एक शाखा, सार्वजनिक दवाखाना अशा सोयीही आहेत. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. हापूस आंबे, काजू, कोकम, फणस इत्यादींचा व्यापारही काही प्रमाणात चालतो.
    कोतवडे येथे (१) श्रीकुसुमेश्वर (वेरखळवाडा) (२) श्रीधामणेश्वर (धामेळे) आणि (३) श्रीमहालक्ष्मी अशी तीन स्वयंभू देवस्थाने आहेत. तसेच (१) श्रीआदित्यनाथ (२) मारुती (३) धरणंकरी (४)वरदानदेवी (५) योगेश्वरीदेवी (६) वाघजाईदेवी आणि (७) सोमेश्वर अशी मंदिरे आहेत. त्यांचे वार्षिक उत्सव व कार्यक्रम करण्याकरिता देवस्थान पब्लिक ट्रस्ट, कोतवडे नावाचा ट्रस्ट असून त्याच्यामार्फत श्रीमहालक्ष्मी मंदिरात श्रावण महिन्यात सात दिवस अखंड नामसप्ताह, श्रीकुसुमेश्वर मंदिरात एक दिवस नामसप्ताह, असे सर्व गावाचे म्हणून उत्सव साजरे होतात. शिमगा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. तो १५ दिवस चालतो. उत्सवाच्या वेळी वरदान, आदित्य, धरणंकरी व महालक्ष्मी यांची पालखी घरोघरी फिरविण्याची प्रथा आहे. वरील उत्सवाशिवाय श्रीमहालक्ष्मी मंदिरात व श्रीकुसुमेश्वर मंदिरात कार्तिकी उत्सव आणि महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. श्रीकुसुमेश्वर महालक्ष्मी ब्रह्मवृंद मंडळ, कोतवडे यांच्यामार्फत वरील उत्सव होतात. गाववर्गणी करून श्रावण महिन्यात एका सोमवारी चोवीस तास अखंड रुद्राभिषेक (संततधार) व दुसऱ्या दिवशी समारत्न म्हणजे प्रसादाचे गावजेवण होते. चैत्र महिन्यात गुढीपाडवा ते अक्षय्यतृतीया अशी वसंत पूजा श्रीकुसुमेश्वर मंदिरात होते. यानिमित्त संध्याकाळी पूजा-अभिषेक, आरती, मंत्रपुष्प व शेवटी तीर्थ-प्रसाद असा कार्यक्रम असून याचा सर्व खर्च गावातील प्रत्येकाने एक एक दिवस करण्याची प्रथा आहे.
    उंबरवाडी व धामेळेवाडी येथे अनुक्रमे श्रीमहालक्ष्मी व श्रीधामणेश्वर ही नव्याने स्थापन केलेली मंदिरे आहेत. वेरखळवाडीत श्री. आत्माराम नारायण सहस्रबुद्धे यांचे एक खासगी विठ्ठल मंदिर आहे. श्रीकुसुमेश्वराचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. देवाच्या पिंडीची शाळुंका उत्तराभिमुख आहे. सर्वसाधारणपणे शंकराच्या मंदिरात शाळुंका आपल्या उजव्या हाताच्या बाजूस असते. कुसुमेश्वराची शाळुंका दर्शन घेणाऱ्याच्या डाव्या हातास येते. परंपरागत मांडणीपेक्षा शाळुकीची मांडणी ही वेगळी असून, हे येथील एक वैशिष्ट्य आहे. या गावातील दुसरे एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे एकाच गावातील, एकाच गोत्राच्या, एकाच कुळातील सहस्रबुद्धे घराण्यांचे कुलस्वामी वेगवेगळे आहेत. वेरखळ व उंबरवाड्यातील सहस्रबुद्धे यांचा कुलस्वामी-स्वामिनी श्रीकुसुमेश्वर- महालक्ष्मी असून राहिलेल्या ४/५ घरातील सर्व सहस्रबुद्धे यांचा कुलस्वामी स्वामिनी श्रीव्याडेश्वर-योगेश्वरी आहे. ही सकृतदर्शनी मोठी विचित्र परिस्थिती दिसते. या दोन्हीही विचित्र परिस्थितींबद्दल संभाव्य कारणपरंपरा चर्चा पुढे येईलच. त्याआधी प्रथम कोतवडे गावाच्या उत्पत्तीविषयी भूवैज्ञानिक संशोधनातून जी खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे, ती सांगोपांग माहिती काहीशा विस्ताराने येथे सादर करीत आहे. वरील संशोधनाचा मथितार्थ थोडक्यात सांगावयाचा झाल्यास, सध्याचे कोतवडे गाव साधारण ६०० वर्षांपूर्वी समुद्राने व्यापलेले होते. समुद्र मागे हटून सध्याचे गाव वसले आहे ते ५००/५५० वर्षांपूर्वी. कोतवडे गावाच्या उत्पत्तीसंबंधी एक स्थानिक स्तरावरचा विचार करताना, प्रथम त्या काळची प्रादेशिक स्तरावरील भूवैज्ञानिक परिस्थिती काय होती, म्हणजेच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर- कोकणात – त्याकाळी काय नैसर्गिक, राजकीय, सामाजिक घटना घडत होत्या, त्यांचा साकल्याने विचार करणे आवश्यक आहे.
    ज्याला आज आपण कोकण म्हणून ओळखतो तो भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा एक भाग आहे. या भागाचे अपरांत प्रदेश असे नामकरण पेरीप्लस टॉलेमी या प्राचीन पर्यटकाने केले आहे. हा अपरांत प्रदेश नैसर्गिक सुखसोयींनी कधीच समृद्ध नव्हता. ज्यावर काही उगवत नाही अशा जांभ्या दगडाने व्यापलेला हा भूभाग, वर्षातून चार महिने कोसळणारा लहरी पाऊस, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नसलेला दगड व समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वारंवार होणारे बदल ही प्रमुख कारणे हा प्रदेश सुसंपन्न न होण्याच्या मार्गातील आहेत. एकूण कोकण विभागाचा भूपुरातत्वीय (Geo Archeology) पद्धतीने जो अभ्यास आतापर्यंत झाला आहे, त्यावरून या प्रदेशाची गेल्या दहा हजार वर्षांची तीन विभागांत विभागणी करता येते.
    (१) ६००० वर्षे इ.स. पूर्व ते ३००० वर्षे इ.स. पूर्व काळ
    अर्ली निओजीन (Early Neogene)
    (२) २००० वर्षे इ.स. पूर्व ते १००० वर्षे इ.स. पूर्वपर्यंतचा काळ मिडल निओजीन (Middle)
    (३) १००० वर्षे इ.स.नंतरचा काळ – लेट निओजीन (Late Neogene) साधारणपणे इ. स. पूर्व १२व्या शतकात कोकणात काहीशी सुधारलेली मानवी वस्ती असावी व कोकण किनारपट्टीचा उपयोग समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारासाठी केला जात असावा. यासंबंधी अनेक प्राचीन उल्लेख आढळतात. याच काळात कल्याण, सोपारा अशी काही महत्त्वाची बंदरे त्या काळी होती. याचेही पुरावे आता उपलब्ध आहेत. साधारण १३व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंतच्या काळात या भागात अनेक नैसर्गिक आपत्ती ओढवल्या असाव्यात. इ. स. पूर्व १३व्या शतकाच्या सुमारास जगभर छोट्या हिमयुगाची सुरुवात झाली. याची काही महत्त्वाची लक्षणे म्हणजे कमी झालेले तापमान व समुद्राच्या पातळीत झालेले बदल. अरबी समुद्राजवळील कोतवड्याच्या परिसरावर याचा परिणाम झाला असणारच, याचाच आणखी पाठपुरावा पश्चिम किनारपट्टीत अभ्यासिला गेला. त्यात प्रामुख्याने खालील बदल प्रकर्षाने दिसून आले.

    (१) ९००० ते ८००० वर्ष पूर्व समुद्रपातळीत घट झाली.

    (२) ६००० वर्षांपूर्वी समुद्रपातळी आजच्या पातळी एवढी होती.

    (३) ३००० वर्षांनंतर परत एकदा समुद्रपातळीत लक्षणीय घट झाली.

    CALIBRATION OF RADIOCARBON AGE TO CALENDAR YEARS;
    (Variable : estimated C13/C12 = 25 : lab mult = 1)
    Laboratory: Bata – 76210
    Conventional radiocarbon age : 3060 – 70 BP
    Calibrated results :cal BC 1440 to 1110
    (2sigma, 95% Probability)

    कोतवडे-गावाचा-भूवैज्ञानिक-नकाशा
    कोतवडे-गावाचा-भूवैज्ञानिक-नकाशा
    कोतवडे-गावाचा-भूवैज्ञानिक-नकाशा4

    वरील सर्व बदलांचा स्पष्ट पुरावा कोतवडे येथील अभ्यासातही दिसला, त्याचा सारांशरुपाने निर्देश असा :
    (अ) गावाच्या उत्तरेस श्री. गांधी यांच्या शेतातील विहिरीत व श्री. परचुरे यांच्या घराजवळच्या विहिरीत जमिनीपासून ३ ते ७ मीटर खोलीवर वाळू, गोलसर गोटे एकत्र होऊन त्यांचे रूपांतर घट्टसर दगडात झालेले दिसते. त्या गोलसर गोट्यात जांभ्या दगडाच्या व जांभ्या दगडाच्या खाली असलेल्या काळसर घट्ट दगडांचे डेक्कनट्रॅप (Deccan Trap) या दगडांचे गोलसर गोटे विशेषत्वाने आढळले. त्याच ठिकाणी साधारण सात मीटर खोलीवर जांभ्या दगडांचे तळप दिसले.

    (ब) श्री. प्रदीप गोविंद जोशी यांच्या घराच्या दाराजवळच्या विहिरीत जांभ्या दगडाचे लहान गोलसर नसलेले तुकडे आणि वाळूचे कण व माती यांचा घट्ट कठीण न झालेला थर दिसला. याच ठिकाणी ३.५ मीटरपर्यंत लहान लहान तडे गेलेले काळसर मातीचे बारीक वाळूयुक्त थर मिळतात. तेथेच ३.५ मीटर जरासे खाली समुद्र लाटेबरोबर वाहून आलेले व त्यामुळे त्यांना थोडासा गोलाकार आला आहे असे तपकिरी ते काळसर रंगांचेलाकडाचे तुकडे दिसतात. या लाकडाच्या तुकड्यांना जीवाश्म लाकूड (Fossil Wood) असे संबोधिले जाते. या जीवाश्म्याचे वय कार्बन डेटिंग (Carbon Dating) या पद्धतीने काढले जाते.

    (क) वरील विवेचनावरून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की, जमिनीपासून ३.५ मीटरपर्यंत एका विशिष्ट शिलावर्णनाचे (Lithologic) व ३.५ ते ७ मीटर खोलीपर्यंत काहीशा वेगळ्या शिलावर्णनाचे दगड आहेत. या शिलावर्णनांच्या फरकाला प्रयोगशाळेच्या अभ्यासातून एक निर्विवाद पुरावा हाती आला आहे. पहिल्या ३.५ मीटरच्या भागात जे लाकडाचे तुकडे मिळाले त्यांच्या वयाचा अभ्यास – कार्बन डेटिंग पद्धतीने, कोलंबियाच्या साऊथ कॅरोलिना विश्वविद्यालयातील प्राध्यापक डॉ. तलवानी यांनी फ्लोरिडा येथील बीटा ॲनॅलिटिक या प्रयोगशाळेत पूर्ण केला. या अभ्यासाचे फलित म्हणजे या लाकडाच्या तुकड्याचे वय ३०६०_+ ७० म्हणजेच ढोबळमानाने ३००० वर्षे नोंदविले गेले. या तुकड्याच्या सभोवती असलेल्या वाळू व माती यांच्या थरातील नमुन्यांचा अभ्यास पुराजीवशास्त्र (Palentologic) अंतर्गत ८ बीजाणुशास्त्र (Palynology) पद्धतीनुसार पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस या संस्थेत केला गेला. या अभ्यासात असे दिसले की, वरील नमुन्यातील सूक्ष्म बीजाणू (Microspore) पाण्याच्या दलदलीतच उगवतात. अशाच तऱ्हेचा अभ्यास ३.५ ते ७ मीटर खालच्या वाळू-मातीवर केला तेव्हा असे दिसले की, त्यात बीजाणूंचे (Polans) नमुने अधिक प्रमाणात असून त्यात हेलिओस्परमॉप्सीन (Heliospermopsin), डरमॅटोब्रेव्हीकोलॅपोसाईट्स (Dermatobrevicolpsites), झोनोकोस्टायटिस, (Zonocostites) आणि ऱ्हिजोस्फोरेलेकल (Rhizophorelecal).

    godya-panyacha.png
    गोड्या पाण्याच्या दलदलीत उगवणारा एक सूक्ष्म बिजाणू
    Heliospermopsin
    हेलिओस्परमॉप्सीन
    Dermatobrevicolpsites
    डरमॅटोब्रेव्हीकोलॅपोसाईट्स
    Zonocostites
    झोनोकोस्टायटिस
    Rhizophorelecal
    ऱ्हिजोस्फोरेलेकल

    हे प्रमुखपणे आहेत. वरील सर्व बीजाणूंवर मिठाचे थर (Salt glands) आढळले. यामुळे हे सिद्ध झाले की, हे बीजाणू सागरी वातावरणात अवसादित होऊन सागरी वातावरणातच बराच काळ पडून राहिले. वरील सर्व वर्णनावरून आजच्या कोतवडे गावाच्या जमिनीखाली ३.५ ते ७ मी. खोलीवर एके काळी सामुद्रिक वातावरण होते. अशा समुद्रसान्निध्यामुळे अवसादितावर काही काळाने सामुद्रिक वातावरण संपून वरच्या ३.५ मीटरमध्ये गोड्या पाण्याच्या दलदलीच्या वातावरणाचे सान्निध्य दिसले आणि लाकडाच्या जीवाश्माच्या ३००० वर्षे या कालनिर्णयामुळे तीन हजार वर्षांपूर्वी कोतवड्याची अवस्था मनुष्यप्राण्यास निवासायोग्य नव्हती, हे आपोआपच सिद्ध झाले. वरील अभ्यासावरून समुद्राच्या पातळीत ३००० वर्षांनंतर घट झाल्याचे जे नोंदविले आहे, ते कोतवडे येथील अभ्यासाने परत एकदा स्पष्ट झाले आहे.
    यापुढे प्रश्न येतो तो असा की, आजच्या कोतवड्याच्या जमिनीखाली ३.५ मीटर खोलीवर ३००० वर्षपूर्व गोड्या पाण्याच्या दलदलीची व सामुद्रिक वातावरणाची परिस्थिती होती, तर आजच्या पातळीसाठी ३.५ मीटर जाडीच्या अवसादनाचा काळ किती यासाठी समुद्राजवळच्या खाडीच्या भागात अवसादनाचा वेग (Rate of Deposition) किती या वेगासंबंधी जगात अनेक खाड्यांवर जो अभ्यास झाला आहे त्याचा साकल्याने विचार केला, तर एक मीटर फक्त वाळच्या अवसादनास ५०० वर्षे व एक मीटर मातीच्या (गाळाच्या) अवसादनास ८०० वर्षे लागतात. कोतवड्याच्या विहिरीतील नमुन्यात असे आढळले की त्यात वाळू व माती यांचे प्रमाण निम्मे-निम्मे आहे. अशा स्थितीत एक मीटर अवसादनाचा काळ ६५० वर्षे येतो. या हिशेबाने ३.५ मी. जाडीच्या अवसादनास जवळजवळ २२७५ वर्षे लागावीत. यावरच्या गोड्या पाण्याच्या दलदलीच्या भागाची मनुष्यप्राण्यास वस्ती करता येईल. अशा परिस्थितीस १००/१५० वर्षांचा काळ लागावा असे धरले तर आजच्या कोतवड्याच्या जमिनीची सध्याची अवस्था होण्यास ५५०/६०० वर्षांचा काळ मानावा लागेल. याचाच अर्थ असा की, सहस्रबुद्धे व कोतवडे यांचा संबंध साधारणपणे इसवी सन १४५० ते१५०० च्या आसपास असावा.
    कोतवड्याच्या भूवैज्ञानिक परिस्थितीचा विचारानंतर तेथील राजकीय परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेणे संयुक्तिक होईल. १३ वे ते १७ वे शतक अशा जवळजवळ ३०० ते ४०० वर्षांच्या कालावधीत राजकीय हालचालीही या भागात बऱ्याच झालेल्या दिसतात. कोकणातील शिलाहार राजवट १३ व्या शतकाच्या प्रारंभी संपुष्टात आली. याच शतकापासून मुसलमान राज्यकर्ते या भागात येऊ लागले. त्यांनी यादव सत्तेचा बीमोड केला. पुढे तुघलक घराण्याचा काळ काही दिवसांतच पालटून त्यांची सत्ता खिळखिळी झाली. त्याच काळात बहामनी राजसत्तेने आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून कोकणपट्टी काबीज करण्याचे प्रयत्न केले. इ.स. १४७२ पर्यंत बहामनी महंमद गवान याने, कोकण बहामनींच्या वर्चस्वाखाली आणला. कोकणातील आदिलशाहीचा अंमल १४९० ते १६८६ असा धरला जातो. या काळातील ऐतिहासिक घटना म्हणजे शिवाजीने कोतवडे व नेवरे यांचा ताबा मिळविला. ही घटना श्री. रणजित देसाई यांच्या श्रीमान योगी कादंबरीत नोंदविली आहे. खुद्द कोतवडे येथे राहाणाऱ्यांकडून ज्या वंशावळी जमा झाल्या आहेत त्यांच्यातील मूळ पुरुष इ.स. १७२५ ते ४० यांच्या मागे गेलेला दिसत नाही. परंतु कोतवड्याहून जवळच केळ्ये मजगाव येथे स्थानांतर केलेल्या काही वंशावळी इ.स. १५३५ ते १५५० च्या आसपास आपणास पोहोचवितात. खुद्द कोतवड्यातून मिळणाऱ्या या अपुऱ्या माहितीचा, त्या भागात लहान कालखंडात झालेल्या अनेक राजकीय संघर्षात व बदलात, माहितीची कमतरता तर लपलेली नसावी?
    कोतवड्याच्या धार्मिक सांस्कृतिक विषयासंबंधी चर्चा करीत असताना, कुसुमेश्वर मंदिर व कुलस्वामी, या दोन बाबींसंबंधी ज्या काही विचित्र परिस्थितीचे किंवा वैशिष्ट्यांचे निर्देश वर केले आहेत, त्यासंबंधी काही निर्णायक चर्चा करणे आवश्यक आहे. सर्वसाधारण परंपरेस सोडून कोतवड्याचा मुख्य देव व कुलस्वामी, श्री कुसुमेश्वर यांच्या मंदिराच्या गाभाऱ्यातील शाळुंका, दर्शन घेणाऱ्याच्या डावीकडे आहे. गाभारा पश्चिमाभिमुखी असल्यामुळे अशी अपरंपरागत परिस्थिती निर्माण झाली असावी, ही कल्पना निराधार वाटते. ३००/३५० वर्षांपूर्वीचे हे मंदिर ज्या काळात बांधले गेले, त्याकाळी कोतवडे गावात जागेची अशी टंचाई खासच नसावी. याच विषयाला धरून आणखीही एक मोठी विचित्र परिस्थिती आहे. कोतवडे हे मूळ गाव सांगणारे त्रिप्रवर शांडिल्य गोत्री, केसो बिन विश्वनाथ महादेव हा सहस्रबुद्धे घराण्याचा मूळ पुरुष मानणाऱ्या या सहस्रबुद्धे कुटुंबात कुलस्वामी व कुलस्वामिनी याविषयी एकमत नाही. खुद्द कोतवडे गावातील पाच-सहा कुटुंबीयांपैकी फक्त वेरखळवाड्यातील व उंबरवाड्यातील सहस्रबुद्धे यांचाच कुलस्वामी श्री कुसुमेश्वर- महालक्ष्मी असून बाकीच्या सर्व कुटुंबांचा कुलस्वामीश्री व्याडेश्वर- योगेश्वरी आहे. केळ्ये मजगावाहून अनेक ठिकाणी विखुरलेल्या घराण्यातून दोन्हीही कुलस्वामी नोंदविलेले आहेत. कुसुमेश्वराची डाव्या हाताकडे असणारी शाळुंका व कुलस्वामीबाबतीतील फरक याचे कारण काही वेगळे असावे. यासंबंधी संशोधन करताना एक गोष्ट जाणवली ती अशी की, अपरंपरागत शाळुंकीच्या स्थितीच्या प्रयोजनात पारंपरिक मान्यता सहजपणे मिळत नाही. हेच कारण कदाचित कुलस्वामीबद्दलच्या मतभेदास असावे.
    समग्र हिंदू समाजात मंदिरात देवदर्शन करताना प्रदक्षिणा घालावयाची विशिष्ट पद्धती आहे. प्रदक्षिणा घालताना गाभाऱ्यातील देवास आपल्या उजवीकडे ठेवूनच प्रदक्षिणेची सर्वमान्य पद्धती आहे. देवास डावीकडे ठेवून उलटी प्रदक्षिणा कोणीही घालीत नाही. शंकराच्या देवळात प्रदक्षिणेची पद्धती इतर मंदिरांपेक्षा वेगळी असते. सर्वसाधारणपणे शाळुंकीचे तोंड दर्शन घेणाऱ्याच्या उजव्या हातास असते. तेव्हा देवाच्या मूर्तीस उजवीकडे ठेवून गाभाऱ्याभोवती पाऊण प्रदक्षिणा शाळुंकीजवळ पुरी करतात व पुन्हा मागे वळून देवाच्या समोरून परत शाळुंकीकडे जाऊन तेथून पुन्हा फिरून मुख्य दरवाजासमोर येऊन एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. शाळुंकीसमोरून वाहणारे तीर्थ ओलांडावयाचे नाही, कारण तेथे शंकराच्या पिशाच्च आदि गणांची वस्ती असते, असा त्यामागे समज आहे. श्री कुसुमेश्वराची शाळुंका दर्शन घेणाऱ्याच्या डावीकडे असल्याने प्रदक्षिणेची सुरुवात देवास डावीकडे ठेवूनच सुरू करावी लागते. ही अपारंपरिक पद्धती प्रचलित पद्धतीच्या विरुद्ध आहे, हेच कारण सहसबुद्धे घराण्यात दोन वेगळे कुलस्वामी मानण्याचे असावे. सहस्रबुद्धे हे उपनाव पूर्वीच्या गणपुले या उपनावाच्या बदलामुळे झाले आहे. यासंबंधीची पूर्ण चर्चा पुढे येणार आहे. कुसुमेश्वर मंदिराच्या अपारंपरिक शाळुंकीच्या दिशेसंबंधी कोतवडे गावाची नवीन मांडणी करताना ज्या कोणास ही अपारंपरिक पद्धत पसंत पडली नाही, त्यांनी आपल्या नावबदलापूर्वीच्या म्हणजे गणपुल्यांच्या कुलस्वामीचा म्हणजेच श्रीव्याडेश्वराचा आग्रह कायम ठेवला असावा. या परिस्थितीमुळे या एकाच कुळात दोन कुलस्वामी मानण्याची प्रथा पडणे जास्त संयुक्तिक वाटते.
    श्रीमत् आद्य शंकराचार्यांनी दक्षिणामूर्ती स्तोत्र म्हणून एक काव्यरचना केली आहे. या स्तोत्रात शंकराच्या सर्वात्मकरूपी तत्त्वाचे प्रतिपादन केले असन, त्यातील प्रत्यक्ष श्लोकाचा शेवट अध्यात्म ज्ञानाचा गुरू जो शंकर दक्षिणामूर्ती- की जो अखंड, अद्वय आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देतो, अशा दक्षिणामूर्तीस वारंवार नमस्कार सांगितला आहे. याचा काही संबंध आपल्या अपारंपरिक परिस्थितीस कारणीभूत असेल काय, हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकेल. श्री कुसुमेश्वरमूर्तीची अपारंपरिक परिस्थिती कोकणातील फारच थोड्या शंकराच्या मंदिरातून आहे. कल्याण येथील कल्याणेश्वराचे मंदिर, मिठगवणे येथील श्री अंजनेश्वराचे मंदिर व अणसुरे येथील श्री देवगिरेश्वर मंदिर अशी काही ठिकाणे वानगीदाखल सांगता येतील. अशा अगदी अपवादात्मक परिस्थितीची काही आध्यात्मिक कारणे असू शकतील काय?

    शांडिल्य गोत्रीयांचा वंशवृक्ष - विस्तार – मर्यादा

    प्रास्ताविक:

    कुलग्रंथ संपादन करण्याचा उद्देश मुख्यत: शास्त्रीय अथवा संशोधनाच्या दृष्टिकोनातून आपल्या आडनावाचा उहापोह, मूळ ठिकाण किंवा मूळ पुरुषाचा शोध, कुलस्वामी निश्चित करण्याची कल्पना, जुन्या परंपरेनुसार नैवेद्य-देवतांच्या याद्यांवरून घराण्याच्या स्थित्यंतरांचा मागोवा, असा मानण्यात येतो. आपल्या पूर्वजांची माहिती व धार्मिक रूढीपरंपरेनुसार चालत आलेले कुलाचार यांचाही मागोवा या संशोधनात अंतर्भूत असतो. वरील सर्व विषयांच्या अभ्यासाचे मूळ म्हणजे प्रत्येक कुटुंबाची ज्ञात वंशावळ, अनेक वंशावळींच्या एकत्रीकरणाने तयार होणारा वंशवृक्ष व माहितीपत्रकात नोंदविलेली माहिती.

    वंशवृक्ष बांधणीतील अडचणी व निकष:

    आतापर्यंत अभ्यासिलेल्या माहितीपत्रकांमधील वंशावळींचा विचार करता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती अशी की, माहिती भरणाऱ्याने आपल्या स्वत:च्या आधीच्या पूर्वजांची जी नावे दिली आहेत त्यात जवळजवळ ८० टक्के नावे स्वत:पासून पूर्वीच्या फक्त चार किंवा पाच पिढ्यांचीच आहेत. चुलत किंवा चुलत-चुलत नावांची माहिती जवळजवळ नगण्यच आहे. याबाबतीत फारच थोडे अपवाद आहेत. अशा परिस्थितीत मूळ ठिकाणासंबंधी नोंदविलेली माहिती बरीच उपयोगी पडली व त्यानुसार निरनिराळ्या घराण्यांची- शाखांची बांधणी करणे सोयीचे झाले. मात्र आपल्याकडील नावांमधील सादृष्य, कित्येक ठिकाणी आजोबांचे नाव नातवास देण्याची प्रथा, या कारणांमुळे कुटुंबा-कुटुंबातील पिढ्यांचे परस्पर संबंध ठरविणे बरेचदा अवघड झाले. अशा परिस्थितीत सारख्या नावांच्या परस्पर जुळणीत त्यांच्या त्यांच्या काळाचा विचार करणे हा एकच मार्ग उरला. यासाठी माहितीपत्रकातील माहिती भरणाऱ्याने नोंदविलेली स्वत:ची जन्मतारीख, सन आधारभूत धरून, त्याच्या मागील पिढ्यांच्या प्रतिनिधींचा जन्मकाळ ठरवावा लागला. याकरिता सर्वसाधारणपणे २५ वर्षांची एक पिढी हा निकष लावून प्रत्येक पिढीच्या नावाचा जन्मसन ठरवून प्रथम एका कुटुंबाचा व नंतर अनेक कुटुंबांचा वंशवृक्ष तयार करण्यात आला. उशिराची पुत्रप्राप्ती व दत्तक विधानाबाबत काळाची अनिश्चितता, अशा काही अडचणी आल्या, परंतु चुलत किंवा चुलतचुलत वंशावळीतील जन्मसनांची तुलना करून कालनिर्णय व व्यक्तिनिर्णय करणे सोपे झाले.

    काही मार्गदर्शक वंशवृक्ष:

    या काहीशा क्लिष्ट व अवघड कामात काही ठिकाणांहून मिळालेले वंशवृक्ष बरेच मार्गदर्शक झाले. त्यांपैकी काहींची नोंद कृतज्ञतापूर्वक करणे इष्ट आहे. या पायाभूत वंशावळीमुळे त्यात नवीन माहितीपत्रकातील भर घालणे काहीसे सोपे झाले.
    १) धामेळ वाड्याच्या दोन कुटांच्या वंशावळी,
    २) केळ्ये मजगावची १५ पिढ्यांची १८५५ साली केलेली वंशावळ,
    ३) कोतवडे वीरवाडी नेवरे येथील सहा पिढ्यांची वंशावळ, कोतवड्याच्या धामेळवाड्याचे इतिहास अभ्यासक कै. सखाराम अच्युत सहस्रबुद्धे यांच्या बाडातून १२ पिढ्यांचा वृक्ष त्यांचे नातू श्री. विनायक सुधाकर यांच्याकडून प्राप्त झाला. यापैकी तासगाव शाखेची ७ पिढयांची एक वंशावळ १८.१२.१८४५ रोजी बनविल्याची नोंद आहे.
    ४) केळये – माजगाव १७ पिढ्यांची वंशावळ श्री. भालचंद्र विष्णू सहस्रबुद्धे यांजकडून प्राप्त झाली.
    ५) वेरखळवाड्याची एक वंशावळ श्री. आत्माराम नारायण सहस्रबुद्धे, कोतवडे यांच्याकडून प्राप्त झाली.
    ६) गावणवाडा, नवेदरवाडा व उंबरवाडा या तीन वाड्यांच्या वंशावळी.
    ७) सांगली, सातारा वंशवृक्ष कै. माधव सावळाराम सहस्रबुद्धे – पुणे.
    अशा तऱ्हेने जमलेल्या व त्यात नवीन माहितीची भर घालून सर्व वृक्षांचा अभ्यास करताना कोतवड्यातील प्रत्येक वाड्यातून स्थानांतर झालेल्या कुटुंबीयांची भौगोलिक तत्त्वावर वाटणी करता आली ती अशी

    स्थानांतरांची भौगोलिक वाटणी:

    १) सह्याद्रीचे घाट चढून पठारावर (देशावर) येऊन स्थायिक झालेली कुटुंबे.
    २) किनाऱ्याकिनाऱ्याने कोतवड्याच्या दक्षिणेकडे व उत्तरेकडे पसरलेली घराणी. यात उत्तरेस अलिबागपासून कर्नाटकातील दक्षिण कारवारपर्यंत गेलेल्या घराण्यांचा समावेश आहे. अशा तऱ्हेने स्थानांतरित घराण्यांचा कोतवड्यातील पाच वाड्यांशी मूळचे संबंधही काही अपवाद वगळता ठरविता आले आहेत. कोतवडे येथील लावगणवाडा हेही एक सहस्रबुद्धे कुटुंबाचे स्थान होते. परंतु एकाही माहितीपत्रकात लावगणवाड्याच्या प्रतिनिधींची नोंद मिळाली नाही. कोतवड्यास भेट दिली त्यावेळी तेथील मूळ सहस्रबुद्धे यांचा जमीन-जुमला हल्ली मोने कुटुंबाकडे असून तेथे कोणीही सहस्रबुद्धे नाहीत म्हणून कळले. त्या वाड्यावर जाऊन श्री. मोने यांची भेट घेऊन ज्या कागदपत्रांवरून ही वहिवाट चालू झाली त्या कागदपत्रांत कमीत कमी सहस्रबुद्धे यांच्या दोन पिढ्यांची नावे मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथे तितकासा सहभाग मिळाला नाही, त्यामुळे सध्याचा कुलग्रंथ दुर्दैवाने या वाड्याच्या माहितीपासून वंचित राहिला आहे.
    अशा तऱ्हेने कोतवड्याच्या मूळ पाच वाड्यांपासून एकूण ४५ उपघराणी – शाखा उपशाखा निर्माण झाल्या हे लक्षात येते. परंतु तीन शाखांचा मूळ वाड्याशी संबंध योग्य माहितीच्या अभावी जोडता आला नाही त्या अशा आहेत.
    १) करकंब शाखा ९ पिढ्या, मूळ पुरुष विठ्ठल (१८००)
    २) मोडनिंब शाखा ९ पिढ्या, मूळ पुरुष नारायण (१८००)
    ३) नागाव कूट क्र. २, ८ पिढ्या, मूळ पुरुष गणेश (१८७०)
    या तीनही शाखांचा कुलस्वामी / कुलस्वामिनी कुसुमेश्वर महालक्ष्मी आहे. जमा झालेल्या माहितीपत्रकातील कुलस्वामीबाबतीत अनेक मतमतांतरे लक्षात घेऊनसुद्धा एक गोष्ट खूपशी स्पष्ट होते की, वेरखळवाडा व उंबरवाडा येथील कुटुंबीयांचा व केळ्ये मजगावमधील काही कुटुंबीयांचा कुलस्वामी-कुलस्वामिनी कुसुमेश्वर – महालक्ष्मी आहे. वरील तीन शाखांपैकी करकंब व मोडनिंब शाखा या व्यतिरिक्त आणखी एका शाखेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ती शाखा अरण या गावची (सोलापूर जिल्हा). आज अरण शाखेच्या कोणाही प्रतिनिधीची माहिती आम्हास उपलब्ध झाली नाही. करकंब – मोडनिंब व अरण हे एका शाखेचे प्रतिनिधी असावेत, असे मानण्यास जागा आहे. करकंब शाखेचे एक वृद्ध गृहस्थ श्री. श्रीधर शंकर यांनी संगितलेल्या माहितीप्रमाणे या दोन्ही कुटुंबात सोयर-सुतक पाळण्याची प्रथा त्यांच्या लहानपणी होती. या व्यतिरिक्त मूळ मिरजकरांकडून इनामदारी मिळाली होती. त्यात तिघांचा पाच आणे चार पैचा वाटा होता, असेही सांगितले जाते. या दोन्ही माहितीवरून या तीन शाखा एकाच कुटाच्या प्रतिनिधी असाव्यात. आज तरी त्याबद्दल खात्रीपूर्वक माहिती नाही.

    काही न जुळवता आलेल्या वंशावळी:

    एकंदर जमा झालेल्या माहितीपत्रकांपैकी ५ माहितीपत्रकांमधील कुटुंबांच्या वंशावळी पुरेशा माहितीच्या अभावी वरील कोणत्याही घराण्याच्या शाखेच्या वंशवृक्षांशी जोडता आल्या नाहीत, त्या स्वतंत्रपणे एका सूचीत शेवटी दिल्या आहेत.
    शाखा-उपशाखांतील काही कालदर्शकासंबंधी त्रुटी : वरील सर्व घराण्यांतील-शाखांतील पिढ्यांची संख्या, मूळ पुरुषाचा जन्मकाळ यांचा एकत्र विचार करता एक विसंगती ध्यानात येते. आपण मूळचे कोतवड्याचे, परंतु आपल्या मूळ ठिकाणातील घराणी १०-१२ पिढ्यांच्या मागे जात नाहीत व बहुतकरून ठिकाणी मूळ पुरूषाचा जन्म सन अंदाजे १७०० ते १७५० च्या दरम्यान आहे. तसेच तेथून स्थानांतर केलेल्या शाखांच्या मूळ पुरुषांचा काळ सर्वसाधारणपणे १७०० ते १८५० च्या दरम्यानचा असला तरी जास्तीत जास्त स्थानांतरांचा काळ १८१० व १८४० च्या दरम्यान आहे. अपवाद आहे ते वेरखळ २ (१६८०) उंबरवाडा (१६७५) धामेळ वाडा १ (१६५०) या तीन मूळ घराण्यांचे. कोतवड्याचा मूळ पुरुष विश्वनाथ यांचा काळ १५३५ च्या आसपासचा आहे. याविषयी भूतात्त्विक पुरावे पूर्वी आले आहेत. यासंबंधी आणखी खात्रीलायक माहिती ग्रंथात पुढे दिली जाणार आहे. सध्या येथे एवढेच नोंदवावयाचे आहे की इ. स. १५३५ या प्रथम मूळ पुरुषाच्या काळापासून वर दिलेल्या तिन्ही वाड्यांच्या मूळ पुरुषांच्या काळात जवळजवळ १५० वर्षांचा फरक आहे. सध्याच्या संशोधनात ही एक त्रुटी आहे.
    याच संदर्भात १९९० साली नागपूरच्या कै. बाळकृष्ण नारायण सहस्रबुद्धे यांनी सायक्लोस्टाईल पद्धतीने केलेल्या वाईकर सहस्रबुद्धे घराण्याचा इतिहास या ग्रंथात घराण्याची आधारभूत वंशावळ दिली आहे. तिचाही विचार येथे करणे जरूर आहे. त्या आधारभूत वंशावळीतील मूळ पुरुष गणेश, त्यानंतर केशव व केशवचे दोन पुत्र हरभट व कृष्णाजी असून हरभट हे प्रथम कोतवड्याहून वाईस आले. तेथूनच वाई घराण्याची सुरुवात झाली. २५ वर्षांची एक पिढी या निकषाप्रमाणे जो जन्मसन येतो त्यास तीर्थोपाध्यायांच्या नोंदीवरून पुष्टी मिळते. हरभट इ. स.१७१८ मध्ये त्र्यंबकेश्वरी गेल्याची नोंद आहे, तसेच केशव हे इ. स. १६९४ साली नाशिकला गेल्याची नोंद आहे. या दोन सनांवरून हरभट यांचा जन्मकाळ इ. स. १६९० च्या आसपास असावा तर केशव यांचा जन्म इ. स. १६६० च्या आसपास असावा. याचा अर्थ कोतवड्यातील त्यांचा मूळ पुरुष गणेश यांचा जन्मकाळ इ. स. १६३० च्या आसपास येतो. गणेश – केशव- हरभट ही त्रयी धामेळवाड्यामध्ये आलेली आहे. वाई घराणे त्यामुळे मूळचे धामेळवाड्यातून स्थानांतर केलेले आहे, हे सिद्ध होते.

    मूळच्या गणपुल्यांचे सहस्रबुद्धे कसे झाले:

    यासंबंधी आणखी काही माहिती महत्त्वाची वाटावी. आपले मूळ आडनाव गणपुले होते हे अनेकांनी नोंदविलेले आहे. १९५३ साली गणपुले कुलवृत्तान्त छापून प्रसिद्ध झाला आहे. यातील माहितीचा मागोवा घेतला तर असे दिसते की, बहुतेक गणपुले मंडळींच्या मूळ वास्तव्याचे गाव रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये-मजगाव हे आहे. परंतु तेथे आज गणपुल्यांची वस्ती नाही. गणपुल्यांचा घरटा किंवा चौथरा शिल्लक नसून त्या ठिकाणाजवळ देसाई – सहस्रबुद्धे यांचे घर व शेतजमीन आहे. १९९४ साली तेथील भेटीत केळ्ये – मजगावचे एक नागरिक श्री. नानासाहेब सहस्रबुद्धे यांनी एक जुना पडका जांभ्या दगडांचा चौथरा गणपुल्यांचा असल्याची पूर्वीपासूनची ऐकीव माहिती न सांगितली. गणपुले घराण्याचे पहिले स्थलांतर केळ्ये गावातून क्षेत्र परशुराम येथे कै. नारायण महादेव गणपुले यांनी प्रथम केले, असा उल्लेख सापडतो. गणपुल्यांचे सहस्रबुद्धे कसे झाले यासंबंधीच्या दंतकथांच्या नोंदी बऱ्याच माहितीपत्रकांतून नोंदल्या गेल्या आहेत. त्या सर्व जवळजवळ सारख्या आहेत. त्याचीही माहिती चालू विषयाच्या संबंधी नोंदविणे आवश्यक आहे.
    महादेव बिन केसो विश्वनाथ या नावाच्या पुरुषाने कोतवड्यास येऊन त्याकाळी तेथे असलेल्या आदिलशाही राजवटीच्या एका सावंत नावाच्या जुलमी अंमलदारास अनेक क्लृप्त्या करून शरण आणले व गावाची चोख व्यवस्था लावून योग्य तो कारभार आदिलशहाकडे पोहोचविला. कोणतीही लढाई न करता केवळ बुद्धीकौशल्याच्या बळावर केलेल्या त्या पराक्रमाची बक्षिसी म्हणून सहस्रबुद्धे हा किताब त्याला आदिलशहाने बहाल केला. महादेव बिन केसो विश्वनाथ या पदांची फोड करावयाची झाल्यास ती महादेव केसोचा मुलगा व केसोचे वडील विश्वनाथ अशी होते. याचा अर्थ विश्वनाथ हा सर्व कोतवडेकर सहस्रबुद्धे घराण्याचा ज्ञात मूळ पुरुष होय. विश्वनाथ हे कोतवड्यास कोठून आले? गुहागर अगर परशुराम अशा दोन गावांचा उल्लेख काही माहितीपत्रकात आहे. कदाचित केळ्याहूनही ते कोतवड्यास येणे शक्य दिसते. कारण केळ्ये येथून कोतवडे ७८ किलोमीटर अंतरावर आहे आणि सहस्रबुद्धे हे नाव मिळण्यापूर्वी गणपुले यांचे मूळ गाव केळ्ये-मजगाव आहे.

    मूळ पुरुषाच्या काळाचे ऐतिहासिक पुरावे: विश्वनाथांसंबंधी ज्या आख्यायिका आहेत त्याप्रमाणे त्याला दोन स्त्रियांपासून एकंदर पाच मुलगे झाले. कोतवडे गाव नीट वसविल्यानंतर त्या गावाची खोती त्याच्याकडे आली असावी. पाच मुलांपैकी चार मुले धामेळ, वेरखळ, उंबरवाडा अशी कोठेतरी ठेवून पाचवा मुलगा गणेश यास केळ्ये येथे पाठविल्याचा उल्लेख आहे. गणेश हा केळ्ये घराण्याचा मूळ पुरुष समजला जातो व त्याचा काळ अंदाजे इ. स. १५३० च्या सुमाराचा ठरतो. गणेशाला किंवा त्याचा मुलगा कृष्ण याला आदिलशाही राजवटीतून देसाई हा किताब मिळाल्याचा उत्तम पुरावा आपल्या संशोधनात प्रथम मिळाला असल्याने कृष्ण किंवा गणेश यांच्या जन्मकाळाची बरीचशी निश्चित माहिती त्या पुराव्यातून बाहेर येते व गणपुल्यांचे सहस्रबुद्धे केव्हा झाले याचाही काळ काही प्रमाणात ठरविता येतो. या संशोधनाचा सारांश असा :
    केळ्ये-मजगाव येथील श्री. भालचंद्र विष्णू सहस्रबुद्धे यांच्या संग्रही जुन्नरी कागदावर काळ्या शाईने मोडी लिपीत लिहिलेल्या अनेक गुंडाळ्या तांब्याच्या नळकांड्यातून भरून ठेवलेल्या मिळाल्या आहेत. पुण्याच्या महर्षि शांडिल्य प्रतिष्ठानचे श्री. परशुराम कमल करून कुलवृत्तान्ताच्या दृष्टीने उपयोगी ठरविलेल्या एकंदर १२ गुंडाळ्यांचे बाळबोधीकरण करून दिले. त्यापैकी तीन गुंडाळ्या जास्त महत्त्वाच्या ठरल्या. त्या अनुक्रमे ५, ९ व ११ अशा आहेत. त्यातील क्र. ९ व क्र.११ यातील मजकुराचा थोडक्यात सारांश असा आहे.
    अप्पाजी हरि, राघो बल्लाळ व कासी परसराम हे तीन चुलत भाऊ, केळ्ये – मजगावच्या वंशवृक्षातील मूळ पुरुष गणेश याचा मुलगा कृष्ण यांच्यापासून ८ व्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. सदर दोन्ही सनदेत मूळ विषय जो मांडला आहे त्यानुसार मूळ पुरुष कृष्ण, शांडिल्य गोत्री सहस्रबुद्धे यास पातशहा विजापूर यांनी विशालगड व महिपतगड अमलाखालील काही भाग इनाम करून दिला. कोकणातील आदिलशाहीचा अंमल सामान्यत इ. स. १४९० ते इ. स. १६८६ असा मानला जातो. ज्या दोन सनदांचा वर उल्लेख केला आहे त्या श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांच्या काळातील इसवी सन १७७६ च्या आहेत. या प्रदीर्घ काळात पेशवे किंवा करवीरकर यांच्या सत्ता काही वेळा एकमेकात फिरत असाव्यात, वरील दोन्ही सनदांत विशालगड व महिपतगड या दोन्हीही भागातील देशमुखी कायम करण्यासंबंधी आज्ञापत्रे आहेत. वरील माहितीवरून एक गोष्ट सिद्ध होते की, मूळ पुरुष कृष्ण गणेश देसाई – सहसबुद्धे यास देसाई/देशमुखी वतने आदिलशहाच्या काळात दिली गेली व ती तशीच आठ पिढ्या चालत होती. दोन्हीही सनदा इ.स. १७७७ सालच्या आहेत. साधारण २५ वर्षांची एक पिढी मानली जाते. या हिशेबाने कृष्ण देसाई – सहस्रबुद्धे यांचा कार्यकाल इ.स. १५७७ च्या आसपास असावा. म्हणजेच सहसबुद्धे हे उपनाव त्या आधीपासून अस्तित्वात असावे.
    वरील विधानास पुष्टी मिळते ती श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी इ. स. १७७८ साली दिलेल्या दुसऱ्या एका निवाडा पत्राने. मूळ पुरुष कृष्ण यांना पाच मुलगे होते. वास्तविक सर्व मिळकतीचे पाच वाटे व्हावयास पाहिजेत. परंतु तिसऱ्या पिढीचे एक प्रतिनिधी नार देसाई – सहस्रबुद्धे त्यांचे पुत्र अंतो देसाई – सहस्रबुद्धे हे निपुत्रिक वारल्यामुळे राहिलेल्या चार भावांपैकी एक भाऊ घाटावर जाऊन परागंदा झाल्यामुळे जे तीन वाटणीदार कायम झाले त्यांच्या भाऊबंदकीच्या मतभेदात हे प्रकरण श्रीमंत माधवराव पेशवे यांच्याकडे न्याय मागण्यासाठी सदाशिव कृष्ण देसाई सहस्रबुद्धे यांनी दाखल केले. या निवाडापत्रात वरील दोन्हीही सनदांतील माहिती पूर्वपीठिका म्हणून परत नोंदविली गेली. वरील निवाड्याची पुनर्नोंद इनाम कमिशनच्या कागदपत्रात श्री. रामजी कदम, मामलेदार, तालुका रत्नागिरी यांनी ३० नोव्हेंबर १८३४ रोजी, पहिले नंबरचे बुकावर पाचशे एकोणनव्वद नंबरास नोंदविली आहे.
    वरील तीनही सनदांत पूर्वीच्या पिढयांतील लोकांचा उल्लेख देसाई-सहस्रबुद्धे या संज्ञेने केला आहे. जसे कृष्णाजी गणेश देसाई – सहस्रबुद्धे, नार देसाई – सहस्रबुद्धे. परंतु पुढेपुढे देशमुख ही उपाधीही लावलेली आहे. यावरून सहस्रबुद्धे कुळात देसाई व देशमुख अशी दोन्ही वतने चालू होती किंवा काय, असा प्रश्न उभा राहतो. परंतु देसाई देशमुख यांच्या मूळ सनदा जोपर्यंत पुढे येत नाहीत तोपर्यंत यासंबंधी नक्की निर्णय देणे कठीण आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या एका त्रैमासिकात (वर्ष २४ पृष्ठ ५९) यासंबंधी जी चर्चा आहे त्यानुसार देसाई देसगत-जमेदार हे शब्द सामान्यत देशमुख संज्ञेचे वाचक आहेत. शिवकाळाच्या आरंभी देशव्यवस्था पूर्णपणे वतनदारांकरवी होत असे. ज्या गावात पाटील नसे तेथील पाटीलकी देशमुख किंवा देसाई यांची असे. अशा परिस्थितीत सहस्रबुद्धे यांची देसाई-देशमुखी ही एकत्र वतनाची नावे असावी, असे दिसते.
    वरील ऐतिहासिक पुराव्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, गणपुल्यांचे सहस्रबुद्धे होण्याचा काळ इ. स. १५७७ च्या पूर्वी असला पाहिजे. आता तयार झालेल्या केळ्ये मजगावच्या २१ पिढ्यांच्या वंशवृक्षांत कृष्ण देसाई याचे वडील गणेश या नावाचा उल्लेख आहे. त्या दृष्टीने गणेशांचा जन्म सन १५५० च्या आसपास असावयास पाहिजे. सर्वत्र एकमुखी दंतकथेनुसार सहस्रबुद्धे ही उपाधी विश्वनाथ याने मिळविल्याचे पूर्वी प्रतिपादन केले आहे.
    त्याचप्रमाणे विश्वनाथाने आपल्या पाच मुलांपैकी एक मुलगा गणेश यास केळ्ये येथे स्थायिक केले, असाही उल्लेख मागे केला आहे. यावरून विश्वनाथाचा जन्मकाळ इ. स. १५२५ च्या आसपास धरणे योग्य दिसते. महादेव विश्वनाथ- केसो ही त्रयी मात्र कोतवड्याच्या कोणत्याही वंशवृक्षात दिसत नाही. उंबरवाड्याच्या वंशवृक्षातील मूळ पुरुष विश्वनाथ व वेरखळवाड्याचा मूळ पुरुष विश्वनाथ यांचे जन्म सन अनुक्रमे १७५५व १७४० असे आहेत. याचा अर्थ आजच्या समजल्या जाणाऱ्या वंशवृक्षातील मूळ कालमर्यादेच्या पूर्वी या तीन पिढ्यांची नोंद व्हावयास पाहिजे. ती आजच्या माहितीनुसार होत नाही आणि ही आताच्या संशोधनातील त्रुटी मानणे भाग आहे. कदाचित ही नोंद या विषयावर यापुढे जे संशोधन होईल त्याची पायाभूत माहिती म्हणून उपयोगी पडावी. आदिलशाही दप्तर, तंजावरचे दप्तर, पेशवे दप्तर, इचलकरंजीचे घोरपडे दप्तर किंवा सांगलीचे पटवर्धनांचे दप्तर अशा काही दप्तरांचा सखोल अभ्यास कदाचित या विषयावर काही प्रकाश पाडू शकेल. प्रस्तुत ग्रंथात तसे करणे आज तरी शक्य दिसत नाही.

    मूळ ठिकाण व मूळ पुरुष शोध : एक समारोप

    वरील सर्व माहितीचा सारांश सांगावयाचा झाल्यास आपला मूळ पुरुष विश्वनाथ याचा कार्यकाल इ.स. १५२५ च्या आसपास असावा. ज्या आदिलशाहीच्या अंमलदारास त्याने शरण आणले, त्या आदिलशाहीच्या या’ भागातील अमलाचा काळ इ. स. १४९०/ १६८६ म्हणून मानला गेला आहे. भूविज्ञानशास्त्र, पुराजीवशास्त्र यांच्या अभ्यासावरून कोतवडे गावाचा समुद्र हटून दलदलीचा भाग मनुष्यवस्तीस योग्य होण्याचा काळ ५५० वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ इ. स. १४५० च्या सुमारास असल्याचे आपल्या ग्रंथात आपण शास्त्रीय संशोधनाने सिद्ध केले आहे. त्यावरून आपल्या मूळ ठिकाणाचे आणि आपल्या मूळ पुरुषाच्या काळाचे संशोधन हा जो एक मूळ उद्देश कुलवृत्तान्ताचा असतो याबाबत सध्या आपण केलेले संशोधन बऱ्याच मोठ्या प्रमाणात फलद्रूप झाले आहे, असे म्हणावे लागेल.
    पंचागांत कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रावळी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध होते. त्यात नित्युंदन गोत्री व शांडिल्य गोत्री सहस्रबुद्धे अशा फक्त दोनच गोत्रांचा उल्लेख असतो. या व्यतिरिक्त गोत्र असणारे सहस्रबुद्धे आहेत, असे आता दिसून आले आहे. यासंदर्भात दोन माहिती फॉर्म्सचा उल्लेख करावा लागेल.
    १) श्री. शिवराम सखराम सहस्रबुद्धे मुक्काम पोस्ट तेटवली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी यांनी ते भारद्वाज (बाळ) गोत्री आहेत असे कळविले आहे. तसेच
    २) श्री. भालचंद्र भिकाजी सहस्रबुद्धे मुक्काम पोस्ट एक्संबा, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव हे श्रीवत्स गोत्री आहेत असे त्यांनी कळविले आहे.

    प्रस्थापित माहिती व्यतिरिक्त इतर गोत्री सहस्रबुद्धे हा एक संशोधनाचा विषय व्हावा.

    भाग २

    नित्युंदन गोत्री सहस्रबुद्धे:

    (१) वैशंपायन – कूट १:

    मूळ गाव: आगरवायंगणी.
    मूळ पुरूष: गोविंद (गोंदबा), संभाव्य जन्मसन इ.स. १७२५
    पिढया: १२
    शाखा-उपशाखा: गिम्हवणे, गव्हे आणि बार्शी.

    (२) वैशंपायन – कूट २: 

    मूळ गाव: आगरवायंगणी
    मूळ पुरूष: हरि, संभाव्य जन्मसन इ.स. १७२५,
    पिढया: १२
    शाखा-उपशाखा: वेलदूर, पेण-नाशिक, ठाणे, आसरखेडा-
    बागलाण, पांढरकवडा.

    (३) कोतवाल (मूळचे वैशंपायन):

    मूळ गाव: आगरवायंगणी.
    मूळ पुरूष: सखाराम, संभाव्य जन्मसन इ.स. १८५०
    पिढया: ७

    (४) पिंपळखरे – कूट १:

    मूळ गाव: पंचनदी-मनियाखेडी.
    मूळ पुरूष: विश्वनाथ, संभाव्य जन्मसन इ.स. १६८०
    पिढया: ११

    (५) पिंपळखरे – कूट २:

    मूळ गाव: पंचनदी-भडगाव.
    मूळ पुरूष: गणेश, संभाव्य जन्मसन इ.स. १८००
    पिढया: ७

    प्रास्ताविक:

    नित्युंदन गोत्री सहस्रबुद्धे कुटुंबीयांकडून एकूण १३१ माहितीपत्रके मिळाली. प्राथमिक अभ्यासात असे दिसते की, मुख्यत दोन स्वतंत्र घराणी आहेत. मूळ गाव आगरवायंगणी असणारे ते वैशंपायन व मूळ गाव पंचनदी असणारे ते पिंपळखरे. या प्रथमच्या निवडीत वैशंपायन कुटुंबीयांची ९७ व पिंपळखरे कुटुंबीयांची ३४ माहितीपत्रके वेगवेगळी करता आली. साहजिकच या गोत्राचे दोन स्वतंत्र विभाग करता आले. पहिला वैशंपायनांचा व दुसरा पिंपळखरे यांचा. हे दोन्ही विभाग स्वतंत्रपणे प्रविष्ट केले आहेत.
    आपल्या ब्राह्मण ज्ञातीत आपली ओळख सांगण्याची प्रथा अनंत कालापासून प्रचलित आहे. ती म्हणजे आपले गोत्र-प्रवर ऋषि, चार वेदांपैकी कोणत्या विशिष्ट वेदांतर्गत व कोठल्या शाखेचे आपण आहोत, तसेच गोत्र-प्रवर ही संकल्पना काय आहे, त्यात कालानुसार काय बदल झाले, आपल्या चार वेदांपैकी आपला कोणता वेद आहे, इत्यादी निकषांवर आपली ओळख देण्याची प्रथा आजही चालू आहे. त्याला धरून आपल्याला काही सामाजिक विशेषणेही लागली. ती म्हणजे चित्पावन कोकणस्थ. आपण कोणत्याही घराण्याचे असो, आपण आंगिरस पुरुकुत्स, त्रासदस्यव या प्रवर ऋषींचे व नित्युंदन गोत्र ऋषीचे संबंधित आहोत. तसेच कृष्ण यजुर्वेदांतर्गत तैत्तिरीय शाखेचे आपण अभ्यासक आहोत. ही आपली संक्षेपाने होणारी ओळख. कालाला अनुसरून या आपल्या विशेषणांबद्दल माहिती आज आपणापैकी फारच थोड्यांना आहे. याविषयी एक प्रकारची उदासीनता याच्या मुळाशी आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आपले गोत्र-प्रवर, ऋषी, गोत्रप्रवरांची संकल्पना, आपल्या वेदाबद्दल माहिती व शेवटी आपल्या सांस्कृतिक सामाजिक दोन नव्या विशेषणांची चर्चा समग्र परंतु संक्षेपाने अनेक ग्रंथांचे परिशीलन करून या कुलग्रंथाच्या ‘आपण कोण’ या दुसऱ्या प्रकरणात प्रविष्ट केली आहे. द्विरुक्तीचा दोष टाळण्यासाठी ती येथे देण्याची आवश्यकता नाही. सर्व कुटुंबीयांनी ती वाचावी व विशेषत आपल्या मुलाबाळास सांगावी. म्हणजे या विषयासंबंधीची अनभिज्ञता आपल्या कुटुंबात तरी राहणार नाही.
    जमा झालेल्या प्रत्येक माहितीपत्रकाची एक लहानशी वंशावळ प्रथम तयार केली. या माहितीपत्रकामुळे, पत्रक पाठविणाऱ्याचा जन्मसन माहीत झाला व तो प्रत्येकाच्या नावापुढे नोंदविला आहे. ज्यांनी वडिलांचा जन्मसन नोंदविला होता तोही नोंदविला आहे. काहीजणांनी वडिलांचा मृत्यूसन व त्यावेळी ते किती वर्षांचे होते ते नोंदविले होते. अशावेळी वडिलांचा जन्मसन ठरविता आला. साधारण २५ वर्षांची एक पिढी धरली जाते. त्या हिशेबाने प्रत्येक वंशावळीच्या मूळपुरुषाचा जन्मसन त्या त्या नावापुढे ठेवल्याने त्या कुटुंबाच्या पूर्वजांची कालमर्यादा माहीत झाली. जमलेल्या अशा माहितीपत्रकांवरून व चुलत व चुलतचुलत बांधवांच्या अशाच जमविलेल्या वंशावळीतून एक मोठा वृक्ष तयार करण्यात आला. अशा त-हेने वैशंपायन घराण्याचे दोन वंशवृक्ष तयार झाले आहेत. वैशंपायन-१ चा मूळ पुरुष गोविंद (गोंदबा) यांचा जन्मसन १७२५ च्या सुमारास तर वैशंपायन-२ चा मूळ पुरुष हरि यांचा जन्मसन १७२५ च्या आसपास असावा असे लक्षात आले. परंतु गोंदबा किंवा हरि यांच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख कोणीही न केल्यामुळे ही दोन स्वतंत्र कुळे म्हणून या ग्रंथात प्रविष्ट केली आहेत. दोन्हीही वंशवृक्ष १२ पिढ्यांचे आहेत. उपलब्ध माहितीनुसार आगरवायंगणी-१ या घराण्यातील स्थानांतरांच्या माहितीचा अभ्यास करून आगरवायंगणी शाखेव्यतिरिक्त (१) गिम्हवणे शाखा, (२) गव्हे शाखा, (३) बार्शी शाखा अशा तीन शाखांची स्वतंत्र विभागणी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आगरवायंगणी-२ या कुटातही (१) वेलदूर शाखा, (२) पेण-नाशिक शाखा, (३) नाशिक शाखा, (४) ठाणे शाखा, (५) आसरखेडा- बागलाण-नाशिक शाखा, (६) पांढरकवडा शाखा अशा सहा प्रमुख शाखांत विभागणी केली आहे. मूळ गरवायंगणीपासून स्थानांतरांचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. आणखी माहिती मिळाली तर या शाखांचा विस्तार करणे शक्य होईल. याच पद्धतीस अनुसरून पिंपळखरेसहस्रबुद्धे घराण्यातही (१) मनियाखेडी (म. प्र.) व (२) भडगाव (जि. जळगाव) अशा दोन शाखा स्वतंत्रपणे विभागण्याचा प्रयत्न केला आहे.
    पिंपळखरे आडनावाच्या या ३४ माहितीपत्रकांचा अभ्यास करणे अकोल्याचे श्री. य. र. सहस्रबुद्धे यांनी याविषयी केलेल्या संशोधनात्मक वंशावळीमुळे बरेच सोपे झाले. तोही वंशवृक्ष ११ पिढ्यांचा असून मूळ पुरुष विश्वनाथ यांचा जन्मसन १६८० च्या सुमाराचा आहे. पिंपळखरे हे सुद्धा पूर्वीचे वैशंपायनच आहेत. यासंबंधी माहितीची चर्चा पुढे केली आहे. अशा परिस्थितीत वैशंपायन-१, वैशंपायन-२ व पिंपळखरे, नंतर सहस्रबुद्धे झाले ते एकाच कुलाचे प्रतिनिधी असणे अशक्य दिसत नाही. इ.स. १६८० ते १७२५ हा काळ जवळजवळ दोन पिढ्यांचा आहे. या दोन पिढ्यांसंबंधी खात्रीलायक माहिती जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे तीनही वंशवृक्ष स्वतंत्रपणे प्रविष्ट करणे योग्य होईल.
    वैशंपायन सहस्रबुद्धे केव्हा झाले यासंबंधी अजून फारसा समाधानकारक पुरावा उपलब्ध नाही. परंतु पिंपळखरे कुलातील नारोपंत दादो यांनी इ.स. १७७४ साली व त्यांच्या स्वत:च्या साधारपणे ४४ व्या वर्षी त्र्यंबकेश्वर येथील कुलोपाध्याय यांच्याकडे जी नोंद केली आहे. त्यात आपले वडील, आजोबा हे सहस्रबुद्धे नावाने नोंदविले आहे. त्यावरून वैशंपायनांचा सहस्रबुद्धे होण्याचा काळ निश्चितपणे इ.स. १६८० च्या आधीचा असावा असे दिसते.
    या घराण्यातील पूर्वजांनी थोड्या कालावधीत अनेक स्थानांतरे केलेली दिसतात. त्यासंबंधी संशोधनात्मक विवेचन पिंपळखरे-सहस्रबुद्धे या भागात पाहावयास मिळेल. वैशंपायन-१ व वैशंपायन-२ यांचे मूळ गाव आगरवायंगणी आहे. त्या गावाची माहिती व त्या गावाचा प्राकृतिक नकाशा वर दिला आहे.

    आगरवायंगणी:

    पूर्ववाहिनी पंचनदी आगरवायंगणी गावाच्या पश्चिमेस काही थोड्या अंतरावरच उगम पावते. मध्यम उंचीच्या टेकड्या. आगरवायंगणी गावास तिन्ही बाजूंनी वेढलेले असून पंचनदीच्या काहीशा अरुंद खोऱ्यातच हे गाव वसलेले आहे. या गावाच्या पूर्वेस कळकी, सातेरे, केळील या गावांच्या हद्दी, पश्चिमेस वणौशी, दक्षिणेस उसगाव व ओणनवसे व उत्तरेस उत्तर-दक्षिण । वाहणाऱ्या नदी-नाल्यांशेजारचे मळे अशा या गावच्या चतु:सीमा आहेत. आगरवायंगणी एक शेती-बागायती गाव असून तांदुळाव्यतिरिक्त सुपारी व आंबे या नगदी पिकांचा हा गाव मानला जातो. गावची जनसंख्या जवळजवळ १८०० असून सहस्रबुद्धे घराण्याचे पूर्वी बारा उंबरठे होते. आजमितीस सहा उंबरठे आहेत.
    गावात सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. एक खाजगी डॉक्टर व परिचारिका यांच्यामुळे औषधपाण्याची व्यवस्था आहे. बाजारहाटासाठी जवळजवळ २० किलोमीटर अंतरावरील दाभोळ व दापोली या गावांशी संपर्क साधावा लागतो. दोन्ही ठिकाणांहून बसने जाता-येता येते. तसेच दापोली-पुणे, दापोली-भोरमार्गे पुणे, दापोली-मुंबई, दापोली-परळ, दापोली-बोरिवली अशा पाच बसेस पुण्या-मुंबईस जाण्यास व त्याच पाच उलट दापोलीस येण्यासाठी मिळतात. याव्यतिरिक्त दापोली-ओणनवसे, दापोली-उंबरघर, दापोली-कळकी, दापोली-भापेण अशा सकाळ-दुपार मिळून आठ बसेस वाटेत आगरवायंगणीस थांबतात.

    आगरवायंगणी

    कोकण रेल्वेचे खेड हे जवळचे रेल्वे मार्गावरचे स्टेशन आहे. श्री शिवेश्वर मंदिर व हनुमान मंदिर ही गावातील दोन प्रमुख मंदिरे आहेत. शिवेश्वर मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून पंचनदी नदीच्या काठी असल्याने देवळाच्या बाजूस दगडी तटबंदी आहे. श्रींच्या अभिषेकासाठी जुन्या काळापासून चालत आलेले दहा रुपये अनुदान आजही चालू आहे. एकनाथषष्ठी व हनुमान जयंती हे दोन उत्सव आहेत. आपले एक पूर्वज कै. त्रिंबक विरेश्वर सहस्रबुद्धे यांनी जवळजवळ १०० वर्षांपासून गावात एकनाथषष्ठी उत्सव सुरू केला व तो आजतागायत चालू आहे. श्री. दामोदर विठ्ठल सहस्रबुद्धे या गावचे प्रमुख ग्रामस्थ असून ते गावातील मानकरी आहेत.

    पिंपळखरे घराणे प्रास्ताविक:

    नित्युंदनगोत्री सहस्रबुद्धे पूर्वीचे पिंपळखरे या नावाने ओळखले जातात. या सहस्रबुद्धे घराण्याचा गेल्या ४/५ पिढ्यांचा वंशवृक्ष प्रामुख्याने मध्य प्रदेशातील हरदा या गावाजवळ ‘मनियाखेडी’ या खेडेगावाशी संबंधित आहे. एकंदर वंशवृक्ष काहीसा सीमित आहे. पिंपळखरे हे पूर्वीचे नाव सांगणारी आणखी एक वंशावळ महाराष्ट्रातील जळगावजवळ ‘भडगाव’ हे मूळ गाव सांगणारी आहे. परंतु या दोन्ही कुटांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात ‘पंचनदी’ या नावाचे एक ग्रामपंचायती गाव आहे. नित्युंदनगोत्री सहस्रबुद्धे पूर्वीचे वैशंपायन नाव असणारी कुटुंबे अनेक आहेत व त्यांचे मूळ गाव आगरवायंगणी आहे. हे गाव पंचनदी गावाच्या पूर्वेस ८/९ कि.मी. अंतरावर आहे. या दोन्ही ठिकाणांचा एकत्र नकाशा सोबत जोडला आहे. आगरवायंगणी गावासंबंधी माहिती पूर्वी आली आहे.
    पंचनदी गावाच्या पूर्वेस वैणाशीगाव, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस आघारी व उत्तरेस बोरिवली अशा या गावाच्या चतु:सीमा आहेत. सध्या पंचनदी गावात एकही सहस्रबुद्धे (पिंपळखरे) यांचे घर नाही. गावाची जनसंख्या अंदाजे अडीच हजारापर्यंत आहे. पंचनदीस पोहोचण्यासाठी जवळची मोठी दोन गावे म्हणजे दापोली व दाभोळ. दापोलीवैणाशीमार्गे पंचनदी अशा जवळजवळ १५ बसेस रोज येजा करतात. परळ-दाभोळ, मुंबई-कोळथर या मुंबईहून येणाऱ्या-जाणाऱ्या तीन बसेस पंचनदीस थांबतात. आता नवीनच झालेले कोकण रेल्वेचे ‘खेड’ हे स्टेशन पंचनदी गावास जवळ आहे.
    येथे सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा १० व्या इयत्तेपर्यंत असून, गावात तीन खासगी दवाखाने आहेत. देवदेवतांचे उत्सव खालीलप्रमाणे होतात.
    (१) मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तजयंती उत्सव हा पाच दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.
    सदर देवस्थान शंकराचे असून, श्रीसप्तेश्वर मंदिर म्हणून ते प्रसिद्ध आहे. परंतु दत्ताचा उत्सव मात्र या मंदिरात अनेक पिढ्यांपासून केला जातो.
    (२) ग्रामदेवता श्री देवभैरी असून शिमग्याचा उत्सव व कार्तिकी पौर्णिमेस भैरव जयंती साजरी होते.
    (३) चैत्र शुद्ध पौर्णिमेस श्री देव मारुतीचा उत्सव साजरा
    होतो. या मारुतीस ‘पेठेतला मारुती’ असे संबोधिले जाते.
    अकोला येथील श्री. यशवंत रघुनाथ सहस्रबुद्धे मनियाखेडी घराण्याचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी त्यांच्या कुलासंबंधी बरेचसे संशोधन करून त्र्यंबकेश्वर येथील कुलोपाध्यायांकडून इ.स. १७५४ ते इ. स. १८५१ अशा जवळजवळ १०० वर्षांतील त्यांच्या पूर्वजांच्या यात्रा-भेटींचे उतारे मिळवून ११ पिढ्यांचा वंशवृक्ष तयार केला आहे. सांप्रतच्या कुलग्रंथानिमित्ताने या घराण्यातील जी २६ संबंधित माहितीपत्रके मिळाली आहेत त्यामधील माहितीशी तो पूर्णपणे जुळणारा असल्याने तोच या कुलग्रंथात उद्धृत केला आहे. या वंशावळीच्या बांधणीला त्र्यंबकेश्वरी नोंदविलेल्या तीन प्रमुख नोंदींचा मोडीतील पुरावा त्यांच्या बाळबोधी तर्जुम्यासह सूची क्र. १ यात समाविष्ट केला आहे.
    या वंशवृक्षातील ९ व्या पिढीतील जवळपास सर्वांनीच आपापले जन्मसन नोंदविलेले आहेत. त्यानुसार ८ व्या पिढीतील काही ज्येष्ठ व्यक्तींपैकी एक व्यक्ती श्री. रघुनाथ यांचा जन्मसन १८९५ चा आहे. येथून मागे २५ वर्षांची एक पिढी या हिशेबाने आठ पिढ्या मागे असलेले श्री. विश्वनाथ यांचा जन्मकाळ इ.स. १७०० च्या आधीचा येतो. त्र्यंबकेश्वर येथील पहिला ज्ञात लेख नारायण दादो उर्फ नारोपंत या तिसऱ्या पिढीतील प्रतिनिधीचा इ.स. १७५४ चा आहे. या लेखात त्यांचे मूळ गाव पंचनदी व हल्ली मुक्काम पिंपळखडे असे नोंदविले आहे.
    आपल्या कुलग्रंथाच्या संशोधन कार्यासाठी पंचनदी गावाच्या सर्व्हे नंबर दाखविणाऱ्या नकाशाची पाहणी करताना पंचनदी गावालगतच्या शिवारात “पिंपळखरी’ नावाचे शिवार असल्याचा पत्ता प्रथम लागला. या भूभागालाच पूर्वी पिंपळखडे असे म्हटले जात असणार. यासंबंधी चौकशी करता पंचनदी गावाचे सरपंच श्री. वासुदेवराव वैशंपायन यांनी पंचनदी गावच्या आजच्या सर्व्ह नं.४७ या भागास ‘पिंपळखरी’ या नावाने ओळखले जाते, असे कळविले आहे. त्याच पत्रातील आणखी एक महत्त्वाची माहिती अशी आहे की, त्या शिवाराच्या जागी इ.स. १९९३ साली कालवा खणण्याचे काम चालू असता त्यांना त्या जागी दगडी जाती, पाटे-वरवंटे, तुळशी वृंदावने इत्यादी मनुष्यवस्ती असल्याचे पुरावेही मिळाले. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, त्याकाळी या कुटुंबाचे पिंपळखडे हे वस्तीचे गाव असावे.
    पिंपळखडेकर वैशंपायन असे संबोधता संबोधता ‘वैशंपायन’ हे नाव जाऊन सुटसुटीतपणाच्या निमित्ताने नुसते पिंपळखडे व ‘ड’चा ‘र’ होतो या भाषाशास्त्राच्या अनुभवाने ‘पिंपळखरे’ हे नाव कायम झाले असावे. कोकणातील बार्बरा चिपळूणकर, कोतवडेकर सहस्रबुद्धे अशा पूर्वीच्या नोंदीतून नुसते चिपळूणकर, नुसते सहस्रबुद्धे ही नावे प्रचारात आल्याचे अनेक कोकणस्थांत दिसते. त्यास अनुसरूनच नुसते पिंपळखरे हे नाव कायम झाले असावे, असे म्हणण्यास प्रत्यवाय असू नये. अशात-हेने सध्याचे पिंपळखरे-सहस्रबुद्धे हे मूळचे वैशंपायन-सहस्रबुद्धे हे सिद्ध होण्याजोगा पुरावा प्रस्तुत कुलग्रंथात प्रथम सादर करण्याची या ग्रंथाची ही एक उपलब्धी समजण्यास हरकत नसावी.
    श्री. य. र. सहस्रबुद्धे यांनी नोंदविलेल्या माहितीनुसार या घराण्यातील पूर्वजांनी फार लवकर लवकर ग्रामबदल केलेले दिसतात. इ.स. १७७४ च्यागोपाळ नारोपंत यांच्या नावे नोंदविलेली नोंद अर्धवट असून, त्यात हल्लीचा मुक्काम या सदरात काही नोंदविलेले नाही. परंतु त्यांचे कनिष्ठ बंधू रामचंद्र नारोपंत यांनी इ. स. १७७८ साली तसेच इ.स. १७८९ साली लिहिलेल्या दोन लेखांत आपले सध्याचे राहण्याचे गाव रायगड जिल्ह्यातील ‘अष्टमी’ असे लिहिले आहे. या दोन्ही लेखांत मूळ गाव मात्र पंचनदी हेच दर्शविले आहे. याचा अर्थ असा दिसतो की, पिंपळखडे येथून पहिले स्थानांतर इ.स. १७५४ नंतरच्या पुढील कालखंडात झाले असावे. रामचंद्र नारोपंतांच्या इ.स. १७९० मधील तिसऱ्या लेखात राहण्याचे ठिकाण ब-हाणपूर (निमाड प्रांत मध्य प्रदेश) दाखविले असून, सहाव्या पिढीचे प्रतिनिधी दाजीबा केशवराव यांच्या इ.स. १८५१ सालच्या लेखात राहण्याचे गाव हरदा नोंदविले आहे. मध्य प्रदेशातील हरदा, टिमरणी अशा गावी काही थोडा थोडा काळ वस्ती केल्यानंतर इ.स. १८५० च्या सुमारास हे कुटुंब मनियाखेडी येथे कायम स्थायिक झाले. अशात-हेने या घराण्याची ६ स्थानांतरे श्री. य. र. सहस्रबुद्धे यांनी पुराव्यानिशी मांडली आहे. ती सारांश रूपाने खाली देत आहे.

    पिंपळखरे – सहस्रबुद्धे घराण्यातील पूर्वजांनी त्र्यंबकेश्वरी जाऊन धर्मकार्ये वेळोवेळी केली. त्या प्रत्येक वेळची संकलित माहिती

    लेख काळ लेख लिहिणाऱ्याचे नाव व पिढी मूळ गाव सध्या वस्ती आडनाव
    इ.स. १७५४ नारायण दादो (३) पंचनदी पिंपळखडे सहस्रबुद्धे
    इ.स. १७७४ गोपाळ नारोपंत (४) माहिती पुरेशी उपलब्ध नाही.
    इ.स. १७७८ रामचंद्र नारोपत (४) पंचनदी अष्टमी सहस्रबुद्धे
    इ.स. १७८९ रामचंद्र नारोपत (४) पंचनदी अष्टमी सहस्रबुद्धे
    इ.स. १७९० रामचंद्र नारोपत (४) पंचनदी बऱ्हाणपूर सहस्रबुद्धे
    इ.स. १८२३ आनंदीबाई भ्र दादोजी (४) पंचनदी बऱ्हाणपूर सहस्रबुद्धे
    इ.स. १८५१ दाजीबा केशवराव (६) पंचनदी हरदा सहस्रबुद्धे

    इ.स. १८५१ पासून हरदा, टिमारणी अशी थोड्या काळाची स्थानांतरे करून इ.स. १८५० या काळा मनियाखेडी येथे स्थायिक झाले असावेत व त्यानंतर आता जवळजवळ १५० वर्षे तेथेच कायम स्थायिक आहेत.
    इ. स. १६८० च्या सुमारास पिंपळखरे-सहस्रबुद्धे घराण्याचा ज्ञात मूळ पुरुष यांच्यापासून इ.स. १७५४ पर्यत पंचनदी मूळ गाद, हल्ली मुक्काम पिंपळखडे अशा नोंदीनंतर इ. स.१७७४ साली, हल्ली मुक्काम अष्टमी अशी जी नोंद आहे त्यावरून जवळजवळ १०० वर्षे स्थायिक झालेले गाव सोडून व तेसुद्धा जाती, पाटे, वरवंटे, तुळशी वृंदावने अशा दगडी जड वस्तू जागच्या जागी सोडून जेव्हा एखाद्या कुटुंबाचे अचानक वाटणारे स्थानांतर झाले यास काय कारण असावे अशी जिज्ञासा निर्माण झाली. त्यादृष्टीने तपास करताना अशी परिस्थिती त्यावेळी के वळ अचानक काहीतरी अस्मानी सुलतानी संकट आले असले पाहिजे, अशी शंका निर्माण होते. त्या काळातील सुलतानी संकटाची माहिती ज्ञात नाही. दुसऱ्या पर्यायाचा विचार करताना काही गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या. त्यासंबंधी अधिक तपास करताना निदर्शनास आलेल्या काही बाबी ठळकपणे लक्षात आल्या. त्या संक्षेपाने अशा आहेत.
    (१) पिंपळखडे वस्ती (सर्व्हे नं. ४७, पंचनदी गाव) हल्लीच्या पंचनदी गावाचा उत्तरेस अंदाजे २५० मीटर अंतरावर आहे. हे ठिकाण पंचनदीच्या अगदी जवळ आहे.
    (२) पश्चिमाभिमुखी पंचनदीचा प्रवाह काहीसा वैशिष्ट्यपूर्ण आहे. गावाच्या थोडे पश्चिमेस श्रीसप्तेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराच्या पूर्वेकडे असलेल्या आदीवाडी पासून व दुमदेववाडी-पासून निघणारे दोन ओढे मुख्य पंचनदीस मिळतात. तेथपर्यंतचा नदीचा प्रवाह पूर्व-पश्चिम दिशेने अगदी सरळ रेषेत असून, त्याची लांबी दीड एक कि.मी. आहे. हा प्रवाह एका अरुंद व काहीशा खोल अशा घळीतून वाहतो.
    (३) नदी समुद्रास मिळण्याचे ठिकाण गावापासून जवळजवळ दीड कि.मी. अंतरावर आहे. वास्तविक नदीसमुद्र संगामजवळचा भूभाग, म्हणजे खाडीलगतचा भूभाग सपाट असावयास पाहिजे. अशा परिस्थितीत एखाद्या चिंचोळ्या दरीतून हा प्रवाह सर्वसाधारणपणे भौगोलिक परिस्थितीपेक्षा वेगळा आहे. भूभागात असणाऱ्या एखाद्या सरळरेषेत असणाऱ्या भू-प्रस्तर भ्रंशामुळे अशी परिस्थिती भूवैज्ञानिकदृष्ट्या निर्माण होण्याची शक्यता दिसते.
    (४) या दृष्टीने पंचनदी गावाचा भूवैज्ञानिक नकाशा तपासताना असे दिसले की, पंचनदी व समुद्र यांच्या संगमापासून ते सध्याच्या गावाच्या पश्चिमेपर्यंत भूवैज्ञानिक परिभाषेत ज्यास ‘मरीन शेल्फ’ म्हणतात, ते स्पष्टपणे दिसू लागते.या मरीन शेल्फच्या अवसादनाची जाडी दोन अडीच मीटर असावी. अशी मरीन शेल्फ्स गेल्या आठ-दहा हजार वर्षांत तयार झाल्यामुळे तेथील वाळू-प्रस्तर फारसे कठीण झालेले नसतात.
    (५) या शेल्फच्या पूर्व टोकाशी पूर्वीची पिंपळखडे ही वस्ती असून, ती पंचनदीच्या नदी-अंशाच्या पश्चिमेस अगदी लागून आहे.
    (६) भारताचा पश्चिम किनारा हा एका फार मोठ्या सीमावर्ती भ्रंशाचा साक्षीदार आहे, असे मोठाले भ्रंश जेव्हा होत त्यावेळी त्या भ्रंशास समांतर असणारे अनेक छोटे छोटे भ्रंश निर्माण होतात. उपग्रहावरून घेतलेल्या या भूभागाच्या अभ्यासात अशा भ्रंशरेषा स्पष्टपणे दिसतात. अशी एक रेषा पंचनदी गावाच्या पश्चिमेस व पंचनदी भ्रंशास छेदून जाते. या दोन्ही भ्रंशाच्या भूभागातच पिंपळखडे ही वस्ती आहे. म्हणजेच या दोन भ्रंशांच्या दुआबात या वस्तीची जागा आहे. जवळपासच्या होणाऱ्या एखाद्या भूकंपामुळे या आधीच्याच काहीशा कच्च्या भागात त्याचे परिणाम दिसून येतात.
    (७) भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत गेल्या ६०० वर्षात जे भूकंप झाले त्याची नोंद आता भूकंप कॅटलॉगमध्ये पाहावयास मिळते. त्यानुसार इ.स. १७६४ साली जंजिरा बंदराजवळ असा भूकंप झाल्याची नोंद आहे.
    (८) या भूकंपामुळे वर निर्देश केलेल्या दोन भ्रंशाच्या दुआबातला केवळ दोन-अडीच मीटर जाडीचा काहीशा कच्च्या अवस्थेत असलेला भूभाग घसरणे-खचणे सहज शक्य असते. अशा त-हेच्या अकल्पित घटनेमुळे ती वस्ती सोडताना जड वस्तू जागच्या जागी सोडून जाणे शक्य दिसते.
    (९) १९९३ साली सर्व्हे नं. ४७ च्या परिसरातून जाणाऱ्या कॅनॉलच्या खोदकामाच्या वेळी जमिनीपासन दीड-दोन मीटर खोलीवर पाटे-वरवंटे, जाती, तुळशी वृंदावने अशा वस्तू इतस्तत: पसरलेल्या सापडल्या. ही बाब अचानक घटनेची साक्षीदार आहे.
    (१०) या सर्व परिस्थितीचा विचार करता पिंपळखडे या वस्तीचा भूभाग एकाएकी खचल्यामुळे अनेक वर्षांची कायम वस्ती सोडून जीव व वित्त रक्षणासाठी हे कुटुंब प्रथम रोह्याजवळ अष्टमी या गावी गेले असावे. मनियाखेडी या गावी कायमवस्ती होईपर्यंत झालेली एकंदर सहा स्थित्यंतरे या अनिश्चित परिस्थितीचे दर्शन घडवितात.
    (११) वरील सर्व वर्णन शेजारच्या भूवैज्ञानिक नकाशात पाहावयास मिळेल.

    कुलग्रंथाच्या दृष्टीने पंचनदी हेच मूळगाव सांगणाऱ्या भडगाव शाखेचा संबंध या मोठ्या घराण्याशी वास्तविक जोडता आला पाहिजे. परंतु खात्रीलायक माहितीच्या अभावाने तसे करता न आल्याने कूट क्र. २ असे त्यास स्वतंत्र दाखविले आहे. या कुटाचा मूळ पुरुष विठ्ठल यांचा जन्मसन अंदाजे १८०० च्या आसपास हा वृक्ष मूळ पुरुषापासून सहा पिढ्यांचा आहे. मनियाखेडीच्या वंशवृक्षात ५ व्या पिढीचा काळ इ.स. १८०० च्या आधीचा असून, त्या पिढीचे प्रतिनिधी नारायण, राघो व महादेव हे तीन पुरुष आहेत. त्यांचा वंशविस्तार अज्ञात म्हणून नोंदविला आहे. कुलवृक्ष जुळवणुकीत अनेकदा असा अनुभव येतो की, मूळ नावाऐवजी टोपणनावाने नोंद झालेली असते. विठ्ठल हे नाव असे टोपणनाव आहे हे जर सिद्ध झाले तर दोन्ही वंशवृक्षांचा एक वृक्ष करणे शक्य आहे. सद्य:स्थितीत ही शक्यता नोंदविण्यापेक्षा ठामपणे ठरविता येत नसल्याने एक स्वतंत्र कूट म्हणून भडगाव शाखेला येथे प्रविष्ट केले आहे.
    वैशंपायन-पिंपळखरे या प्रकरणाच्या शेवटी आणखी एक उल्लेख करणे जरूर आहे. वैशंपायनांच्या एका कुटुंबास पिंपळखरे या नावाने ओळखले जाते. याविषयीचा विचार वर आला आहे. वैशंपायन-सहस्रबुद्धे यांचे मूळ गाव आगरवायंगणी सांगितले जाते व ते गेले १२५/१५० वर्षापासून आहे. सध्या पुण्यास वैशंपायनांच्या कुलवृत्तान्ताचे काम सुरू झाले आहे. त्यांच्याकडे चौकशी करताना असे समजले की, त्यांच्याकडे जमलेल्या एकाही माहितीपत्रकात वैशंपायन आपले मूळ गाव आगरवायंगणी म्हणून नोंदवीत नाहीत.पंचनदी व आसूद या दोन गावांचाच फक्त उल्लेख सापडतो. आगरवायंगणीचे एक वृद्ध नागरिक श्री. दामोदर विठ्ठल यांच्याकडे चौकशी करताना त्यांनी कळविले आहे की, आगरवायंगणी गावी कोणीही वैशंपायनांचा घरोटा आज नाही व त्यांच्या माहितीप्रमाणे तो कधीही नव्हता. तेव्हा असा एक संशय निर्माण होतो की, पंचनदी गावनजीकच्या या भागातून जी पळापळ झाली त्यात एक कुटुंब कोणाजवळच्या नातेसंबंधात अष्टमी गावास गेले तर बाकीची कुटुंबे पंचनदी गावाच्या पूर्वेस सात-आठ कि.मी. असलेल्या आगरवायंगणी गावात आश्रयास गेले असावे आणि तेच आपले मूळ गाव गेले १२५/१५० वर्षांच्या परंपरेने सांगू लागले. हा काहीसा तर्काचा व संशोधनाचा विषय व्हावा. सद्य:परिस्थितीत अशा शक्यतेची केवळ एक तर्क कल्पना नोंदवून हा विषय येथेच संपवीत आहोत.

    आगर वायंगणी – पंचनदी गावांचा भूवैज्ञानिक नकाशा

    चित्तपावन सहस्रबुद्धे कुटुंबीयांतील गेल्या जवळजवळ ३०० वर्षांत घडलेली सामाजिक/सांस्कृतिक परिवर्तने

    कुलवृत्तान्त हाही एक इतिहास आहे. इतिहासात भूतकालीन माहिती येतेच, परंतु त्याचबरोबर पूर्वीच्या ज्ञात काळापासून तो चालू पिढीच्या कालापर्यंतची माहिती कुलग्रंथात नोंदवावयाची असते. गेल्या ३०० / ३५० वर्षात आपल्या कुटुंबसंस्थेत झालेल्या सामाजिक/सांस्कृतिक परिवर्तनाचा आढावा घेण्याचे उद्देशाने व पुढे जेव्हा चित्तपावन ज्ञाती संबंधात अशाच परिवर्तनाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस एका कुलाचा नोंदविलेला अनुभव उपयोगी पडावा, या उद्देशाने हे शेवटचे प्रकरण आपल्या ग्रंथात समाविष्ट करीत आहोत. स्वत:बद्दल अथवा कुटुंबीयांबद्दल माहितीची नोंद करण्याची प्रथा आपल्याकडे जवळजवळ नाही. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबीयांच्या सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाचा नेटका आढावा घेणे कठीण होते. जुनी कागद-पत्रे, सनदा, त्या त्या काळातील झालेल्या मतभेदांबाबतची झालेली निकालपत्रे, इत्यादी साधनांबरोबरच पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या दंतकथा, आख्यायिका, इत्यादी साधनांवर अवलंबून राहावे लागते.
    समाजशास्त्रानुसार सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीच्या स्थित्यंतरांचे स्थूलमानाने चार टप्पे मानले जातात. पहिला टप्पा ‘हंटिगस्टेज’, दुसरा ‘नोमॅडिक’, तिसरा ‘ अ‍ॅग्रिकल्चरल’ व चौथा टप्पा इंडस्ट्रियल स्टेजचा. आपल्या देशाच्या सद्य:स्थितीचा विचार करताना आपल्या कुटुंबीयांच्या गेल्या ३०० / ३५० वर्षांतील परिवर्तनाचा काळ हा तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या संक्रमणकाळाचा म्हणावा लागेल.
    सामाजिक / सांस्कृतिक परिवर्तने बव्हंशी राजकीय परिस्थितीत व तदनुसार होणारी स्थित्यंतरे यावर अवलंबून असतात. चित्तपावन ज्ञातीबाबतीत एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे की, या ज्ञातीच्या उन्नतीचा काळ हा पेशवाईच्या उदयाशी संबंधित आहे. यादृष्टीने आपल्या संकल्पित परिवर्तनाचा आढावा टप्प्याटप्प्याने घ्यावयाचा झाल्यास तो पेशवाईच्या चढउताराशी जुळवून घेणे सयुक्तिक ठरेल. यादृष्टीने हा आढावा चार कालखंडांच्या टप्प्यात घेण्याचे ठरविले आहे. ते चार टप्पे असे –
    १) इसवी सन १७०० च्या पूर्वीपासून पेशवाई स्थिर होण्याचा म्हणजे १७६० पर्यंतचा काळ.
    २) पेशवाईच्या अत्यंत उन्नतीचा काळ. १७६१ च्या पानिपत पराभवाचा व नंतरचा सावरण्याचा काळ, १८१८ साली पेशवाईचा उत्तरार्ध व शेवट हा काळ आणि शेवटी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धापर्यंतचा काळ म्हणजे अदमासे १७६१ ते १८७५ चा काळ.
    ३) १८७५ ते १९५० हा ब्रिटिश अमदानीच्या सुवर्णकाळापासून ते १९४७ च्या आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीला स्थिरता येण्याचा काळ व
    ४) १९५० नंतरचा आजपर्यंतचा काळ.
    अशा चार टप्प्यांत आपल्यात झालेल्या सामाजिक/ सांस्कृतिक परिवर्तनाचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.

    इसवी सन १७०० पूर्व ते १७५०:

    सह्याद्री पर्वतावरून निघून पश्चिमेस थोड्याच अंतरावर दोन्ही तीरांवर आपल्या पूर्वजांनी वस्ती केलेली आढळते. कोतवड्याचे धामेळवाडा, गावणवाडा, वेरखळवाडा इत्यादी एकूण सहा वाड्यांतील वस्ती किंवा पंचनदीच्या पंचनदी व आगरवायंगणीच्या दक्षिण तीरावर वस्ती करून राहणारे आपले पूर्वज कठीण प्राकृतिक परिस्थितीशी झगडत होते. समुद्रकिनाऱ्याजवळच्या सपाटशा जमिनी बहुतांशी खाऱ्या असावयाच्या. डोंगर उतारावर एक वर्षाआड पिकणारी वरी-नाचणी, रुंद सपाटी असणारी कातळे जांभ्या दगडांनी झाकलेली असत. त्यावर गवतसुद्धा उगवत नसे. अशा परिस्थितीत शेतीवर उदरनिर्वाह करणे ही गोष्ट गरिबीची. परिस्थिती निर्माण करणारी होती. या परिस्थितीमुळे जमिनीपासून पुरेसे उत्पन्न काढण्यासाठी अत्यंत मेहनत करून योग्य ठिकाणी बांध-बंधारे घालून जमिनीचा खारेपणा घालवून, ती सुपीक करणे अत्यंत कष्टदायक होते.
    तो काळही समुद्रकिनाऱ्यावर राजकीय सत्ता मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी आदिलशाही किंवा सर्वसाधारणपणे मोगली सत्तेत चाललेल्या ओढाताणीचा होता. त्यामुळे अत्यंत श्रमाने जमीन सुपीक करण्याच्या कष्टाची कदरही फारशी घेतली जात नसावी. ही परिस्थिती पेशवाईच्या काळात काही प्रमाणात सुधारलेली दिसते. याचे एक उत्तम उदाहरण आपल्याच केळये-मजगाव घराण्यातील देता येईल. या घराण्यातील पुरुषांनी अतिकष्टाने तयार केलेल्या जमिनीवर मालकीहक्क मिळावा किंवा काही प्रमाणात करात सूट मिळावी यासाठी पेशव्यांच्याकडे अर्ज केला होता. त्यातला काही भाग अस्सल नकलेवरून येथे प्रस्तुत करीत आहोत. “सदाशिव बिनकृष्ण गणेश, रामाजी बल्लाळ व लक्ष्मण बल्लाळ, उपनाम सहस्रबुद्धे, गोत्र शांडिल्य, सूत्र आश्वलायन, देसाई-सहस्रबुद्धे यांनी मौजे केळये, ता. मजकूर येथे आपले खुद्द ठिकाण. फणस, माड, वरकस भरड व डागोल नदीचे किनारा दुथडी जंगल जमीन होती. त्यातील जंगल तोडून, नदीचे दुथडी बांध बांधून पूल बांधिला व नदीचे दोन्हीकडून पाण्याचे पाट खणून शेतात आणले. फणस, माड, ठिकाणाचे जमिनीतून ओढा पूर्वेकडे येत होता. तो बांधून बाहेरून काढीला व विहीर दोन शेतात पाडून चिरेबंदी बांधिल्या. त्यास बहोत श्रम व पैका खर्च जाहला. दोन बिघे जमीन तयार झाली.सदरहू जमिनीपैकी निमेजमिनीचा माफी व इस्तोव्याचा कौल देवावा. बाकी निमे जमीन राहिली त्यास स्वामींनी कृपाळू होऊन, आम्ही कुटुंबवत्सल आहोत, योगक्षेम खर्चातून इनाम करून द्यावी.” दोन बिघे जमिनीसाठी केलेला एवढा खटाटोपपाहिला की कृषीविषयक कठीण परिस्थितीची कल्पना येते. हा अर्ज मान्य करण्यात आला. तो काळही इ. स. १७८५ च्या आसपासचा. अशा कठीण नैसर्गिक परिस्थितीशी पिढ्यान् पिढ्या सामना करावा लागल्याने चिकाटी, दीर्घोद्योग, स्वावलंबन व अल्पसंतोषी वृत्ती हा गुणसमुच्चय चित्तपावनांचा स्थायी स्वभाव झालेला दिसतो.
    पेशवाई स्थिरावल्यानंतर, श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या खटपटीने, चित्तपावन ब्राह्मणांना कोणत्याही धर्मकार्यात इतर ब्राह्मणांच्या बरोबरीची मान्यता मिळाली. त्यापूर्वी ती नसल्यामुळे शेतीव्यतिरिक्त जोडधंदा म्हणून भिक्षुकी करण्यास फारसा वाव नसावा. वेदवेदांगांचे अध्ययन, अध्यापन हाच एक वेळ घालविण्याचा किंवा पूरक उपजीविकेचा मार्ग त्यांच्यापुढे असावा. यातूनच पुराण सांगणे, वेदपाठशाळा काढणे असे पूरक उद्योग ते करीत असावेत असे दिसते. गोविंदभट्ट वाईकर सहस्रबुद्धे यांची नियुक्ती पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील गणेश महालात इ. स.१७५० च्या सुमारास झाली. सोलापूर जिल्हयातील तिप्पणशास्त्री सहस्रबुद्धे व त्यांचे चिरंजीव रामशास्त्री ह्यांनी दोन पिढ्या वेदपाठशाळा चालविली. मोडनिंब घराण्यातील भानुदास सहस्रबुद्धे यांनी वयाच्या १५ व्या वर्षी कोतवडे सोडून काशी गाठली. तेथे १२/१५ वर्षे विद्याभ्यास केल्यावर एक दशग्रंथी विद्वान म्हणून पुढे गोदावरी तीरावर पुणतांबे गावाजवळ वेदपाठशाळा काढली. नंतर ती त्यांचे चिरंजीव रामशास्त्री यांनी पुढे चालविली. वाईकर नागेश्वरभट्ट वासुदेव यांनी दशग्रंथांचा अभ्यास करून इ.स. १८२० च्या सुमारास वेदपाठशाळा काढून अनेक नामांकित दशग्रंथी विद्वान तयार केले. जीवनशास्त्री यांचे चिरंजीव विष्णुशास्त्री यांनी त्याच सुमारास नाशिक येथील ब्रह्मवृंदासमोर समग्र ऋग्वेद मुखोद्गत म्हणून मोठी वाहवा मिळविल्याची नोंद आहे. भिक्षुकीकडे फारसे लक्ष न देता वेदवेदांगाच्या अध्ययनात व अध्यापनात त्या काळातील आपले पूर्वज रमलेले, व शेतीला पूरक व्यवसाय करीत असत असे अशा अनेक नोंदीवरून दिसते. ही परंपरा पुढे इंग्रजी अमदानीतही चालू असल्याची उदाहरणे आहेत. अशा विद्वानांना त्याकाळी शास्त्री किंवा भट्ट या नावाने संबोधले जाई. शास्त्री व उपाध्याय या दोहोंतील फरक लक्षात आणल्यास भिक्षुकीचा व्यवसाय संबंधित काळातील आपले पूर्वज फारसे करीत नसावेत. इ.स. १७०० पूर्व ते १७५० या कालखंडात पुरुषांचा पेहराव म्हणजे गुढग्यापर्यंत एक पंचावजा धोतर व तसेच खांद्यावर उपरणे. पायात जाड तळाच्या चामड्याच्या व चामड्यानेच शिवलेल्या वाहाणा असत. त्या जास्ती करून पावसाळ्यात वापरीत. मुंजी ५ ते ८ वर्षांपर्यंत तर विवाह १३ ते १७ वयापर्यंत होत असल्याचे दिसते. शिवोपासनेवर भर असून रोजच्या रोज मातीचे शिवलिंग बनवून पूजा करून विसर्जन करीत. जेवणात मुख्य अन्न म्हणजे उन्हाळी पिकाचा (वायंगणी) तांदूळ व डोंगर उतरणीवर एक वर्षाआड पिकविली जाणारी वरी, नाचणी. तोंडली, पडवळ, बांबूचे कोवळे कोंब, सुरण, गोराडू इत्यादी भाज्या व पावटा, वाल, कुळीथ अशी कडधान्ये. सणासुदीला तांदळाचेच गोड पदार्थ प्रचारात असावेत. त्याचा परंपरागत अनुभव आजही उकडीचे मोदक, घावन-घाटले, सांदणे, इत्यादी प्रकारात आपण घेतो. भाताच्या गवतावर जगणारी गुरेढोरे दुधाच्या दृष्टीने फारशी अनुकूल नसावीत. मागल्या भातावर दहीताकापेक्षा अमसुलाची कढी जास्त करून वापरात असे. कोतवडे गाव वसवून खोती मिळाल्याने आर्थिक परिस्थिती कदाचित इतरांपेक्षा बरी असावी. स्त्रियांचा पोषाख म्हणजे नऊवारी लुगडे, नऊ तुकड्यांची शिवलेली दोन्ही टोकाची गाठ मारून घातलेली कोपरापर्यंत लांब बाह्यांची चोळी, घट्ट आवळून बांधलेली व मूद-अग्रफूल असलेली खोपा-वेणी व वाखाच्या दोरीत ओवलेले मणी-मंगळसूत्र असे साधारणपणे वापरात असलेले दागिने त्या घालीत. नाकातील नथीला महत्त्व असे. काहीवेळा नथ नसेल तर नाक टोचलेल्या जागी कुंकू लावीत.
    धर्म कल्पनांचा पगडा एकंदरीत खूपच होता. शिवाशिव, उष्टे- खरकटे हे विषय रोजच्या व्यवहारात काटेकोरपणे पाळीत, चुरमुरा जरी जमिनीवर पडला तरी शेण लावून टिपून घेत. पूजेच्या वेळी सोवळे नेसताना पुरुष व स्त्रियासुद्धा मध्ये धाबळी लावून घेऊन मग सोवळे नेसत. एकत्र कुटुंब पद्धती होती. घरातील सर्वात वडील माणसाच्या आज्ञेत सर्व व्यवहार करीत. वाई घराण्यात नागेश्वरभट्ट, महादेवभट्ट, जीवनभट्ट व नीळकंठभट्ट या भावांचे एकत्र कुटुंब ४०/५० माणसांचे होते. १७५० च्या सुमारास पिंपळखरे – सहस्रबुद्धे यांचे हरदा गावाजवळील मनीयाखेडी येथील असे एकत्र कुटुंबही ४०/५० जणांचे एकत्र नांदत असल्याची नोंद आहे.
    मुलांचे विवाह १३ ते १६ वर्षापर्यंत व मुलींचे ८ ते १२ वर्षापर्यंतच्या वयात होत. संसाराला सुरुवात मुलांची १८/ २० व मुलींची १५ ते १७ वयात होई. सर्वसाधारणपणे विवाह दोघांचे आई-बाप ठरवीत. विवाहापूर्वी मुलाने मुलगी पाहणे प्रकार नसावा. पुष्कळवेळा केवळ मध्यस्थाच्या सांगण्यावरूनही विवाह परस्पर ठरवीत. मध्यस्थाचा चांगुलपणा पूर्वीच्या अनुभवावरून ठरे. हिंदी सिनेमांत सध्या दिसणारा लग्नाच्या दिवशीचा सुहागरातीचा सोहळा त्या काळात अर्थातच नसे. प्रत्येक कृती एक धार्मिक संस्कार या स्वरूपात मानली जाई व लग्नानंतर ४/६ वर्षांनी, ‘गर्भाधान’ म्हणून हवनादी संस्कारांनी युक्त अशा विधीने संसाराची खऱ्या अर्थाने सुरुवात होई. स्त्री-पुरुष एकत्र बसून काही विचारविनिमय करीत नसत. घरात वडील मंडळींच्या समोर असे करणे शिष्ट संमत नव्हते. पत्नी आपल्या पतीला ‘स्वत:’ किंवा ‘इकडून’ अशा शब्दाने संबोधित असे. पतीनिधनानंतर किती प्रमाणात बायका सती जात याची नक्की माहिती उपलब्ध नाही, परंतु आपल्याच वाई घराण्यातील नागेश्वर भट्ट यांच्या पत्नी १८१५ साली सती गेल्या अशी नोंद आहे. तसेच धामेळ कुट-१ घराण्यातील रामचंद्र रघुनाथ यांच्या पत्नी १८१६ साली त्यांचेबरोबर हरिपूर मुक्कामी सती गेल्या. आजही सतीचे मंदिर तेथे आहे. अशा काही उदाहरणांची नोंद केली आहे. मागे राहणाऱ्या स्त्रियांत वपन न करणाऱ्या ‘सकेशा’ व करणाऱ्या त्या ‘सोवळ्या’ असा भेद झाला. सकेशा विधवा जवळजवळ अस्पृश्य मानल्या जात. कोणत्याही मंगलप्रसंगी त्यांनी पुढे व्हावयाचे नाही. स्वयंपाक करावयाचा नाही. पलंग-गादीवर झोपावयाचे नाही. रात्री जेवावयाचे नाही. अशी कितीतरी बंधने त्यांच्यावर असत. सोवळी झालेल्या स्त्रीस मात्र सोवळ्यात स्वयंपाक वगैरे करण्यास परवानगी असे. एकत्र कुटुंबात विधवा अवस्थेत सासरी किंवा माहेरी एक प्रकारच्या दुय्यम स्थानात त्यांना राहावे लागे. याचे उलट परिस्थिती काही घरांतून नोंदविली आहे. घरी आलेली आत्या/मावशी घरातील सर्व कुटुंबाची, त्यांच्या सुखसोयीची जबाबदारी उत्तम पार पाडीत व जणू त्या घरातील सर्वेसर्वा असा मान मिळवून राहात. पुनर्विवाहाचा विचार त्या काळात नव्हताच. सगोत्र विवाहसुद्धा निषिद्ध होता. अगदी अलीकडे म्हणजे इ.स. १९०० साली वाईच्या बाळकृष्ण नारायण यांनी सगोत्र विवाह केला. म्हणून कुटुंबातील सर्वांनी त्यांना वाळीत टाकले व एकत्र कुटुंबपद्धती त्या घरात जणू भंग पावली. ही परिस्थिती १९४० मध्येसुद्धा घडली. श्री. दिगंबर हरि यांनी सगोत्र विवाह केला. तेव्हा घरातील कोणीही त्या समारंभास हजर नव्हते. इंग्रजी पद्धतीच्या स्पेशल मॅरेज अॅक्टअन्वये हा विवाह रजिस्टर करावा लागला. त्यामानाने आधुनिक काळापूर्वी मुलगी कोणास तरी दत्तक देऊन मग विवाह करावा असा पर्याय विचारार्थ आला, परंतु मुलगी दत्तक घेता येत नसल्याचे धर्मबंधनामुळे तो विचार प्रत्यक्षात आला नाही. धर्मश्रद्धा इतक्या कडक होत्या हे या सर्वांचे पुरावे म्हणावे लागतील.

    इ.स. १७६१ ते १८७५:

    राजकारणातील महत्त्वाची स्थित्यंतरे लक्षात घेऊन परिवर्तनाच्या मागोव्यासाठी आपण वरील काळातील विचार करण्याचे ठरविले. परंतु सहस्रबुद्धे घराण्याच्या अभ्युदयाची सुरुवात १७५० च्या सुमारास पेशवाईस स्थिरता येण्याच्या काळास धरून असलेली दिसते. बाळाजी विश्वनाथ व भानू ही कुटुंबे जिवाच्या भीतीने प्रथम घाट चढून देशावर आली व आपल्या कर्तबगारीने मोठ्या पदास चढली. त्यावेळी पुण्यास पेशवाईचा अम्मल सुरू झालेला होता. कोणत्याही राज्यकर्त्यास कारभार चालविण्यासाठी विश्वासू माणसांची गरज लागते. पोटासाठी अत्यंत कष्ट करूनसुद्धा एक प्रकारचे निकृष्ट जीवन जगण्यापेक्षा आता आपली माणसे अधिकारपदावर आहेत त्यांचा होईल तेवढा फायदा घेऊन, कोकणात राहण्यापेक्षा देशावर जाऊन आपले नशीब काढावे, अशी लाट आपल्या घराण्यातील सहाही वाड्यांतील त्या काळच्या तरुणात निर्माण झाली असावी. कोतवड्याच्या सहा वाड्यांतून घराबाहेर पडलेल्या कुटुंबांची नोंद संभाव्य स्थानांतरांचे विहंगम दृश्य या तक्त्यात संक्षेपाने केली आहे. त्यावरून सहज नजर फिरविली तरी आपण आज घराणी – शाखा – उपशाखा म्हणून संबोधितो, अशा जवळजवळ ४०/४५ कुटुंबांनी, १७५० ते १८०० अशा ५० वर्षांच्या अवधीत अनेक जणांनी कोतवडे सोडून घाट चढून देशावर पदार्पण केलेले दिसते.
    अगदी प्रथमच स्थानांतर करणाऱ्यांना सांगलीकरांचा मोठा आधार वाटत असावा. सांगलीकर पटवर्धन संस्थानिक व कोतवड्याचे खोत सहसबखे यांचे संबंध अनुक्रमे उपाध्याय-यजमान असे होते. हा संबंध सांगलीकरांनी अनेक काळ टिकवून धरलेला दिसतो. सांगलीकरांच्या नरगुंद, रामदुर्ग, जमखिंडी, हुबली इत्यादी भागातील सांगलीकरांचे प्रतिनिधी म्हणून कार्यभाग करणारी कितीतरी कुटुंबे सांगली १ – कर्नाटकच्या चार वंशवृक्षात दिसून येतात.
    चित्तपावन सहस्रबुद्धे यांचा स्थायी स्वभाव म्हणजे चिकाटी, कष्टाळूपणा, दीर्घोद्योग इत्यादी. जणू काही उफाळून निघून, त्यांनी चालत आलेल्या संधींचा उत्तम फायदा घेतला. या काळात अनेक सहस्रबुद्धे पेशव्यांशी अगदी जवळीक साधून होते, याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. १७८६ ते १७९६ या काळात आप्पाजीराम सहस्रबुद्धे हे एक राजकारणी व कोपरगावी असणाऱ्या गारद्यांचे अधिकारीपदावर कार्यरत होते. १७६७ मध्ये गणो वामन सहस्रबुद्धे सिंहगडावर दप्तरदार होते. महादेव रघुनाथशास्त्री १७६८ च्या सुमारास पेशवे दरबारात गवई म्हणून आपला मान राखून होते. १७७२ – ७३ मध्ये गोविदंभट्ट सहस्रबुद्धे दरबारात न्यायशास्त्री म्हणून कार्यरत होते, तर त्याच काळात चिमणराव, गंगाधर सदाशिव व बंडोपंत सहस्रबुद्धे मोंगलाशी लढणारे सैनिक होते. आप्पा ऊर्फ रामचंद्र भानुदास राजधानीत कोतवाल असून त्यांना जरीपटक्याचा मान होता. नारायणरावांच्या खुनानंतर रघुनाथ पेशवे यांचेबरोबर तेही नजरकैदेत होते. दुसरा बाजीराव नालायक ठरवून त्याचा भाऊ चिमाजी आप्पा यास गादीवर बसवावे म्हणून जे बंड झाले त्यात बाळाजी विष्णु व हरि विष्णु प्रमुख होते व त्यास अनुक्रमे २५००० रु. दंड व ५० फटक्यांची शिक्षा व कानास चाप लावून कान तोडण्याची शिक्षा झाली होती. १७३४ मध्ये पहिल्या बाजीरावांनी सदाशिव रामचंद्र यास पुण्यास घर बांधून राहण्यासाठी बखळ दिली. पुढे १८०३ मध्ये निजामाला फूस दिल्यामुळे पुण्यात जी जाळपोळ झाली त्यात सहस्रबुद्धे यांचा वाडाही जाळण्यात आला. यावरूनही त्यांचा त्या काळातील प्रभाव लक्षात येतो. १७६१ मध्ये बल्लाळ केशव हे सदाशिवभाऊबरोबर पानिपतावर गेले. पराभव होणार हे दिसताच बरोबर नेलेला खजिना परत पाठविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली. पुराणिक, मुत्सद्दी, राजकारणी, लेखणी बहाद्दर, सैनिक व प्रशासक अशा अनेक प्रांतांत पेशव्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या अनेक सहस्रबुद्धे कुटुंबांमुळे मिरजकर, सांगलीकर इत्यादी सरदारांचीसुद्धा सहस्रबुद्धे कुटुंबांशी पुष्कळच जवळीक झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील.
    एक प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा मिळाल्यानंतर साहाजिकच त्यांच्या वागण्यात, चालचालणुकीत फरक पडला. संरक्षणाच्या दृष्टीने दिल्लीच्या वाटेवरची काही ठिकाणे सहस्रबुद्धे कुटुंबांनी व्यापलेली दिसतात. तापीकाठचे सध्याच्या नाशिक जिल्हयातील बागलाण येथील सहस्रबुद्धे यांचे वाडे, जळगावजवळच्या भडगाव येथील किल्ला व वाडे, नर्मदेच्या दक्षिण तीरावरची हरदा व मनीय खेडी येथील सहस्रबुद्धे घराणी, नर्मदा ओलांडल्यावर देवास, इंदूर, बऱ्हाणपूर, ग्वाल्हेर, येथील घराणी, या परिस्थितीची साक्षीदार आहेत.
    या सर्व कार्यातून एक प्रकारचा उत्कर्ष साधून सामाजिक प्रतिष्ठा मिळाल्यामुळे सामाजिक/सांस्कृतिक परिवर्तनाचे नमुनेही पाहावयास मिळतात. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगले असल्यामुळे पोषाखातही फरक पडला. बाराबंदी, अंगरखा, रेशमीकाठी, धोतरे-उपरणी, पायात चढाव जोडा आला. समारंभप्रसंगी पायघोळ अंगरखा, चुडीदार, तुमान शेला आणि रंगीबेरंगी पागोटी आली. पागोट्यावर शिरपेच आले. कोकणातील घरे सुधारू लागली. जांभ्या दगडाचे रुंद रुंद भक्कम चौथरे घरासाठी बांधले जाऊ लागले, नक्षीदार लाकूडकाम काही ठिकाणी दिसू लागले. दिवाणखाने तयार होऊ लागले. पूर्वीच्या मानाने खूपच अशी सुधारलेली घरे दिसू लागली. पुरुषांच्या कानात मोत्यांच्या उंची रत्नाच्या भिकबाळ्या दिसू लागल्या. स्त्रियांच्या पोशाखातही बरेच फरक दिसू लागले. नऊवारी लुगडी, व जरीची व अनेक तऱ्हेच्या वीण, कलाकुसरीची वापरात आली. उत्सवातून पैठण्या दिसू लागल्या. जरीकाठी खणांच्या चोळ्या, पायात पूर्वीच्या मानानी चांगल्या दिसणाऱ्या चामड्याच्या चपला आल्या. कानात कर्णफुले, लवंगा, गळ्यात मोत्याचा कंठा, अंगठ्या, सलकडी, कंठा,बुगड्या, केतकी, चंद्रकोर, केवडा, ठुशी, पुतळ्यांची माळ, सरी, लप्फा, गोठतोडे, पाटल्या, बांगड्या, इत्यादी दागिने आपापल्या ऐपतीनुसार दिसू लागले. दागिने वापरण्याची प्रवृत्ती व त्यातून व्यक्तीचे समाजातील स्थान समजण्याची एक नवीन दृष्टी रुढ होऊ लागली.
    एकत्र कुटुंबपद्धती मात्र पूर्वीप्रमाणेच चालू राहिली. काही कारणाने वाटण्या करावयाच्या झाल्यास गावच्या पंचायतीच्या सल्ल्याने त्या करीत. त्या वेळच्या अशा कागदपत्रांतही वेगळे होण्याची भाषा धर्म समजुतीवर अवलंबून होती. अमुक दिवसापासून ”आपले वैश्वदेव वेगळे होतील’ या भाषेत वेगळे होण्याचे निर्णय नोंदविले जात.
    देशावर स्थायिक झाल्यामुळे खाण्यापिण्यातही फरक दिसून आला. अमसुलाची कढी-भात, वरी-नाचणी याऐवजी गहू, बौजरी, ज्वारी, वासाचा तांदूळ बऱ्याच प्रमाणात वापरात येऊ लागला. पेशव्यांच्या अगदी जवळ संपर्कात असणाऱ्यांकडे सणासुदीला पुरणपोळी, घीवर, मांडे, बासुंदी अशा खाण्यापिण्याच्या अनेक नव्या पदार्थांची भर पडली.
    उद्योगासंबंधीची परिवर्तने पाहिली तर कोकणात मागे राहिलेले लोक सोडले तर देशावर शेतीचा व्यवसाय केवळ नाममात्र राहिला. खोती, सावकारी हे धंदे त्यामानाने जास्त प्रमाणात चालू लागले. इनाम मिळविणे व त्यासाठी हरएक प्रकारे कष्ट घेणे, ही दैनंदिन स्पर्धेची एक बाब रुढ होऊ लागली. पेशव्यांकडून किंवा त्यांच्या सरदारांकडून अनेक सहस्रबुद्धे कुटुंबांनी इनाम जमिनी मिळविल्या. गावाच्या देवळात पूजा-नैवेद्य, सांजवात यासाठीसुद्धा इनामे मिळालेली दिसतात. भाजे, पिंपळवंडी, वाई, उगार, भोर, मोडनिंब, करकंब अशा पुष्कळ घराण्यांची उदाहरणे या परिस्थितीची देता येतील. मूळच्या दीर्घोद्योगी व धडाडीच्या स्वभावाला मोठे क्षेत्र मिळाल्याने एक आत्मविश्वास निर्माण झाला, परंतु काहीशा मत्सरी व तापट स्वभावात फारसा फरक झाला नाही.
    धर्म समजुतीत फारसा फरक पडला नाही. परिस्थितीअनुरूप काशी, गया, प्रयाग, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, गणपतीपुळे, परशुराम या देवतांची दर्शन घेणे, वाहतुकीच्या काहीशा सुधारलेल्या परिस्थितीमुळे, त्यामानाने सुकर झाले. अशा तीत्रक्षेत्रांतील क्षेत्रोपाध्यांच्या नोंदीत या काळातील उतारे पूर्वीपेक्षा जास्त दिसू लागले.
    स्वत:चे जबाबदारीवर किंवा पेशव्यांचे मन वळवून कित्येक नवीन देवालये सहस्रबुद्धे कुटुंबीयांनी यावेळी बांधली. कोतवड्याच्या धामेळ वाडीतील धामेळश्वराचे मंदिर, बुरंवाड येथील आमणेश्वराचे मंदिर, नाशिकजवळील भगूर येथील लक्ष्मीनारायण मंदिर, श्रीपूर येथील पाण्याचा तलाव, साक्रीजवळच्या नागाव येथे देवीचे मंदिर, सटाण्याजवळचे दुधेश्वराचे मंदिर, वाईचे नागेश्वर गणपती मंदिर, अशी अनेक देवालये आर्थिक सुधारणाबरोबर सहस्रबुद्धे कुटुंबीयांनी निर्माण केली.
    सोवळे/ओवळे, देवभोळेपणा, भुताखेतांवरील विश्वास कायम राहिले. शनिवारवाड्यातील नारायणराव पेशव्यांचे भूत गाडण्यासाठी विष्णुपंत सहस्रबुद्धे यांना पेशव्यांनी विनंती केली. पुढे त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला. स्त्रियांच्या बाबतीत काही फरक दिसला नाही. स्त्री शिक्षणाची व्यवस्था नव्हती. तरी त्यांचे पाठांतर खूप असे. वटसावित्री आख्यान, व्यंकटेश स्तोत्र, कहाण्या सांगणे, रामरक्षा, रुक्मिणी स्वयंवर, आरत्या, आदी बहुतकरून स्त्रियांच्या पाठांतरात होत्या, परंतु देववाणी व वेद यांच्या अभ्यासास प्रतिबंध होता. नवीन लग्न झाल्यावर शिवामूठ वाहणे, चैत्रांगण महिनाभर काढणे, आषाढ, अधिक मासात कोकिळाव्रत करणे अशी अनेक व्रते पूर्वापार पद्धतीप्रमाणे त्या करीत. विटाळ-चांडाळाच्या कल्पना फार कडक होत्या. महिन्यातून चार दिवस स्त्रिया अस्पृश्य होत. अंथरुण-पांघरुण घेऊन चार दिवस घराच्या एखाद्या कोपऱ्यात काढावे लागत. वडील माणसे पूजा करीत असतील अगर जेवत असतील त्यावेळी त्यांच्या कानावर अशा स्त्रीचा आवाजसुद्धा जाता कामा नये, अशी प्रथा होती. मंत्रतंत्रावर फार विश्वास होता. विंचूदंश, सर्पदंश, कावीळ, आगपेण, इत्यादींवर मंत्र घालण्याची प्रथा असे.
    नित्युंदन गोत्री वैशंपायन सहस्रबुद्धे सदाशिव विष्णु रा. दाभोळ देवीचे उपासक, उत्तम मांत्रिक होते. भूतबाधा काढणे, सर्पदंशावर उपचार करणे इ. अनेक मंत्र, ३०/४० वर्षाच्या तपश्चर्येने त्यांनी सिद्ध केले होते. इ.स. १९०० च्या सुमारास हे सर्पदंशावरचे प्रसिद्ध मांत्रिक होते. त्यांचे चिरंजीव हे काम काही वर्षे करीत. परंतु मांत्रिकाला अत्यंत कडक नियमाने राहावे लागते ते न जमल्यामुळे मंत्र घालणे त्यांनी सोडून दिल्याचे नोंदविले आहे. वाईच्या जीवनशास्त्री सहस्रबुद्धे यांच्यावर शनिवारवाड्यातील नारायणरावांचे भूत गाडण्याची कामगिरी पेशव्यांनी सोपविली होती. धोंडशास्त्री कोतवाल यांचा हठयोगाचा मोठा अभ्यास होता. पाटावर बसून ते पाटासकट वर उचलले जात व अधांतरी राहात, असे त्यांच्या नातेवाइकांनी नोंदविले आहे.
    १७६१ च्या पानिपतच्या पराभवानंतर थोरल्या माधवरावांची लहानशी कारकीर्द वगळली तर पेशवाईला उतरती कळा लागू लागली होती. परिणामतः पेशव्यांच्या जवळ गेलेल्या तथाकथित उच्च पदस्थांची अवस्था काहीशी कठीण होऊ लागली. सर्वसामान्यांचा राजकीय आसरा कमी होऊ लागला.
    दशग्रंथी वैदिक हळूहळू भिक्षुकी करू लागले. कृष्णशास्त्री, वासुदेवशास्त्री तुळशीबागेत जनसमुदायासमोर पुराण सांगू लागले. चातुर्मासात पुण्याचे बाहेर जाऊनही पुराण सांगू लागले. सूत काढून जानवी तयार करून विकू लागले, वैद्यकीचा अभ्यास करून वैद्यकीचा व्यवसाय करू लागले. वाईचे रघुनाथशास्त्री सुधाकरशास्त्री त्याकाळी एक निष्णात वैद्य नाडीपरीक्षा करून औषधोपचार करीत असत. त्यांचे चिरंजीव आप्पाशास्त्रीही हाच व्यवसाय करू लागले. १८२६ साली दशग्रंथी नागेश्वरभट्ट वासुदेवभट्ट यांनी वेदपाठशाला सोडून मराठी शिक्षणाची शाळा काढली. तर १९४५ साली रामशास्त्री त्रिंबक यांनी शिक्षकाचा व्यवसाय सोडून बागायतीचा व्यवसाय सुरू केला. जीवनशास्त्र्यांचे चिरंजीव विष्णुपंत यांनी कोल्हापूर येथे व्यायामशाळा सुरू केली. ते विष्णुभट्टांचे विष्णुपंत झाले. राजाश्रयाची मदत पुरेशी होईना तेव्हा नानात-हेचे उद्योग सहस्रबुद्धे कुटुंबे करू लागली.
    शास्त्री, पंडित, राजकारण धुरंधर, अशा मोठ्या स्थानात पोहोचलेल्यांची ही स्थिती झाली. १८५० च्या सुमारस इंग्रजी शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या. वेदाध्ययनाची परंपरा जवळजवळ संपुष्टात आली. सर्वसाधारण कुटुंबे कोठे मराठी शाळा काढ, किराणा मालाचे दुकान काढ, अशा अनेक उद्योगांस लागली. शिंपीकाम करणे, जमले तर पिठाची चक्की काढणे, असे उद्योग सुरू झाले. एकूण पेशवाईचा शेवटचा काळ सहस्रबुद्धे घराण्याला किंबहुना चित्तपावन समाजास विपत्तीचा गेला. अशा काहीशा कठीण काळातही धर्मकल्पना बदललेल्या नव्हत्या. ब्राह्मणांना अन्नदान हे महान पुण्यकारक समजले जाई. इंग्रजी अमलाच्या सुरुवातीस वाईचे वासुदेवपंत पुण्यास येऊन वकिली सुरू करून होते. पाचशे रुपये जमले की सहस्रब्राह्मण भोजन घालीत. ८/१० वर्षांच्या काळात १८२८ साली, तिसरे सहस्रभोजन घालणे ही कल्पना आता करताच येणार नाही. यासंबंधात त्या वेळच्या वस्तूंच्या किमती मोठ्या मजेशीर वाटतात. यासंबंधीची थोडी कल्पना येण्यासाठी त्याकाळी लिहिलेले वस्तूंचे बाजारभाव पाहाणे मोठे गमतीशीर वाटावे. साधारण एक रूपयास सहा पायली (२४ शेर) तांदुळ, सहा पायली ज्वारी, पाच पायली गहू, साडेतीन शेर पक्के तूप, चाळीस शेर दूध, नऊशेर तेल, नऊमण लाकडे, एक पैशास पन्नास मुळे, दोडके, इत्यादी.

    इ.स. १८७५ ते १९५०:

    मागल्या कालखंडाच्या शेवटी शेवटी काळ विपत्तीचा गेला असावा. इंग्रजी राज्याला स्थैर्य आल्यानंतरचा काळ परत समृद्धीकडे नेणारा ठरला. साहित्यसम्राट कै. न. चिं. केळकर यांनी चित्तपावन समाजास ‘फिनिक्स’ नावाच्या पक्षाची उपमा दिली आहे. त्याची आठवण प्रस्तुत काळाचा विचार करताना मनात येते. ते म्हणतात, ‘हा पक्षी चितेपासून उत्पन्न होतो. अशी पौराणिक दंतकथा ग्रीक वाङ्मयात आहे. तो प्राय: एकलकोंडा असतो. तो इच्छामरणी असतो. एका स्थितीचा त्यास कंटाळा आला की तो आपला देह जाळून घेतो व आपल्याच चितेपासून परत सतेज, व देदीप्यमान असा बाहेर पडतो. वरील गोष्टींपैकी कितीतरी गोष्टी/लक्षणे चित्तपावनांना लागू पडतात. सहस्रबुद्धे कुटुंबीयांतील सर्वोत्कृष्ट गुण या कालखंडात परत उफाळून आलेले दिसतात. विज्ञान, साहित्य, समाजजागृती – सेवा, देशभक्ती, सामाजिक – सांस्कृतिक- धार्मिक जागृती, कीडा, असे एकही क्षेत्र नाही की त्यात सहस्रबुद्धे कुटुंबीयांचा अभिमानास्पद सहभाग नाही. अशा सर्वांची यादी करावयाची याली तर प्रस्तुत प्रकरणाची व्याप्ती फारच वाढेल. उदाहरणादाखल काही उपलब्धी खाली देत आहोत.
    पदव्युत्तर वैज्ञानिक अभ्यासक्रमात तर कितीतरी नावे देता येतील. १९३७ साली कै. डॉ. दत्तात्रय लक्ष्मण हे कृषी विभागातील पहिले डी. एस्सी. झाले व या विषयाच्या क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांच्या पीएच.डी. पदवीचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. व्हेटर्नरी सायन्सेसमध्ये केशव यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएच.डी. मिळविली व ते सध्या जबलपूर येथील कॉलेजात प्राचार्य आहेत. कै. नागेश शिवराम हे १९२६ साली एम. एस. या परीक्षेत प्रिन्स ऑफ वेल्स गोल्ड मेडलचे मानकरी झाले. ते पहिले सहस्रबुद्धे एम. एस. होते व नागपूर मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून सेवानिवृत्त झाले. श्री. रामचंद्र हरि यांची कन्या ही एम. एस. होणारी पहिली स्त्री समजावी लागेल.
    सहस्रबुद्धे घराण्यात पीएच.डी. पदवी घेणाऱ्या अनेक भगिनी आहेत. डॉ. सरोज श्रीराम यांनी मँचेस्टर विद्यापीठाची एम.एस्सी, पीएच.डी. १९६० मध्ये मिळविली. खेळकूद-क्रीडा विभागातही अभिमानास्पद कामगिरी आपल्या अनेक बंधु-भगिनींनी केली. खो-खो, बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम इत्यादी खेळांत आंतरराज्य चमूत उत्तम खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या कित्येक भगिनीसुद्धा नाव कमावून गेल्या. त्यापैकी काहींचा नामनिर्देश करावयाचा झाल्यास सौ. मंजूषा सुधीर (बॅडमिंटन), सौ. स्वाती वसंत (व्हॉलीबॉल) अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. स्वातंत्र्यलढ्यात तळहातावर शिर घेऊन काम करणारे व त्यानंतर अनेक औद्योगिक उत्थानासाठी सर्व आयुष्य वेचलेले पद्मश्री आण्णासाहेब यांना कोण विसरेल?
    आपापल्या विषयात पीएच.डी. मिळविलेल्या सौ. विद्या राजेंद्र, सौ. सुनीता शरद, श्रीमती नीना शरद यांचा खास उल्लेख करावा लागेल. पीएच.डी. मिळविणाऱ्या पुरुषांची तर मोठी यादी करता येईल. मराठी विषयातील पहिली पीएच.डी. मिळविण्याचा मान डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्याकडे जातो. डॉ. य. शि. सहस्रबुद्धे १९६४ मध्ये केवळ स्वत:च्या मार्गदर्शनाने केलेल्या संशोधनावर भूस्तर शास्त्रातील पीएच. डी. झाले. डॉ. अरविंद भालचंद्र, डॉ.सुहास दत्तात्रय यांनी पीएचडीनंतर पोस्ट डॉक्टरेट रीसर्चसाठी युरोपात वास्तव्य केले. श्री वामन कृष्ण १८८८ साली सिंक्लेअर प्राइजचे मानकरी झाले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साखर उद्योगाच्या टेक्निकल भागाचे श्री. गंगाधर नारायण हे पायोनियर ठरले. त्याकाळी साखर कारखान्यास लागणारी मशिनरी त्यांनी भारतात बनवून घेतली. वयाच्या चाळीशीच्या आतील त्यांची ही कर्तबगारी स्पृहणीय आहे. कॅन्सरवर मूलभूत संशोधनात सिंहाचा वाटा उचलून केमोथेरपीची सुरुवात भारतात प्रथम करून माधव भालचंद्र यांनी मिळविलेली आंतरराष्ट्रीय ख्याती, व भारतातर्फे नोबेल पारितोषिकासाठी जाणाऱ्या शास्त्रज्ञांच्या निवड समितीवर गेली कित्येक वर्षे त्याचे प्रतिनिधित्व, हा सहस्रबुद्धे घराण्याचा मोठा मानबिंदू समजावा लागेल. श्री. दिगंबर हरि यांचे शैक्षणिक क्षेत्रातील नेत्रदीपक कार्य, श्री. चिंतामण गोंविद यांनी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन म्हणून केलेले फार मोठे कार्य, डॉ. अनुराधा हेमंत यांचा बहुभाषांचा अभ्यास, व चाइल्ड हेल्थ प्रोग्रॅम, कम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी त्यांनी केलेले अशी अनेक उदाहरणे आहेत.
    भारताच्या संरक्षणासाठी उत्तम कार्य करून उच्चपदावर चढलेले सहस्रबुद्धे काही कमी नाहीत. १९२६ मध्ये डॉ. ना. शि. सहस्रबुद्धे एम. एस., हे आय. एम. एस.मध्ये जाणारे पहिले कमिशन्ड ऑफिसर होते. दुसऱ्या महायुद्धात १९४० ते १९४४ बसरा येथील फील्ड ड्युटीवर कार्यरत होते. प्रत्यक्ष रणक्षेत्राच्या व्यतिरिक्त राष्ट्रपतींचे मानद ए.डी.सी. म्हणून सन्मानित झालेले ले. ज. य. द. सहस्रबुद्धे, नायजेरियाच्या डिफेन्स अॅकॅडमीत मार्गदर्शक राहिलेले कर्नल रामचंद्र परशुराम, ले. क. बी. डब्ल्यू. सहस्रबुद्धे, वायव्य व ईशान्य अशा दोन्हीही आघाडीवर कार्यरत असलेले ले. क. पी. आर. सरंजामे (सहस्रबुद्धे), संरक्षणाच्या दृष्टीने सरहद्दीच्या रस्त्यासाठी योगदान करणारे ले. क. महाजन, विंगकमांडर, पी. व्ही. सहस्रबुद्धे, वायुदलात ग्रुपकॅप्टन श्री. रत्नाकर रणछोड व त्यांचे चिरंजीव शेखर रत्नाकर, पायलट ऑफिसर, आय. ए. एफ. हे पितापुत्र कार्यरत आहेत. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. एकंदरीत १७७५ ते १९५० हा कार्यकाळ सहस्रबुद्धे कुटुंबीयांना सर्व क्षेत्रांत सर्वकष कामगिरीचा साक्षीदार राहावा.
    सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनात अर्थातच बराच फरक पुढल्या २५/३० वर्षांत झालेला दिसतो. त्या कालखंडातील पहिली पन्नास वर्षे पुरुषांच्या वेशभूषेत फार फरक झाला नाही. पण पुढील २५/३० वर्षांत धोतर, पार्शी फॅशनचा लांब कोट, उपरणे, पायात चपला, डोक्यास हलकेसे पागोटे, फेटा असे. शास्त्रीपुराणिक डोक्यावर पगडी वापरीत. त्यानंतर धोतर, अखूड कोट व काळी किंवा तपकीरी रंगाची टोपी आली, तर १९५० नंतर पॅन्ट, शर्ट, क्वचितप्रसंगी सबंध सूट, टाय दिसू लागले. फेटा-टोपी जवळजवळ दिसेनाशी झाली. गांधी युगात खेडेगावातून विशेषत: पांढरी खादीची गांधी टोपी व आखूडसा नेहरू शर्ट व धोतर दिसू लागली. स्त्रियांच्या वेशभूषेत जास्तीकरून नऊवारी साडी सर्वदूर कायम राहिली. घट्ट खोपा जाऊन ना. सी. फडक्यांनी रंगविलेल्या कादंबऱ्यांच्या नायिकात दिसणारा, मानेवर रुळणारा सैलसा अंबाडा, व पुढे पुढे तर पोक्त स्त्रियासुद्धा शेपटा घालू लागल्या. जास्तीकरून आईवडिलांनी जुळविलेले विवाह झाले. हळूहळू मुला-मुलींची संमती घेणे जरूर वाटू लागले. ४ / ६ दिवसांचा लग्नसोहळा मागे पडून एक-दोन दिवसाचा सोहळा होऊ लागला. धार्मिक बाबतीत वागण्यात फारसा फरक प्रथम झाला नाही. स्त्रीशिक्षणात विटाळ-चांडाळ आड आला. मुलगी वयात आली की विटाळाच्या भीतीने शाळेत जाणे बंद होई. घरी मास्तर ठेवून इंग्रजीसकट काही शिक्षण देणे होत असे. लांब बाह्यांच्या चोळ्या जाऊन पोलकी आली. भारतरत्न आण्णासाहेब कर्वे इत्यादींच्या अथक प्रयत्नाने या विषयात बऱ्यास सुधारणा दिसू लागल्या. शिक्षिका, नर्स अशा व्यवसायात स्त्रिया, विशेषत: विधवा स्त्रिया, स्वावलंबी होऊ लागण्याची लक्षणे दिसू लागली. १९२५ / ३० नंतर या परिस्थितीत खूप फरक दिसू लागला. स्त्रियांच्या स्वतंत्र शाळा मॅट्रिकपर्यंत भरू लागल्या. १९२५/३० च्या सुमारास काही स्त्रिया पदवीधर झाल्या. पुराण प्रवचनाऐवजी नारदीय कीर्तनाचा प्रसार लोकमान्य झाला. १९२० नंतर गांधींच्या उदयानंतर खादी, ग्रामोद्योग, सत्याग्रह, परदेशी सामान न वापरण्याचा निश्चय, चहा-कॉफी पिऊ नये, मॉरिशसमधून येणारी साखर खाऊ नये, विदेशी कापडांची होळी करावी, अशा सामाजिक चळवळींना जोर चढला.

    इ. स. १९५० चे पुढे:

    स्वातंत्र्याची पहाट होताच कृषी व औद्योगिककरण्याची लाट देशात पसरली. नव्या उत्साहाने चित्तपावन कुटुंबीय कामास लागले. त्यात सहस्रबुद्धे कुटुंबे कोठेही मागे पडली नाहीत. घाऊक व्यापार व जड उद्योगाची मालकी जरी त्यांना मिळविता आली नाही, तरी शिक्षण, राजकारण, वैद्यकीय व्यवसाय, वकिली, चाटर्ड अकौंटंट्स, बांधकामाचे व्यवसायिक, इत्यादी नोकरी व उद्योगात अनेक कुटुंबे पुढे आली. शास्त्रीय, यांत्रिक व तांत्रिक शिक्षणात अनेकजण अग्रेसर झाले. परदेशी जाणारांची संख्या वाढू लागली व कित्येक सहस्रबुद्धे परदेशात स्थायिक होऊ लागले. कित्येकांनी तर तिकडेच विवाह करून ते त्या जीवनाशी एकरूप झाले. स्त्रियांनी अनेकविध नोकऱ्यांत प्रवेश केला व चूल आणि मूल यासंबंधीच्या कल्पनांत पुष्कळ फरक झाला. सर्व उद्योगात स्त्रिया पुरुषांबरोबर काम करू लागल्या.
    औद्योगिकरणाचा परिणाम महागाईत झाला. मोठ्या शहरांत राहणाऱ्यांना जागा, वाहने, इत्यादी वस्तूंच्या किमती वाढल्याने, दोघांनाही कष्ट करून त्या मिळवाव्या लागल्या. जीवन धावपळीचे झाले. जुने वाडे जाऊन एकत्र कुटुंब पद्धती जवळजवळ संपुष्टात आली.
    या टप्प्यातील सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनाचा आढावा घ्यावयाचा झाल्यास प्रत्येक घरात दैनंदिन व्यवहारातही फरक दिसू लागला. टेबल, खुर्ची, शाळेत बाके व इतर सामान दिसू लागले. मूळची चित्तपावनी टापटीपीची व स्वच्छतेची पद्धत, नव्या उपकरणांनी एक तऱ्हेचा रेखीवपणा देऊन गेली. पुरुषवर्ग दागदागिने वापरीनासा झाला. स्त्रियांच्या दागिन्यांच्या प्रकारातही सोन्याव्यतिरिक्त कल्चर्ड मोती वापरण्याकडे प्रवृत्ती दिसून आली. स्त्रियांच्या कपड्यात फरक झाला. चोळीऐवजी पोलकी, ब्लॉऊज, पाचवारी विकच्छ साड्या नेसणे रुढ झाले. घट्ट खोपा, आंबाडा जाऊन शेपटा ही केशभूषा पोक्त स्त्रियाही करू लागल्या. सहशिक्षणाच्या प्रसारामुळे स्त्री-पुरुष समानतेचे विचार मूळ धरू लागले. वाईच्या सुधा श्याम यांनी १९६५ च्या भारत-पाक युद्धात आघाडीवर राहून, वैद्यक कोअर युनिटमध्ये ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून काम केले. गेल्या १०/१५ वर्षांत स्त्रियांच्यात बॉबकट करण्याची प्रथा सुरू झाली. खाण्या-पिण्यातही व इतर सवयीतही फरक जाणवू लागला. ताक-भाताऐवजी गहू-ज्वारी व काही ठिकाणी अभक्ष भक्षण व अपेयपान होऊ लागले. वकिली व शिक्षक व्यवसायाव्यतिरिक्त शिक्षण झालेल्यांनी नवीन व्यवसायास सुरुवात केली व हॉटेले, शिवणकाम, किरकोळ कापडाची दुकाने इत्यादी धंद्यांचा प्रसार झाला. तरी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रेल्वे, पोस्ट, मिलिटरी अकौंट्स इत्यादी शासकीय नोकरीत अनेक कुटुंबे रमली.
    दोन जागतिक युद्धांमुळे समाजजीवनावरपुष्कळ परिणाम दिसून आला. विशेषत: दुसऱ्या महायुद्धात रेशनिंग सुरू झाल्यापासून खाण्याच्या पदार्थात आमूलाग्र फरक जाणवू लागला. रेशनिंगमध्ये मिळणारे उकडे तांदूळ, मैदा इत्यादी नापसंत असलेल्या धान्यप्रकारामुळे पाव, बिस्किटे, इडल्या इत्यादी, बेकरीत बनणाऱ्या वस्तू रोजच्या आहारात स्थान मिळवून बसल्या. शहरातील वस्त्या वाढल्याने अंतरे वाढली. स्त्री-पुरुष दोघेही दुचाकी स्कूटरसारखी वाहने वापरू लागली. जीवन अतिगतिमान झाल्याने मन:शांती कमी होऊ लागल्याची जाणीव होऊ लागल्यामुळे देव-देवतांची पूजाअर्चा इत्यादी गोष्टीत आपले कुटुंबीय मन रमवू लागले आहेत. कॉलेजात जाणाऱ्या वयोगटातील मुलांना देवळात देवदर्शनास जाण्याची पूर्वी लाज वाटे. आता ती परिस्थिती बदलताना दिसू लागली. मारुती, गणपती, शंकर, देवी इत्यादी देवळांतून तरुणांची संख्या जास्त दिसू लागली आहे. ज्ञानेश्वरी, गीता, गुरुचरित्र, साईचरित्र, अक्कलकोटस्वामी चरित्र, गजानन महाराज चरित्र अशी शार्मिक पुस्तके घरोघरी वाचली जाऊ लागलेली दिसू लागली आहेत. वेदवेदांगाचा अभ्यास स्त्रियासुद्धा करू लागल्या आहेत.
    शहरी वातावरणाचा प्रभाव जास्त पडला. अर्थात सोवळे-ओवळे याबाबतीत, व आहार-विहार याबाबतीत जुनी बंधने हळूहळू नष्ट होऊ लागली. केवळ सगोत्र विरुद्धी असणारा समाज अनेक आंतरजातीच्या, आंतरप्रांतीय, आंतरधर्मीय स्त्री-पुरुषांचे विवाहास पुष्कळ प्रमाणात मान्यता देऊ लागला.
    आतापर्यंत आपण घेतलेल्या आढाव्यात एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली आहे. आपल्या कुटुंबांची थोडीशी समृद्धी शिक्षणामुळे होऊ शकली आहे. परंतु पुढला काळ अशा शिक्षणाच्या दृष्टीने मोठा काळजीचा जावा, अशी लक्षणे आता दिसू लागली आहेत. चालू जमान्यात शिक्षण हा भलामोठा व्यवसाय झाला आहे. उच्च शिक्षण, टीव्ही, फ्रीज, मोटारी अशा वस्तू विकणाऱ्या कंपन्या ज्याप्रमाणे बाजारपेठ आपल्याकडे ओढण्याकरिता धडपडतात, तशा आता शिक्षणाच्या बाजारातल्या खासगी कंपन्या म्हणजेच अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत त्रिखंडातील विद्यापीठे येथे येऊन प्रचंड जाहिरात करू लागल्या आहेत. या बाजारातील ग्राहक बनल्याखेरीज आज आपल्या तरुण पिढीचे ‘करिअर’ व्यर्थ वाटू लागले आहे. साहजिकच सामान्य, हुशार, अतिहुशार आणि कुशाग्र असे सगळेच विद्यार्थी यात सामील व्हावयास धडपडताना दिसतात.
    या बाजारात सामील होणे सोपे नाही. त्यासाठी प्रचंड वणवण करावी लागते. जागतिक स्पर्धेचे आणि परीक्षांचे हे लोण आता तर सामान्य शाळेतही पोहोचले आहे. इतर बाजाराचे जे सूत्र आहे तेच इथेही आहे. म्हणजे यशस्वी होणाऱ्या प्रत्येक एका विद्यार्थ्यांमागे, अपयशी, असंतुष्ट, निराश झालेले असे शेकडोजण येथे होऊ लागले आहेत. शेवटी संधी मर्यादित व खर्च प्रचंड येणाऱ्या पाचपन्नास वर्षांत एकंदरच आर्थिक दृश्य मध्यम स्थितीतील मुलांसमोर व साहाजिकच आपल्याच सहस्रबुद्धे कुटुंबातील हुशार मुलांपुढे हा प्रश्न एक भयंकर समस्या उभी राहण्याची लक्षणे आज तरी दिसू लागली आहेत. नोकरी हा चरितार्थाचा पिढ्यानपिढ्यांचा मार्ग आता हळूहळू बदलण्याची मानसिक तयारी होणे जरूर आहे. तकनिकी विषयांसंबंधात स्वतंत्र उद्योगाची रचना करून, येणाऱ्या काळास तोंड देण्याची सर्वसाधारण मुला-मुलींच्यात वृत्ती निर्माण झाली, तर कॉम्प्युटर जगाच्या वातारणात भरारी मारण्याची क्षमता वाढविण्याच्या खटपटीची आता फार मोठी गरज पुरी होऊ शकेल.
    कोणत्याही सामाजिक बदलाची सुरुवातमध्यमवर्गातून होते. आजचा शहरी मध्यमवर्ग अनेक अंगांनी जीवन समृद्ध करण्याची धडपड करतो आहे. आपल्या कुटुंबीयांत गेल्या ४०/४५ वर्षांत साठ टक्के मुले-मुली पदवीधर झाल्या आहेत. याच्या आधीच्या दोन/तीन पिढ्यांची मनोरचना एक प्रकारची ‘पॅसिव्ह’ होती. आता ही प्रवृत्ती नाहीशी होत आहे. जगात सर्वत्र समाजाचे रूप बदलते आहे. आरोग्य शिक्षण व अद्ययावत औषधी उपचार यामुळे आयुष्यमान वाढले आहे. आता साठी उलटलेली माणसे पूर्वीपेक्षा तरतरीत आहेत, कार्यक्षम आहेत, जीवनात रस घेणारी आहेत. बहुतांशी स्त्रियासुद्धा काहीशा नैराश्यातून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांना नवी नवी आव्हाने स्वीकारावीशी वाटतात. मध्यमवर्गीय स्त्रिया काहीशा असमाधानी असल्याचे सहज बोलण्या-चालण्यात जाणवते. समाजात घरकामाला प्रतिष्ठा नाही अशी त्यांची तक्रार आहे. पूर्णवेळ नोकरी करणारा पुरुष आणि पूर्णवेळ नोकरी करणारी स्त्री या दोघांकडे बघण्याची समाजाची, कुटुंबीयांची आणि त्यांच्या स्वत:ची दृष्टीसुद्धा वेगवेगळी आहे. जीवनाची गुणवत्ता सुधारणे आणि त्यासाठी पैशाचा साध्य म्हणून नव्हे तर साधन म्हणून उपयोग करणे याकडे वैचारिक कल वाढत आहे. सर्वसाधारणपणे असे दिसते की, जवळजवळ २५ टक्के सहस्रबुद्धे स्त्रिया पूर्णवेळ गृहिणी आहेत. प्रजननात लक्षणीय फरक दिसून येत आहे. दोन मुले पुरे अशी विचारसरणी वाढली आहे.
    प्रस्तुत प्रकरणाच्या शेवटी असे म्हणावे लागेल की, १९२२ मध्ये जवळजवळ संजीवनी समाधी घेणारे वाईचे कै. यशवंत भालचंद्रांपासून धामेळ वाड्याचे रावसाहेब कै. प. पू. बाबामहाराज सहस्रबुद्धे, आधुनिक महिपती म्हणून प्रसिद्ध असलेले मोडनिंबचे दासगणू महाराज, यांनी चालविलेली अध्यात्मिक उन्नतीची परंपरा चालविण्यापासून, तो कॅन्सरवर मूलभूत संशोधन करून जगन्मान्य झालेले केमोथेरपीचे भारतातील जनक समजले जाणारे डॉ. माधव भालचंद्र, पराट्यापासून कागद बनविण्याचा शोध घेणारे, आगपेट्यांचा कारखाना काढणारे, गणपतराव आप्पा, स्वत: ज्योतिष गणितात पारंगत होऊन १९२४ साली वार्षिक पंचांग प्रसिद्ध करणारे वाईचे श्री. विनायक दत्तात्रय, साखरेच्या कारखान्यास लागणारी यंत्रसामग्री भारतातच प्रथम निर्माण करणारे सहस्रबुद्धे साहित्य व विज्ञानविषयक संशोधनात डीएसी/पीएच.डी./एलएल.एम. अशा पदव्या मिळविणारे डझनावारी सहस्रबुद्धे स्त्री-पुरुष, हॉकी, क्रिकेट, कॅरम इत्यादी खेळांत राष्ट्रीय स्तरावर भाग घेऊन पंच म्हणून राष्ट्रीय मान्यता मिळविणारे अनेक स्त्री-पुरुष, देशाच्या संरक्षणकार्यात अनेक आघाड्यांवर कार्यरत असलेले जनरलपासून कॅप्टनपर्यंत अनेक जबाबदारीच्या कार्यात व्यग्र असलेले अनेक सहस्रबुद्धे अधिकारी मंडळी, स्वातंत्र्यलढ्यातील व सामाजिक उद्धाराच्या कामात जीवनभर सेवाभावी राहणारे पद्मश्री अण्णासाहेब सहस्रबुद्धे, वेद व वेदांगाकडे यजन-याजन या (विषयात प्रमाणभूत) मानले जाणारे, पण वेळ येताच देशासाठी तुरुंगवास पत्करून घरच्या देवळात अस्पृश्याला प्रवेश करू देणारे कै. भाजेकर पराशराम सहस्रबुद्धे, जगातील १४ भाषांचा अभ्यास करून एकंदर ४० भाषांचा समानार्थी शब्दकोष प्रसिद्ध करणारे श्री. जगन्नाथ दिगंबर सहस्रबुद्धे अशी कितीतरी मोठमोठी मंडळी पुढे येतात. व्यावहारिक जगातील एकही क्षेत्र असे नाही की, ज्यात सहस्रबुद्धे चमकले नाहीत, हे ठळकपणे दिसून येते. या ग्रंथात दिलेल्या व्यवसायसूचीत ७५ निरनिराळ्या विषयांतील जवळजवळ ४०० चे वर तज्ञांची यादी यादृष्टीने मोठी बोलकी आहे. बदलत्या काळानुसार धर्म-रुढी कल्पनात सुधारणा करून धर्म-जाती- देश यांचा विचार न करता रोटी – बेटी व्यवहार करणारे, पुनर्विवाह करणारे, स्त्री-पुरुष सहस्रबुद्धे घराण्यात गेल्या ३०/४० वर्षांत पाहावयास मिळतात.
    अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. मार्गारेट या गेली १५/२० वर्षे चित्तपावन ज्ञातीबद्दल संशोधन करीत आहेत. ही विशिष्ट ज्ञाती आपल्या संशोधनासाठी का निवडली, याविषयी खुलासा करताना त्या म्हणतात की, “पंधराव्या शतकापासून चित्तपावनांचा छोटा ब्राह्मण समूह जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत नेतृत्व स्वीकारून असून गेली २००/३०० वर्षे या समूहाशी बरोबरी करणारा दुसरा ब्राह्मण समाज सबंध भारतात नाही.”
    सहस्रबुद्धे घराण्यातील गेल्या ३०० वर्षाची सामाजिक/ सांस्कृतिक परिवर्तने याचा समारोप करताना असे म्हणावे लागेल की, या चित्तपावनांच्या या परिवर्तनात सहस्रबुद्धे घराणेही आघाडीवर आहे.
    सध्याच्या शतकाच्या शेवटी औद्योगिकरणामुळे सर्वसाधारण जीवन फारच गतिमान होऊ लागले आहे. पैसा स्वस्त झाला आहे. ऐहिक सुख बऱ्याचशा शहरवासीयांच्या वाट्यास आले आहे, परंतु मानसिक स्वास्थ्य हरवत चाललेले आहे. अशा भविष्यातील कठीण दिसणाऱ्या काळात आपल्या कुटुंबीयांतील तरुण पिढी परत फिनिक्स पक्षाप्रमाणे नव्या जोमाने कामास लागेल ही आशा व्यक्त करून हे शेवटचे प्रकरण संपवीत आहोत.

    सहस्रबुद्धे घराण्याच्या वेगवेगळ्या वाड्यांची माहिती

    सहस्रबुद्धे घराण्याची केळ्ये शाखा:

    केळये हे गाव रत्नागिरी, पासून सुमारे १२ कि.मी. दूर आहे. केळ्ये येथे यावयाचे झाल्यास रत्नागिरी मिरजोळे (विमानतळ मार्गे) शील-माजगांव केळ्ये असे रस्ता मार्गे यावे लागते. केळ्ये हे सुमारे २००० वस्तीचे ९/१० वाडया असलेले गांव; यात मुसलमान वाडी, बुद्धवाडी, डोंगरे वठार, ठीकवाडी, सोलकरवाडी, पड्यारवाडी, पाळंदवाडी, आंबेकोंड, नेने वठार, पवारवाडी अशा वाडया आहेत. सर्व वाडया पक्क्या रस्त्याने जोडलेल्या आहेत. गावात ग्रामदेवता (नवलाई, पावणाई, वागजाई) लक्ष्मीकांत व हनुमान मंदिर, विश्वेश्वर अशी मोठी मंदिरे आहेत. या व्यतिरिक्त विठ्ठल मंदिर, गणपतीची ३ खाजगी मंदिरे, मारुती मंदिर, राधाकृष्ण मंदिर अशी मंदिरे आहेत. वरील पैकी सहस्रबुद्धे कुटुंबियांचे गणपती पंचायतन हे एक खाजगी मंदिर आहे. या मंदिरापैकी आदिलशहाचे काळापासून गणपतीमंदिर, लक्ष्मीकांत व विश्वेश्वर मंदिराच्या सनदा सहस्रबुद्धे कुटुंबियांकडे आहेत. गणपती पंचायतन मंदिरात भाद्रपद महिन्यात गणेश
    सा चतुर्थी व माघ महिन्यातील चतुर्थीला सहस्रावर्तने, आरती, मंत्रपुष्प व प्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी असतो.
    कोतवडे (धामेळेवाळी) येथून सुमारे ५५० ते ६०० वर्षापुर्वी ‘कृष्णभट बिन गणेशभट’ हे केळ्ये येथे स्थलांतरित झाले. कारण सध्या केळ्ये येथे १९वी पिढी नांदत आहे. सध्या केळ्ये येथे सहस्रबुद्धयांची ३ घरे नांदती आहेत. यापूर्वी आणखी ३ घरे येथे होती याची माहिती आहे. ऐकीव माहितीनुसार केळ्ये हा गांव वाण्यांचा होता. परंतु आता एकही वाणी गावांत नाही. सहस्त्रबुद्धयांव्यतिरिक्त गावात अभ्यंकर, बापट, जोगळेकर, गोखले, काळे, केळकर, गोडबोले, वाकणकर, दामले, गोगटे यांची घरे आहेत. केळ्यातील सहस्रबुद्धे कुटुंबाला देसाई अशी पदवी बहुधा पेशव्यांनी दिलेली आहे. कारण मोडी लिपीतील काही जुने दस्तऐवज आजही सहस्रबुद्धे यांचे कुटुंबात आहेत व ते तांब्याच्या नळकांड्यात सुरक्षित ठेवलेले आहेत. त्यांचे वाचन मागील कुलवृत्तान्त लिहिण्यापूर्वी बिदरचे सहस्रबुद्धे (ज्यांची ‘सरला’ या नावाने पत्रे येत असत) व पुण्याचे डॉ. सहस्रबुद्धे यांनी केले होते. परंतु ते कागदपत्र काही दाव्यातील असल्याचे कळले. पूर्वी केळ्ये हा ‘महाल’ होता. तेथून पंचकोशचा व्यवहार व वसुली वगैरेचा व्यवहार चालायचा.
    केळ्ये येथे बौद्धवाडी, मुसलमानवाडी वगळता अन्य वाडयात २/४ ब्राह्मणांची घरे पाणवठ्याजवळ व नंतर उंचावर कुळांची (कुणबी) वस्ती १५/२० घरे अशी गावाची रचना आहे. कारण डोंगर दऱ्याचा गांव आहे. ब्राह्मणांची २०/२२ घरे नांदती आहे. उन्हाळ्यात शेवटचा महिनाभर पाणी टंचाई जाणवते. गावात स्वतंत्र ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेची पोपस्टाची शाखा आहे. जिल्हा परिषदेची ७वी पर्यंत प्राथमिक शाळा असून ८वी ते १०वी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे श्री. शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिर आहे.
    केळ्ये येथे १९०२ पर्यंत सहस्रबुद्धयांचा मूळ चौसोपी वाडा होता. कोतवडयातून केळ्यात स्थलांतरित झाल्यावर नंतर आवश्यकतेनुसार केळ्यात वेगवेगळी घरे झाली असावीत. तसेच केळ्यातून नोकरी, उद्योग धंदा, शिक्षण वा अन्य कारणास्तव महाराष्ट्रात व बाहेरही सहस्रबुद्ध्यांचे स्थलांतर झाले. पैकी सातारा, पुणे, मुंबई (उपनगरासह), येथील नागपूर, विदिशा, ग्वाल्हेर, येथील सहस्रबुद्धे आजही केळ्यातील सहस्रबुद्धयांशी संपर्कात आहेत.
    केळ्ये येथील सहस्रबुद्ध्यांशी संपर्क साधायचा असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक ९४२०५२६४९६ सुहास दत्तात्रय सहस्रबुद्धे यांचेशी संपर्क साधावा.
    केळ्ये येथील सहस्रबुद्धे शांडिल्य गोत्री आहेत व मूळ कोतवडे धामेळेवाडी येथील असल्याने त्यांचे कुलदैवत कुसुमेश्वर, महालक्ष्मी हेच आहे.

    A short note on sahasrabudhe families residing in South Karwar region i.e Dakshina Kannada and Uttara Kannada districts (Connected to Kelye Mazgaon wadi).

    Goa, Sawantawadi, South Karwar branch ( including Kelai and Majagaavi) this branch incorporates Velage ( Tq Dicholi, Goa) Kumbrala ( Tq Sawantavadi, Sindhudurga dist) and Adyanka and Nellitadaka ( Tq Balatangdi, Dakshina Kannada dist, South Karwar) branches.

    Family tree of Sahasrabudhe’s of Goa, Sawantawadi, South Karwar .
    Shri Bhikaji is “moola purusha” of this family tree belongs to Kelya, Majagaavi family ( 12th generation from Ganesh Sahasrabudhe’s son) Shandilya gotra, Vishwanath Sahasrabudhe’s 5th son.

    Ganesh Sahasrabudhe left Kothvade alone and settled in Kelya to fulfill his father’s wish. Vishwanath Sahasrabudhe and his four other sons stayed back in Kothvade. Earlier Sahasrabudhe’s were members of Ganapule ( surname ) family .

    During Adil Shahi rule, Krishna Sahasrabudhe ( Ganesh Sahasrabudhe’s son) was appointed as Desai( this is recorded in history). During this period, many families from Kothvade and Kelya migrated to other places. In this migration process one group of families crossed the ghat and settled in Desh while the other group settled along the coastal belt from Alibaug ( North ) to Karwar ( South ). During this process they stretched beyond upto South Karwar. According to the information ( available till date ) Balkrishna, Keshava and Ananta, brothers migrated to Harmala near Bicholi, Goa. From there they migrated to Velge in the same district and settled there. But around 1900, due to some rift in the family two bothers relocated to some to other places. Shri Balkrishna Sahasrabudhe migrated towards Karwar district. Portuguese domination, religious highhandedness attitude and fear of conversion were some of the reasons for the migration as revealed by few migrants. Around 1907, Shri Balkrishna Sahasrabudhe moved to Kumbrala near Sawantawadi Bandalga, Sindhudurga district. Shri Keshava Sahasrabudhe stayed back in Velage.

    In this document ( Vamsha Vriksha ) sons of Balakrishna Sahasrabudhe, Shri Ananta Bhatta and Mahadev Bhatta’s family line ( vamshavali) has been shown in Index No 1 J 2/2 and 1 J 2/3. The Kula deva ( family Diety) of this branch is Shri Vyadeshwar and Kula Devi is Jogeshwari. The families of this lineage, the last 5-6 generations, have settled in Nellithadaka and Adyanke.

    Note: These Chitpavans even now speak Chitpaavani in their homes but many of them do not understand modern Marathi language. The information in Marathi has been translated into Kannada language. Now the feedback received from them is again translated to Marathi.

    Maharashtrians ( Chitpavans) residing in other places do not know this information. Therefore this information is given here in detail.

    The migrated families of Chitpavans (Sahasrabudhe family members) from Ratnagiri, Sindhudurga Sawantwadi, Goa and other places have now settled since 1780’s. These families have been relocated in Mangalore and Udupi earlier part of Dakshina Kannada district. As mentioned earlier, Adyanke, Alambra, Nellithadka, Dakshina Kannada districts are their colonies.

    These areas are in slopes of Sahyadri Western ghats in the east and are surrounded by Arabic sea on the west and rivers around. Sahasrabudhe’s families are located in hilly regions in small colonies. Most of them are Areca growers. Some of them are Purohits ( priests ) and few others practice other occupations and other trades.

    There are more than 5000 families living in Southern Karnataka mostly in Western ghat sections. Many Chitpavans have now settled themselves in different parts of Karnataka and elsewhere. You can find them in Sirsi, Soraba, Banavasi ( Uttara Kannada district) Shringeri, Sagar ( Shivamogga district) and other places in Karnataka state.

    Chitpavans have retained their identity, their distinct tradition and their culture intact to this date. In Dakshina Kannda district, Mangaluru and Udupi districts they have four settlements. Their colonies stretch across Mala, Durga, Gangeneeru, Hebri, Idu villages in Karkala taluka ( Udupi District) Mundaje, Shishila, Hatyadka, Shibaje, Nidle, Arasinamakki, Soolabettie, Phandije, Andinje, Aladangady, Uruva, Hosamatha, Bangaadi in Belthangady taluk of Dakshina Kannada district, Halady in Kundapura taluk in Udupi district. Their surnames have been slightly changed because of local influence. Some examples Bapat Bappat, Pudaka Phadake, Damle Dammale etc.

    There are 49 Chitpavan surnames ( family names – Kulanaama ) are prevalent in Dakshina Kannada district ( there are more than 1000 households). Their history of migration is yet to be compiled and recorded with historic evidence. How did these Chitpavan families migrate from distant places ? The time period of their migration, their routes, reasons of travel etc can be subject of study and of profound interest. It seems Islamic invasion, religious hegemonies, atrocities are definitely the main reasons for their migration / movement.

    Prominently Saaraswaths, Rajapuri community people, Vokkaligas, Kudaala Deshastas, Karhad’s ( Goud) community people also migrated to south Karnataka ( South Karwar) from Goa and Maharashtra. These communities migrated due to Portuguese invasion and their onslaught. According to experts and historians claim that Chitpavans migrated much earlier i.e before Portuguese invasion. Chitpavans claim certain things “GOVAN” in day to day households and affix this term frequently.

    Some scholars have presumed that they migrated to Dakshina Karwar on the support and patronage of Shringeri Mutt. Some experts believe that Chitpavans families migrated to Tanjavoor ( Tamil Nadu) with blessings and patronage of the rulers under Venkoji Bhosale’s guidance. Among these migrants some might have moved to Dakshina Karwar area, they argue. At the same time some experts believe that these migrants travelled via sea route in two teams. One of them came to Malpe port near Udupi city and the other team landed in Mangalore port. Later these migrants took shelter in adjunct areas Haalady, Shankaranarayana, Hiriyadka and Poonjala Katte and stretched their colonies to other destinations. In this process some might have moved to places like Mundaje, Shishila, Hosamatha, they argue.

    Most of the Chitpavan families are solely dependent on areca nut cultivation. It was their main means of livelihood. Even though they are settled in remote villages with tough landscapes they have built their homes according to their “Chitpavani” tradition, style and architecture. Their vaastus and construction is similar as was in Konkan areas. Their houses, doors, entrances, decoration are quite specific and distinct. Their food s very scrumptious , clean and neat. They love sweets in their meals. They prefer raw rice and do not eat boiled rice.Majorly Chitpavan families have maintained their life style intact to this date.

    Details regarding some families of this branch is as follows:

    Family Line – Vamshaavali – 1J1 ( J in Kannada / Marathi )

    Keshava Sahasrabudhe mentioned earlier is moola purusha of this family. He was one among the early birds. He came to Goa around 1815. This family resides in Velaga since 150 years. They were into cultivation and agriculture. They are areca nut, coconut and paddy growers.

    Aatmaaram: He is a descendent of this family and is a member of 5th generation. He married Sita, daughter of Krishna Rao Barve of Vaaghaara ( Sattari Goa). This couple had a son named Shridhara.

    Shridhara Aatmaram: Born on 24-09-1942, he was a social worker. He was the president of autonomous institution – KOMU NINAAD in Goa. He was a trustee ( Mahajan ) of local temple – Mahadeva Mandir. He bought a vacant land on Velaga – Mapasa – Madagaun highway and constructed a Ganesh temple. Under his able guidance and guidance many dharmic and social service activities have taken place. His wife Sou Lakshmi Shrihara is from Hubli. Their marriage took place in 1972. They have two children i.e Ajit ( 22 ) is a graduate and Milind ( 14 ) is a high school student. In 1950 Manganese and Iron ore mining started and theywere forced to leave their agricultural activities. To overcome this, Shridhara Panth started transport business. He was the disciple of Paramapoojya Sri Sri Raamaanand Swamy of Dhaaboli Mutt. Panth says he thrived in his venture with the divine blessings of Guruji.

    Yashavantha Vishnu: Born in 1937 and died in 1969. He was a matriculate. As he inherited ancestor’s property he took to agriculture, areca cultivation. He married Krishna Bai of Mulagaavi. They had four children, Ramakrishna, Dilip Kumar , Kunjan (Sou Vaishali Vasudev Vaje) and Kaamini ( Sou Gouthami Dhananjaya Thamhankar).

    Ramakrishna Yeshvantha : Born on 22-04-1963. He passed SSLC and got a job in Horticulture Marketing Society in Saakali, Goa. He is a bachelor. His brother Dilip Kumar ( born on 19-01-1969) is a commerce graduate.

    In this “Vamsha Vriksha” first generation representative, Keshava Sahasrabudhe’s brother Ananta Sahasrabudhe’s information is not available. Shri Balakrishna Kashinath has sent Vamshaavali of seven generation from Anantha Sahasrabudhe, since this information is not in perfect shape we have given details of Vamshaavali – 2 and Vamshaavali – 3 only.

    VAMSHAAVALI ( Index ) 1 JA : 2 & 3

    11. MAHADEVA BHATTA BALAKRISHNA: He got his share of ancestral property at Adyanke – Durga village – Taluk Karkala Dt Udupi [ earlier South Kanara – Dakshina Kannada dist ]. He struggled hard to develop his property. He had five brothers – Damodar, Govind, Vithal, Ganapati and Krishna.

    12. VARADASHANKARA VITHAL : Born 1936 and died 1994. After his primary education he took to areca cultivation. He married Amba Balakrishna Kakatkar from Mundaje Belathangadi taluk, Dakshina Kannada district. Annapoorna ( Amba ) Varadashankar was a home maker. They had 10 children ( 9 boys and 1 girl ). They are Suprasaada, Ratnakara, Gopathi, Ganesh, Naamadev, Govind, Shridhar, Jayaraam and Nandan, Jaya Kumari. Varadashankara’s sister married Jagannatha Khare of Banvasi. Daughter Jaya Kumari married Sunil Harishchandra Bhide on 21-05-1985.

    13. Suprasaada Varadashankara : Born 22-10-1960. At an early age, immediately after 3-4th standard he took to areca cultivation. He married Yamuna Govind Bhatta Marathe on 03-08-1989. They did not have any children.

    14. Ganapathi alias Ganesh Mahadev Bhat: Born in 1926 died in 1951. After finishing his primary education he took to farming. He married Kamala Ganapathi Bhat Bapat of Shringeri. Sou Saraswathi was a house wife. This couple was blessed with three children. Two boys Mahadev and Narayan and girl child Tharaamathi ( Sou Snehalatha Jayaprakash Adhikari) Among five brothers Ganesh Bhat was very brave and industrious. He was a professional hunter. He used to catch tigers and tame them. He used to climb trees and watch tigers during night. He used to hunt tigers and cage them. He used to bring those caged tigers to demonstrate to the public. He had caught 11 tigers. He was given the nickname Huli ( tiger ) Ganapathi Bhat Sahasrabudhe. He was a Yakshagana artiste and participated in dramas, Bhaagavatha ( folklore) and used to stage mythological plots. He died in 1951.

    15. Mahadev Ganapathi : Born 14-11-1942. He is a post graduate in Microbiology B.A.SC, A.H ( Hons) and MSc. He was in Maharashtra Government service – Aminal Husbandry department. He married Kum. Vidya Anantha Pavagi on 30-05-1971 in Dombivili – Mumbai. Sou Malati Mahadev ( born 05-02-1950) is a bachelor degree holder in Home Science. This couple is blessed with two daughters, Megha ( born 29-02-1972) and Varsha ( born 17-01-1975). Megha is a B.Pharma graduate in Pharmacology. Varsha is a bachelor in engineering in Computer Science.

    16. Narayana Ganapathi Ganesh : Born ( 11-06-1949). In his childhood he moved to Maharashtra. He studied in Kolhapur, Miraj and Belgaum. He graduated in Geography ( M.Sc) from Kolhapur’s Shivaji University. From 1971 to 1974 he served in Solapur Dayananda college as a lecturer. He then joined Indian bank. He served in Madras, Nagpur, Nasik, Davangere and few other places. He served as bank manager in Bangalore for more than 15 years. He married Shailaja Mahadev Phatak of Gokak( born 08-03-1953). Sou Sunita Narayan is a home maker. They were married on 07-04-1974. Sou Sunita Narayan is a diploma holder in Ayurveda ( Indian Medicine ). She served aadivasi people in Chandrapur district in Maharashtra. Likewise she served orphans at Aadhaar Ashram in Nasik and few other places through charity and honorary posts. They have two children. Sunil ( born 07-02-1975) and Sonali ( born 09-01-1976)

    धामेळे वाडी:

    धामेळे वाडीची माहिती देण्याअगोदर कोतवडे गावाची साधारण रचना लक्षात घेऊ. कोतवडे हा गांव रत्नागिरीपासून साधारण १२–१३ कि.मी. वर उत्तरेला वसलेला आहे. हा गाव १२ वाड्यांमध्ये वसला असून प्रत्येक वाडीमध्ये सहस्रबुद्धे हे खोत होते. आज साधारण ६ घरे सहस्त्रबुद्धयांची या गावात आहेत. गावात शिवरात्र, नवरात्र व शिमगा हे उत्सव मोठ्या प्रमाणात होतात. शिमगा उत्सवात निघणारी गावातील देवतांची पालखी ही होळीनंतर त्या त्या वाडीच्या खोताच्या मानाप्रमाणे जाते. धामेळ्यात ही पालखी होळीनंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे तृतीयेला येते. तसेच ढोकमळे वाडीतून परत येताना ही पालखी धामेळयात येते व तेथेच होळीचा उत्सव संपतो.
    धामेळे वाडीत सर्वात जास्त म्हणजे ११ सहस्रबुद्धे यांची व ४ फडके यांची घरे होती. फडके हे धामेळ्यातील सहस्रबुद्धयांचे उपाध्ये होते. आज सहस्रबुद्धयांचे एक घर आहे. बाकी घरांची फक्त जोती आहेत. गावात श्री. धामणेश्वर हे शंकराचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिर विशाल असून त्याचा जीर्णोद्धार मध्यंतरी केला गेला आहे. धामेळे वाडीच्या एका बाजूला खाडी व एका बाजूला आरे-वारेचा सुप्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. पूर्वी जल वाहतुकीला जास्त महत्व असल्यामुळे कदाचित या वाडीत जास्त घरे असावीत. परंतु नंतरच्या काळात सरदार पटवर्धन यांच्यामुळे ज्यांना घाटावर जाण्याची संधी मिळाली, ते स्थलांतरित झाले. वाडीतील बल्लाळ विष्णू सहस्रबुद्धे हे पेशव्यांच्या दरबारात कारकून होते व त्यांचे बंधू केसो विष्णू सहस्रबुद्धे यांनी श्री धामणेश्वराचे भव्य मंदिर बांधले अशी ऐकीव माहिती आहे. धामेळेवाडी ही कोतवड्यापासून साधारण दोन ते अडीच कि. मी. दूर असून कोणी कुलबंधू कोतवडयास गेल्यास या मंदिरास अवश्य भेट द्यावी.
    प.पू. बाबा महाराज सहस्रबुद्धे हे देखील मूळचे धामेळ्यातीलच. त्यांच्या पादुका धामेळे येथे मंदिराजवळच आहेत. वाडीचा परिसर नितांत सुंदर असून आंबा व नारळाच्या बागा येथे आहेत.