लै भारी…

©️अरुण सहस्त्रबुध्दे औंध पुणे

संमेलन म्हटले की दिवसभर चर्चा , भाषणे,उपदेश, उत्सव मूर्तीचे सत्कार आणि अध्यक्ष बरोबर हसरे फोटो असे ठरलेले उपक्रम आपल्या डोळ्यासमोर येतात. अहो! पण हे “सहस्त्रबुध्दे कुल संमेलन” आहे. अर्थातच भाषणं झाली चहा पाणी वगैरे झाले. परंतु नावाप्रमाणे अगदी शिस्तबद्ध आणि आटोपशीर. उगाच सोम्याचा गोम्या कसा प्रगती करतोय वगैरे नाही.

पहिल्या पासून शेवटपर्यंत न कंटाळता आपल्याच माणसांची उत्तुंग झेप याची प्रेरणा घेताना आपण एका कसदार विद्वत्ता सिद्ध करणाऱ्या कार्यक्रमात सहभागी झाल्याची जाणीव होते. विविध क्षेत्रात आपली सहस्त्रबुध्दे मंडळी आपले कर्तुत्व सिद्ध करताना कोणताही गर्व, अभिमान याचा स्पर्श त्यांच्याकडे जाणवला नाही.

क्षेपणास्त्रे ते गिर्यारोहण, तबलावादक ते 100 वर्ष नेटाने सचोटीने चालवणारे कापड दुकानदार तर कोणी उत्तम अनुवादक या सगळ्याचा सत्कार करताना “आम्ही सहस्त्रबुध्दे” अशी आनंद आणि अभिमानाची कॉलर चमकायची.

वृत्तवाहन्यांवरील संपादक असणाऱ्या भारतीताई सहस्रबुद्धे ह्यांनी उपस्थित राहून तर या संमेलनाला चार चांद लावले. सध्याच्या काळात, नवीन काही चांगले ऐकावे, काही चांगले लिहावे आणि बोलावे ह्याचा सुंदर मिलाफ असलेला असा हा वैविध्यपूर्ण मेळावा संध्याकाळपर्यंत सुरू होता. स्थानिक कलाकारांनी सादर केलेले कोकणी नाट्य प्रथमच पाहिले. कोकणी भाषेतील संवाद आणि व्यवच्छेदीक खुमासदार शैलीने मजा आली. तबला आणि हार्मोनियम वर खूप वेगळे नाट्यगीत उपेंद्र सहस्त्रबुध्दे यांनी सादर करून कान तृप्त केले .तबला साथ करणारे तरुण म्हणजे जणू कळसूबाई वेगळ्या मार्गाने सर करणारे तरबेज हातच. गाण्याचा आनंद द्विगुणित करत होते.
संमेलनाला येण्यासाठी खूप लोकांची ठिकाणे वेगवेगळ्या ठिकाणी असताना अत्यंत काटेकोर नियोजन करून वेळेत सगळे हजर झाले. नियोजन व्यवस्था कौतुक करण्यासारखे. हे सम्मेलन अनुभवतांना आवर्जून आम्ही सहस्रबुद्धे म्हणण्याचा आनंद द्विगुणित झाला.

हया पुढील सम्मेलन आता कोणी चुकवू नये.बोलणे आणि करणे यात खुप अंतर आहे.आपली ख्याती सर्वदूर पसरवण्याची गरज आहे.चला आता आणखीन भव्य करुन दाखवू. आमच्या कडे अभिजीत, हेमंत,विनायक, शिरीष (सहस्रबुद्धे’S) असे अनेक निष्णात कार्यकुशल हात सतत कार्यरत आहेत. त्यामुळे सहस्त्रबुध्दे नाव सांगितले की शिस्त, भारदस्त, बुद्धिमान हे कौशल्य गुण आपोआप समोरच्या माणसाच्या मनात उभे राहतात.

एक सूचना करावीशी वाटते की सुट्वांगपणा आणि मी, माझे कुटुंब ह्यातुन बाहेर पडून आपण सहस्त्रबुध्दे म्हणून नातेवाईकांचा तरी एकोपा जाणे येणे वाढवावे. सुरुवात मी करणार आहे आपणही केली असणार , ज्यांनी केली नसेल तर शुभ्यस शीघ्रं.

काही चांगले कानावर पडावे, डोळ्यांनी पहावे आणि त्यातून पुढील पीढीने आदर्श घ्यावा असे उत्कृष्ठ “सहस्त्रबुध्दे कुलसंमेलन” कोतवडे, रत्नागिरी येथे ३० ऑक्टोबर २०२२ रोजी यशस्वीरीत्या पार पडले.

©️अरुण सहस्त्रबुध्दे औंध पुणे

Previous Post Next Post