आनंदाचे डोही आनंद तरंग

आनंदाचे डोही आनंद तरंग तशी अगदी पहाटेपासूनच सगळ्यांची लगबग सुरू होते. आज सगळी आपलीच मंडळी येणार असतात.सर्व योजना आखलेली चार कुटुंबे, दोन दिवस आधीपासूनच गावात मुक्कामास असतात.ज्या पवित्र भूमीत आपले कुलदैवत आणि देवता आहेत, त्याच ठिकाणी आपल्या कुळाच्या सर्व लोकांनी एकत्र एक दिवस व्यतीत करायचा असा मनसुबा असतो.सर्व सुरळीत पार पडावे ह्यासाठी प्रत्येक आयोजक मेहनत [...]

लै भारी

लै भारी... ©️अरुण सहस्त्रबुध्दे औंध पुणे संमेलन म्हटले की दिवसभर चर्चा , भाषणे,उपदेश, उत्सव मूर्तीचे सत्कार आणि अध्यक्ष बरोबर हसरे फोटो असे ठरलेले उपक्रम आपल्या डोळ्यासमोर येतात. अहो! पण हे “सहस्त्रबुध्दे कुल संमेलन” आहे. अर्थातच भाषणं झाली चहा पाणी वगैरे झाले. परंतु नावाप्रमाणे अगदी शिस्तबद्ध आणि आटोपशीर. उगाच सोम्याचा गोम्या कसा प्रगती करतोय वगैरे नाही. [...]

श्री. अनिल सहस्रबुद्धे

श्री. अनिल सहस्रबुद्धे सांगली येथे चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये प्राध्यापक असतानाच श्री. अनिल सहस्रबुद्धे यांना समाजकार्याचीही खूप आवड होती. श्री. भैयाजी काणे ह्यांनी स्थापलेल्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान ह्या संस्थेशी त्यांचा खूपच संबंध आला त्यांच्या योजनेप्रमाणे मणीपूर, नागालँड मधील गरीब मुलांना शिक्षणासाठी सांगली येथे आणत. त्यानिमित्ताने सरांनी खूप वेळा पूर्वोत्तर प्रदेशांना भेट दिली. तेथील [...]