हेमंत सहस्रबुद्धे
पुणे
1998 या वर्षी सहस्रबुद्धे kulgranth पूर्ण होऊन प्रकाशित झाला.अनेक कुटुंबीयांचा कडून मिळालेल्या देणग्या व ग्रंथ छपाई करताना ना फायदा ना तोटा या पद्धतीने केलेल्या कामामुळे संपादक मंडळाकडे काही रक्कम शिल्लक राहिली.
शिल्लक राहिलेल्या रकमेचे काय करावे याचा अनेक बाबींवर विचार विनिमय झाला व अखेर सर्वानुमते kulpratishthan न्यास करण्याचे नक्की झाले.
सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून 31 मे 1999 या दिवशी न्यासाची स्थापना झाली.पुन्हा एकदा सहस्रबुद्धे कुटुंबीयांना याची माहिती देऊन देणग्या देण्याची विनंती करण्यात आली व त्यातून न्यासाचा निधी वाढविण्यात आला. वेगवेगळ्या शहरांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून सुरवातीला 25 विश्वस्त निवडले गेले.
सदर न्यासाची व्यवस्था बघण्यासाठी The Maharashtra Executor and Trustee Company Pune यांची कार्यकारी विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आली.
न्यासाची मुख्य उद्दिष्टे ही सहस्रबुद्धे कुटुंबियातील गरजू लोकांना मदत करणे अशी आहेत. त्यामधे शिक्षण ,आरोग्य,सामजिक व सांस्कृतिक उदिष्टे. आहेत.
यासाठी महाराष्ट्रातील काही गावे व शहरांमधील वर्तमानपत्रात दरवर्षी निवेदन दिले जाते.आतापर्यंत आपण शिक्षण आजारपण यासाठी अनेक गरजू सहस्रबुद्धे मंडळींना रक्कम दिली आहे.यासाठी गरजू व्यक्तीने एक न्यासाच्या नावाने अर्ज करणे आवश्यक असते .त्या अर्जाची खातरजमा करून नंतर शक्य तेवढी मदत दिली जाते.
सर्व व्यवहार पारदर्शी असून दरवर्षी ताळेबंद केला जातो व तो चार्टर्ड accountant कडून ऑडिट केला जातो. इन्कम टॅक्स रिटर्न भरले जाते.
पुणे
पुणे
पुणे
पुणे
मुंबई
पुणे
पुणे
पुणे
पुणे
पुणे
पुणे
पुणे
पुणे
मुंबई
14 नोव्हेंबर 2021 रोजी गोवर्धन हॉल शनिवार पेठ, पुणे येथे सहस्रबुध्दे कुल संमेलन झाले.
सकाळी 8.30 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. साधारण 165 कुलबंधू भगिनिंचा सहभाग होता.
आलेल्या कुल बंधू भगिनी यांचे रजिस्ट्रेशन केले व पेढा देऊन त्यांचे स्वागत केले.याकामी अदिती ठाकूर सहस्रबुध्दे,आनंद, रोहन,ऋचा,नितीन सर
या सर्वांनी मदत केली.
खासदार डाॅ. विनय जी संमेलनाध्यक्ष तसेच AICTE चे अध्यक्ष डाॅ.अनिल जी उद् घाटक म्हणून उपस्थित होते. सौ.माधुरी ताई नगरसेविका पुणे महानगर पालिका यांची विशेष व्यक्ती म्हणून उपस्थिती होती. ज्या कुटुंबीयांना उपस्थित राहता आले नाही त्यांचे साठी आपल्या ग्रुप वर या संमेलनाचे फेसबुक लाईव्ह सुरू ठेवले होते.ही जबाबदारी श्री भूषण यांनी पर पाडली.
कुटुंबीय बंधू भगिनी या सर्वांची न्याहरी झाल्यानंतर 10.15 वाजता संमेलनाला सूरूवात झाली.
न्यासाचे अध्यक्ष श्री हेमंत यांनी डाॅ. विनय जी, डाॅ.अनिल जी, माधुरी ताई यांना मंच्यावर स्थानापन्न होण्याची विनंती केली त्या प्रमाणे डाॅ. विनय जी, डाॅ.अनिल जी, माधुरी ताई,तसेच विश्वस्त डाॅ. अनुराधा व श्री.हेमंत हे सर्व मंचावर स्थानापन्न झाले.सूत्र संचलानाची जबाबदारी नीला ताई यांचेवर सोपवली होती.त्यांनी ही जबाबदारी फारच छान निभावली. प्रथम सर्व माननियांचे हस्ते दीप प्रज्वलन झाले.नंतर सौ. मेघना ह्यांनी गणेश वंदन सादर केले. डाॅ. विनय जी यांचे न्यासाचे अध्यक्ष श्री.हेमंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच गौरव पत्र व भेट वस्तू देऊन सत्कार केला.
न्यासाचे विश्वस्त श्री.शिरीष जी यांनी डाॅ. अनिल जी व डाॅ. अनुराधा ताई यांनी सौ.माधुरी ताई यांचा याच पद्धतीने स्वागत व सत्कार केला.
आपला मूळ कुल ग्रंथ होऊन अनेक वर्ष झाली. त्या कुल ग्रंथाचा प्रवास,त्याची वाटचाल या सर्व गोष्टींचा न्यासाचे संस्थापक विश्वस्त श्री.शिरीष जी यांनी थोडक्यात आढावा घेतला.या सर्वाची सुरवात बिदरचे श्री गणेश पंत व त्यांच्या पत्नी यांनी अनेक कुल बंधूंना पत्र पाठवून कशी केली याचे यथार्थ वर्णन आपल्या भाषणात केले.तसेच याची धुरा नंतर डाॅ. यशवंत ज्यांना सर्व काका म्हणत असतं त्यांनी समर्थ पणे कशी वाहिली हे ही सांगितले.त्यावेळेस त्यांना आलेल्या अडचणी,चांगले वाईट आलेल्या अनुभवांचे कथन केले. 21 पिढ्या आणि अंदाजे 8500 व्यक्तींची माहिती या ग्रंथात आहे.communication ची साधने फारशी नसताना त्या सर्वांनी कुटुंबीयांची मिळवलेली माहिती ,आपले मूळ गाव कोतवडे हे किती वर्षापासून अस्तित्वात आले याचा ही शोध डाॅ. यशवंत यांनी कसा घेतला हे सुध्दा सर्व सांगितले.हा महान ग्रंथ निर्माण केलेल्या सौ.सरला ताई, गणेश पंत, डाॅ यशवंत व त्यांना मदत करणाऱ्या सर्व मंडळींचा रूणनिर्देश करून आपले भाषण संपविले. कुल ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर संपादक मंडळाकडे काही रक्कम शिल्लक राहिली व त्यातून सहस्रबुध्दे कुलप्रतिष्ठान न्यासाची स्थापना झाली.या न्यासा विषयी ची सर्व माहिती त्याचा प्रवास ,जडण घडण या सर्वाची माहिती न्यासाचे विश्वस्त श्री.हेमंत यांनी दिली.तसेच न्यासाच्या निधी संकलनाचे आवाहन श्री. हेमंत यांनी यावेळी केले. न्यासाची माहिती,त्याची उदिष्टे सर्व कुल बंधू भगिनी यांचे पर्यंत पोहोचवण्याची विनंती ही सर्वांना केली. न्यासा मार्फत जुन्या कुल ग्रंथाचे digitalization झाल्याचे सांगितले व त्यासाठी निधी दिलेल्या कुल बंधू भगिनी व माहेरवाशिणी यांचे या प्रोजेक्ट साठी त्वरित निधी संकलन केलेआणि विश्वस्त विनायक ,अभिजित, व राहूल ज्यांनी यामध्ये खूप मेहनत घेतली त्यांचे आभार मानले .त्यानंतर विश्वस्त डाॅ. अनुराधा ताई यांनी न्यासाची पुढील वाटचाल तसेच संमेलन का घ्यावे त्याचे कुटुंबाला होणारे फायदे यावर विस्तृत विचार मांडले.काही प्रमाणात त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली .
नंतर जुन्या कुल ग्रंथासाठी काम केलेल्या व्यक्तींचा डाॅ. विनय जी यांच्या हस्ते सत्कार केला.प्रथम सौ.शुभांगी ताईंचां सत्कार केला.त्यांनी कुल ग्रंथाच्या प्रकाशनाची जबाबदारी कोणताही फायदा न घेता उत्तम रित्या पार पाडली.
अंजनी ह्यांनी संपूर्ण DTP तर गौरी रानडे यांनी ग्रंथाचे मुखपृष्ठ तसेच आत्ताचा लोगो याचे डिझायनिंग केले. त्यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार केला.
आपल्याच कुळातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या काही व्यक्तींचा मान्यवरांचे हस्ते गौरव पत्र व भेटवस्तू देऊन सत्कार केला.श्रीरंग जो सध्या अमेरिकेत आहे त्याची एक त्याने केलेल्या कार्याची व्हीडीओ क्लिप दाखवली.दुर्देवाने 13 व्या वर्षी अंधत्व येऊन सुद्धा PHD पर्यंत मजल मारली.त्याचे आई वडिलांना ही मुद्दाम आमंत्रण दिले होते.पण त्यांना काही कार्य बाहुल्या मुळे येता आले नाही. पण नीला ताईंनी त्याची सत्कार भेटवस्तू त्यांचे घरी नेऊन देण्याची जबाबदारी घेतली.
नंतर प्रियदर्शन या तरुण संशोधकाचा सत्कार विनयजी यांचे हस्ते करण्यात आला.हा I I T चा विद्यार्थी असून ऊर्जेचे स्रोत संपणार असल्याने कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती हा त्याचा संशोधनाचा मुख्य गाभा आहे. सफाई कामगारांचे जीवनमान कसे उंचवता येईल यासाठी तो प्रयत्नशील आहे.तेच सफाई कामगार तुम्हाला ऊर्जा पुरवू शकतात हे त्याने सिद्ध केले आहे. श्री. सचिन दत्तात्रय हे मंत्रालयात under secretary म्हणून कार्यरत आहेत.कोविड काळामध्ये त्यांनी केलेले काम स्पृहणीय आहे.काही सहस्रबुध्दे कुटुंबीयांनी त्यांच्या मदतीचा अनुभव घेतला आहे.वेळी अवेळी केंव्हाही ते मदती साठी तत्पर असतात.
डाॅ. अमोल हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कार्यरत आहेत.चंद्रपूर येथील आदिवासींसाठी त्यांनी खूप काम केले आहे. तसेच लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात ही त्यांचा चांगला सहभाग आहे.
श्री.संजय नारायणराव हे वेगळ्याच क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व आहे .नॅशनल सिक्युरिटी संबंधात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केले आहे.आपल्या 7 पंतप्रधानांचे सुरक्षा रक्षक म्हणून त्यांनी पद भूषविले आहे. आता ते मुंबई मेट्रो चे DGM Security and vigilance आहेत. डाॅ.पराग हे प्लास्टिक सर्जन असून अनेक पुस्तके व शोध निबंध लिहिले आहेत.कोविड काळात त्यांनी खूप काम केले आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून डेरवण येथे मोफत सर्जरी करतात.
डाॅ.अनुराधा ताई यांचे कार्यक्षेत्र ही खूपच निराळे आहे.ज्ञानदेवी या संस्थेच्या त्या संस्थापक संचालिका आहेत.तसेच गंमत शाळा हा त्यांचा स्वतः हा केलेला शिक्षण पद्धतीतील प्रयोग आहे. व तो संपूर्ण यशस्वी झाला आहे.ज्ञानदेवी ही त्यांचीच संस्था असून गरीब,वंचित मुले, स्त्रिया यांना मदत करणे हे कार्य या मार्फत केले जाते.अडचणीत सापडलेल्या मुलांसाठी चाइल्ड लाईन ही 24 तास कार्यरत असलेली संस्था ही चालवतात.आत्तापर्यंत 40 पुरस्कार मिळाले आहेत परंतु वंचित मुलांची झालेली प्रगती पाहून व त्यांनी आई म्हणून मारलेली हाक हा सर्वात मोठा पुरस्कार आहे असे त्यांना वाटते.नंतर नीला ताई नी उपस्थित मान्यवर यांनाआपले मौलिक विचार मांडण्याची विनंती केली.तसेच मान्यवरांच्या कार्याची माहिती करून दिली.
प्रथम सौ.माधुरी ताईंचे भाषण झाले.एकंदरीत त्यांचा राजकीय प्रवास,त्यांनी केलेली सामाजिक कामे ,लहान मुलांसाठी स्थापन केलेल्या संस्थांची माहिती सांगितली.पद म्हणजे काम करण्याची संधी हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे.
नंतर डाॅ.अनिलजी यांचे भाषण झाले.त्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्यांवर भाष्य केले आपल्या जुन्या कुला संबंधीची माहिती नवीन पिढी पर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे काम कुल ग्रंथाने केले आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. एवढा मोठा ग्रंथ आताच्या पिढीला वाचणे जमेल असे नाही,परंतु digitalization मुळे त्यांना आत्मसात करणे सोपे होणार असल्याचे ही ते म्हणाले.वूमन पॉवर is most important power तसेच मातृ शक्तीचे महत्व ही अधोरेखित केले.ग्रंथात माहेरवाशिणी ची माहिती दिली हे महत्वाचे काम झाले आहे असेही ते म्हणाले.
सर्व सहस्रबुद्धे मंडळींना एकत्र आणणे,गरजू विद्यार्थी,कुटुंबीय यांना मदत करणे या न्यासाच्या कामाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांमध्ये skill development वाढवण्यासाठी,तसेच higher education मधे मुलींची संख्या कशी वाढवता येईल याचा विचार झाला पाहिजे अशी सूचना ही त्यांनी मांडली.सत्कार झालेल्या सर्वांच्या कामाचा थोडक्यात आढावा घेऊन त्यांचे ही खूप कौतुक केले. सरकार च्या शैक्षणिक कमिटी मध्ये अनुराधा ताईंनी सहभागी झाले पाहिजे असे व त्यासाठी आम्हीच प्रयत्न करू असे आवर्जून सांगितले.नॉर्थ ईस्ट व जम्मू काश्मीर या आपल्या देशातील नागरिकांना उर्वरित देशाशी जोडण्याचे अभियान त्यांचे इन्स्टिट्यूट मार्फत ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.
नंतर डाॅ. विनय जी यांनी प्रसंगाला अनुरूप असे भाषण केले .त्यातून त्यांच्या विद्वतेची उंची आपल्याला अनुभवास आली.
सर्व सहस्रबुद्धे मंडळींना एकत्र आणल्याबद्दल त्यांनी प्रथम संयोजकांचे कौतुक केले .कांहीच्या मते अशी संमेलने ही संकुचित वृत्ती आहे,पण हे सर्व चुकीचे असल्याचे स्पष्ट मत त्यांनी दिले.आपली अस्मिता ही मागासलेपणाचे लक्षण नाही.आपली अस्मिता, व आपले मूळ काय हे समजावून घेत समाज पुढे जात असतो.त्यामुळे सहस्रबुद्धे कुलात आपण जन्म घेतला ही अभिमानाची गोष्ट आहे.सरला ताई,गणेश पंत ,डाॅ. यशवंत यांनी जुन्या कुल ग्रंथाचे निर्मिती साठी घेतलेल्या मेहनती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.त्यांनी पुढील पिढी साठी कुल ग्रंथ म्हणजे अमोल ठेवा असल्याचे आवर्जून सांगितले.
समानता ही महत्वाची आहे.समरूपता घेऊन आपण समानता आपण पुढे नेत असतो.
संमेलनाचे निमित्ताने सर्वांनी एकत्र येणे ही खूप व्यापक कल्पना आहे.एकमेकांचा परिचय करून घेणे यात खूप समाधान आहे. प्रत्येकाने आपली गुणवत्ता विकसित करून त्याचा उपयोग सहस्रबुद्धे कुटुंबीयांनी एकमेकाला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल याचा ही विचार करावा.
अखेर जे शक्य आहे ते करण्याची ताकद मला दे व जे अशक्य आहे ते सहन करण्याची शक्ती दे असे एका कवीच्या काव्याचा अर्थ विशद करून आपले भाषण संपविले.पहिल्या सत्राचे शेवटा कडे जाताना अभिजित व राहूल यांनी आपली तयार झालेल्या नवीन वेबसाईट व डिजिटल कुलग्रंथाची माहिती दिली तसेच आपल्या कुटुंबाचे updation कसे करायचे याचे व त्यात काही बदल करायचे असतील तर ते कसे याचे प्रात्यक्षिक ही दिले. उपस्थितांच्या शंकांचे निराकरण ही केले.
त्यानंतर सर्वांना भोजनाचा आस्वाद घेण्याची विनंती करून पाहिले सत्र थांबविले.
दुपारी साधारण 3 वाजता दुसरे सत्राची सूर वात झाली. त्यामध्ये उपस्थित कुटुंबीयांचे 4 गटात विभाजन केले. ते गट म्हणजे पहिला. व्यावसायिकांचा,दुसरा नोकरी करणाऱ्यांचा तिसरा शिक्षण,कला अशा कुलबंधुंचा व चौथा गृहिणींचा .असे होते. त्यांना काही विषय दिले होते.त्या गटाचा एक leader त्यांनी च निवडायचा व प्रत्येक सभासदाने त्या विषयांवरील आपली मते मांडायची अशी सूचना त्यांना दिली होती. त्यायोगे सर्वांना बोलते करणे हा महत्वाचा उद्देश होता.यासाठी त्यांना 45 मिनिटांचा अवधी दिला होता.नंतर त्यांचे गट प्रतिनिधीने गटामध्ये झालेल्या चर्चेचा सारांश सांगितला व सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या सूचना आयोजक व सर्व उपस्थितांना सांगितल्या. सर्व सहभागी कुटुंबीयांनी अत्यंत उत्साहाने यात भाग घेतला. व छान सकारात्मक चर्चा झाली.त्यात अशी संमेलने नियमित व्हावी व ती एक दिवसाच्या मुक्कामाची असावीत तसेच पुढील संमेलन आपले मूळ गाव कोतवडे येथे व्हावे अशी सर्वांनी इच्छा प्रदर्शित केली. आयोजकांना अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी योग्य त्या पद्धतीने झाल्या व अपेक्षित उद्देश सफल झाला .या गट चर्चेची संपूर्ण जबाबदारी अनुराधा ताई व निलाताई यांनी घेतली होती व ती अत्यंत यशस्वी पणे पूर्ण केली.अखेर सौ.मोहिनी ताईंनी पसायदान म्हणून या कुल संमेलनाची सांगता केली.
सर्व मान्यवरांचे आभार व उपस्थित कुटुंबीयांचे अभिनंदन व आभार.
श्री. हेमंत सहस्रबुध्दे
अध्यक्ष
सहस्रबुध्दे कुलप्रतिष्ठान न्यास